नमस्कार मंडळी,
प्रस्तावना :
१. ही कोणतीही जाहीरात नाही.
२. ह्यात कोणताही स्वार्थ नाही.
३. कोणतेही साहित्यमुल्य/सेटल द स्कोर नाही.
४. गैरसमज नकोत. ;)
धन्यवाद.
खरं तर मराठी आंजावरून तात्पुरता सन्यास घ्यायचं ठरवलं होतं, पण पुन्हा एकदा उफाळून आलंच. वांझोटे धागे, चर्चा, जुलाब लावणार्या कविता, मराठी माणूस आहोत हे सिद्ध करणारे चरणखेचक धागे आणि रिकामचोट शतकी प्रतिसाद.. ( अर्थात यात माझाही सहभाग असेलही) पण यातून खरच काय साध्य करतोय असा विचार मनात आला.
असो,
मूळ मुद्द्यावर येऊया,
मी मिपावर आलो ते "राघव - पुर्वीचा मुमुक्षु" या व्यक्तीमुळे.