मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद

गारवा (देवद्वार छंद)

चन्द्रशेखर गोखले ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रथम धोंडोपंतांचे हर्दिक अभिनंदन! आपण छंदात्मक काव्यप्रकाराची अतिशय सहज शैलीत माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला. खर तर व्याकरण निमवालीच्या बाबतित आम्ही खुपच कच्चे. व्याकरणाच्या नियमात बसवून एखाद काव्य करण्यास सांगितल कि माझा पोपट होतो. परंतु ज्या तर्‍हेने आपण समजावून सांगितलत त्या मुळे आमच्या सरख्या नवोदितांची हिम्मत वाढली आहे. मी माझी एक कविता स्पर्धे साठी देत आहे. ती नियमात बसते कि नाही (विषयाच्या द्रुष्टीने) त्या बद्दल मी जरा साशंक आहे. तरीही देत आहे .

'शिरगाव च्या आत्तार सरांना 'क्रुती भक्ती ' पुरस्कार ' प्रदान

शनआत्तार ·
शिरगाव च्या आत्तार सरांना " क्रुती भक्ती" पुरस्कार प्रदान राजेंद्र चव्हाण शिरगाव श्री. शमशुद्दिन नसिरुद्दिन आत्तार म्हणजेच शिर्गाव हायस्कूल चे आत्तार सर हे या वर्षीच्या नारायण आश्रमच्या 'क्रुती भक्ती ' पुरस्काराचे मानकरी आहेत. पणती होऊन तेवत राहणा-या , कार्यरत व्यक्तिंच्या साठी हा पुरस्कार आश्रमाच्या वार्षीक स्नेह मेळ्याव्यात प्रतीवर्षी दिला जातो. रविवार दिनांक १६/११/२००८ रोजी दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम नारायण आश्रम कोळोशी येथे होईल.

याहू!

विकास ·
आत्ताच याहूच्या संकेत स्थळावर गेलो होतो आणि एक सुखद धक्का बसला! त्यांच्या गृहपर्णावर (होमपेजवर भारतासाठीचे जे .in आहे त्यावर आहेच पण हे जगाचे मुख्य पान...) चक्क याहू या अक्षराच्या अलीकडे दोन लुकलुकत्या पणत्या आणि दुसरीकडे "हॅपी दिवाली" असा संदेश. त्याच्यावर टिचकी मारल्यावर दिवाळीवर विशेष माहीती मिळाली. वास्तवीक अशी रेखाटने मी गुगलच्या प्रमुखपानावर कायम पाहीली आहेत पण दिवाळीसाठी मात्र दिसले नाही...

फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा

घाशीराम कोतवाल १.२ ·
लेखनविषय:
विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा.... पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी. अनेक पुरुष घरी जायला घाबरत आहेत. अनेक दिवस ऑफिसातच मुक्काम ठोकून. काही पुरुषांना या आंदोलनाची आधीपासूनच कल्पना असल्याने ते पोळपाट बॅगेत लपवूनच ऑफिसला निघाले होते.

मनुवादी आचरटपणा

द्विज ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शुद्धलेखनावर आलेल्या एका प्रतिक्रियेला प्रतिसाद
मनुवादी आचरटपणा तुम्ही कपडे न घालता बाजारातुन हिन्डता का ? मग शारदेचा अपमान का करावा शुद्धलेखनाला मनुवादी आचरटपणा म्हणण्यापुर्वी स्वतः नागडे फिरुन दाखवा अशुद्ध लेखनाला विरोध नाही माझा माझा रोष आहे त्याला मनुवादी म्हणण्याला तुला जन्म दिला तेव्हा वासनावादी म्हणाला होतास का तुझ्या बापाला मनु माझा पुर्वज होता तो हसतोय तुझ्या या स॑भ्रमाला कारण द्विज रुपी

वाचा आणि थंड बसा

भोचक ·
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.

चंद्रयान - शुभेच्छा!

विकास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारताच्या चंद्रयानाच्या उड्डाणाला आता केवळ बावन्न तास राहीले असून सोमवारी पहाटे काउंट डाऊन सुरू होणार आहे!

सचिनचे अभिनंदन !!

अमोल केळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सचिनचे अभिनंदन !! कसोटी क्रिकेट मधे सर्वाधीक धावांचा ब्रायन लाराचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिनने आज आपल्या नावावर केला आहे. मोहालीत आज आपल्या १५२ व्या कसोटी सामन्यात खेळताना सचिनने सर्वोच्च धावसंख्या केली . यावेळी प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलिया असणे ही पण एक विशेष गोष्ट. सचिनचे अभिनंदन तसेच या कसोटीत शतक झळकवण्यासाठी त्याला शुभेच्छा !!

मिपाच्या सदस्यांच्या पानावरची माहिती.

कलंत्री ·
लेखनविषय:
काल असाच अडलटप्पू ( रॅन्डम) विचार मनात आला की मिपाच्या आपल्या सदस्य मित्रांच्या पानावर जाऊन त्यांची माहिती मिळवायची. मृदुला : तिच्या वैयक्तिक पानावर गेलो. तिची माहिती देण्याची पध्दत आवडली. अनुदिनीवरचा लेख आवडला. त्यावरील राजचे विचार आणि अनुची अनुदिनीही आवडली. सखाराम_गटणे™ : माहिती आवडली. घाटावरचे भट, जैनाचं कार्ट, ग्रीष्म, आगाऊ कार्टा, बिपिन कार्यकर्ते : त्रोटक माहिती आहे. अजून देता येईल श्रीकृष्ण सामंत : फक्त व्यावसासिक माहिती आहे. येडा खवीस : माहिती आहे. संकेतस्थळावर गेलो पण समजले नाही. ऋषिकेश : त्रोटक माहिती. १_६ विक्षिप्त अदिती : माहिती वेगळ्या आणि विनोदी पद्धतीने दिलेली आहे.

हृदयांत सागराच्या..

प्राजु ·
हृदयांत सागराच्या फेसाळतात लाटा खडकांत फेनफुलेही शोधित जात वाटा खेळांत गलबताच्या लाटांचाही झिम्मा अस्तास भास्कराच्या क्षितिजावरी रक्तिमा ओठांत शिंपलीच्या मोत्याचेच गाणे किनार्‍यावरी सांडले सोनियाचे दाणे जातात पाऊले गं तिरपी कोण कशी?? खेकड्याची चाल रेतीवरी नक्षी घेताच खोल श्वास वारा ओशाळला धुंदीत यौवनाच्या क्षारात गंधाळला रात्रीस साथ देई खर्जातली गाज चंदेरी पाण्यावरी चढला रूपेरी साज.. का संथ चालला गं हा चंद्र अस्ताकडे प्रेमात तो ही घाली लहरींना साकडे उदयांस भास्कराच्या सागर मंत्रावला ओल्या वाळूवरी शिंपला दवांत भिजला - प्राजु