मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हृदयांत सागराच्या..

प्राजु · · जे न देखे रवी...
हृदयांत सागराच्या फेसाळतात लाटा खडकांत फेनफुलेही शोधित जात वाटा खेळांत गलबताच्या लाटांचाही झिम्मा अस्तास भास्कराच्या क्षितिजावरी रक्तिमा ओठांत शिंपलीच्या मोत्याचेच गाणे किनार्‍यावरी सांडले सोनियाचे दाणे जातात पाऊले गं तिरपी कोण कशी?? खेकड्याची चाल रेतीवरी नक्षी घेताच खोल श्वास वारा ओशाळला धुंदीत यौवनाच्या क्षारात गंधाळला रात्रीस साथ देई खर्जातली गाज चंदेरी पाण्यावरी चढला रूपेरी साज.. का संथ चालला गं हा चंद्र अस्ताकडे प्रेमात तो ही घाली लहरींना साकडे उदयांस भास्कराच्या सागर मंत्रावला ओल्या वाळूवरी शिंपला दवांत भिजला - प्राजु

वाचने 4465 वाचनखूण प्रतिक्रिया 17

आनंदयात्री Sun, 09/21/2008 - 22:05
जातात पाऊले गं तिरपी कोण कशी?? खेकड्याची चाल रेतीवरी नक्षी निव्वळ अस्सल !! सुरेख :) खेकड्याची चाल तिरकी .. पण रेतीसाठी तर ती नक्षी .. खुप छान ! *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*

रेवती Mon, 09/22/2008 - 00:07
मस्त कविता! घेताच खोल श्वास वारा ओशाळला धुंदीत यौवनाच्या क्षारात गंधाळला फार आवडले. रेवती

विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 00:08
वा! एक अतिशय चांगल्या दर्जाची कविता वाचल्याचा आनंद झाला रात्रीस साथ देई खर्जातली गाज चंदेरी पाण्यावरी चढला रूपेरी साज.. ह्या ओळी सर्वाधिक आवडल्या, सुरेखच आहेत! प्राजू, दिवसेंदिवस तुझी कविता प्रगल्भ आणि अधिकाधिक सुरेख होत आहे. जियो....! तात्या.

इनोबा म्हणे Mon, 09/22/2008 - 00:09
घेताच खोल श्वास वारा ओशाळला धुंदीत यौवनाच्या क्षारात गंधाळला आवडली कविता कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल Mon, 09/22/2008 - 00:27
जातात पाऊले गं तिरपी कोण कशी?? खेकड्याची चाल रेतीवरी नक्षी ही तर मस्त कल्पना . :)

फटू Mon, 09/22/2008 - 01:54
सुंदर आहे कविता... जातात पाऊले गं तिरपी कोण कशी?? खेकड्याची चाल रेतीवरी नक्षी हे कडवं तर एकदम क्लासच... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण Mon, 09/22/2008 - 08:59
सुंदर कविता... ओठांत शिंपलीच्या मोत्याचेच गाणे किनार्‍यावरी सांडले सोनियाचे दाणे हे फार आवडल.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

संदीप चित्रे Mon, 09/22/2008 - 10:05
खूप सुरेख आहे कविता. पहिल्या ओळीशी सुसंगत असं चित्र पूर्ण केलं आहेस. एकाच ओळीने सुरूवात करूनही आपल्या दोघांच्या मनात किती भिन्न प्रकारच्या कविता उमलल्या ते पाहून गंमत वाटली.

राघव Mon, 09/22/2008 - 17:28
वाहवा! एकाच कल्पनेची दोन रुपे दिसलीत.. खूप छान!! रात्रीस साथ देई खर्जातली गाज चंदेरी पाण्यावरी चढला रूपेरी साज.. या ओळी सर्वाधिक आवडल्यात. येऊ द्यात अजून. शुभेच्छा! :) मुमुक्षु

स्वाती राजेश Mon, 09/22/2008 - 17:54
जातात पाऊले गं तिरपी कोण कशी?? खेकड्याची चाल रेतीवरी नक्षी त्याच्या त्या चालीवरून ओळ सुचते?? कमाल आहे तुझी....:)शेवटी तुझे मन कवियत्रीचे.. सलाम तुला आणि तुझ्या कवितांना..

स्वाती दिनेश Mon, 09/22/2008 - 18:13
प्राजु,कविता आवडली. रात्रीस साथ देई खर्जातली गाज चंदेरी पाण्यावरी चढला रूपेरी साज.. हे खूप आवडले. स्वाती

चतुरंग Mon, 09/22/2008 - 18:14
संपूर्ण कविता छानच आहे पण त्यातही मला पुढची चार कडवी अगदी आवडली, अत्यंत चित्रदर्शी! ओठांत शिंपलीच्या मोत्याचेच गाणे किनार्‍यावरी सांडले सोनियाचे दाणे जातात पाऊले गं तिरपी कोण कशी?? खेकड्याची चाल रेतीवरी नक्षी घेताच खोल श्वास वारा ओशाळला धुंदीत यौवनाच्या क्षारात गंधाळला रात्रीस साथ देई खर्जातली गाज चंदेरी पाण्यावरी चढला रूपेरी साज.. प्राजू, अल्पाक्षरांत कल्पना समर्थपणे पोचवणे कठिण असते ते तुझ्या कवितेतून दिसू लागले आहे. कविता प्रगल्भ होते आहे. चतुरंग

प्राजु Mon, 09/22/2008 - 19:07
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/