Skip to main content

प्रतिसाद

वळण !!

लेखक अनिल हटेला यांनी बुधवार, 25/02/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ वाजत असलेल्या डोअरबेल ने श्री ला जाग आली.डोळे चोळत आणी कोण तडमडलये हा विचार करत दरवाजा उघडला.समोर अरुण उभा. "काय बे , ११.०० वाजलेत.अजुन अंथरुणातच आहेस होय ?" "हम्म !" "आरे काय हे? आज १४ फेब्रुवारी ! सारी दुनिया आजचा दिवस एंजॉय करतीये आणी तु ?" "छोड ना यार ! चहा घेणारेस का ?

गुलाबी अंडरविअर..

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 12/02/2009 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
मला माहिती आहे की ह्या टॉपिक चं शिर्शक वाचुन तुम्हाला जरा दचकल्या सारखं झालं असेल. पण मला हा विषय जरा विशेष महत्वाचा वाटला. मॉरल पोलिसिंग हा प्रकार हल्ली जरा जास्तच वाढलाय. तुम्ही पण ही बातमी वाचली असेलच, आणि वाचुन हॅः काय फालतु पणा आहे म्हणुन दुर्लक्ष केलं असेलं. इथे ह्या विषयावर लिहिलंय.. माझा मुद्दा एकच.. मॉरल पोलिसिंग कुठल्याही राजकिय पक्षाने करणे कितपत योग्य आहे? महेंद्र.. इथे पण वाचू शकता

कार्तिकी जिंकली!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 08/02/2009 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
झी मराठी च्या सारेगमप स्पर्धेत कार्तिकी गायकवाड अंतिम विजेती ठरली. कार्तिकीला मन:पूर्वक शुभेच्छा!! :)

तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/02/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी झटक्यात हाय गेली लागून आणिबाणी अडवून मीच धरले होते किती दमाने (फ्रेश्नर घरात नाही, भरपूर ओत पाणी!) गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी दररोज एक काढा साइट् नवी मराठी इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी! प्रतिसाद हा कुणाचा आहे कुणास पत्ता? (खोटी मिठास वाणी; खोटे छदाम, नाणी) बोके चलाख, सोदे गुरकावले कशाला? येता पुढ्यात माऊ गातात गोड गाणी प्रेरणा: मी बोचलो म्हणाले

(म्हणजे)

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 03/02/2009 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
"ओढ" म्हणजे काय ते जोर लावल्याशिवाय समजत नाही. "विरह" म्हणजे काय ते माहेरी गेल्याशिवाय समजत नाही. "गेम" म्हणजे काय ते स्वत: केल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते सासरी आल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते दिवटी झाल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते विडंबन केल्याशिवाय समजत नाही. आधारीतः म्हणजे
Taxonomy upgrade extras

(फुकट सकाळ)

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 03/02/2009 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
(आमच्या घरात दर शुक्रवारच्या मित्रमंडळी आयोजित 'पोकर नाईट' नंतर शनिवारी सकाळी सगळे काही/सगळे जण ठप्प होते/होतात. अशा एका शनिवार सकाळचे हे चित्र) फुकट सकाळ *** कुठे कोण पडले पहाटे बघितले कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते सुटीच्या सकाळी असावे तसे हे पहा फक्त पेले रिकामे रिकामे *** नि ओट्यावरी आकृत्या बाटल्यांच्या (नि सोफ्यावरी मित्रही सांडलेले!) अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत निघाले धुराचे किती लोट होते फुप्फुसातुनी? घाबरा जाहलो मी *** आधारीतः धुकट सकाळ

डॉ. आनंद यादव यांचे अभिनंदन !!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 17/01/2009 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद यादव
डॉ.आनंद यादव
आमच्या औरंगाबाद शहरात काल, महाबळेश्वर येथे होणार्‍या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्याक्षाची निवड होणार होती. आम्ही धावत-पळत मसापच्या (मराठवाडा साहित्य परिषद) कार्यालयात पोहचलो. गर्दी दिसली की डोकावून पाहण्याची सवय, त्यामुळे गर्दी झालेली होती. एकाला विचारले कोण ? तर तो म्हणाला डॉ.आनंद यादव ! डॉ.

मिपा मुखपृष्ठ: अभ्यंकर वहिन्या ते बाबूजी!

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 14/01/2009 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या मुखपृष्ठावर आजकाल अभ्यंकर वहिन्यांची वर्दळ असते. त्यांच्या अनुमोदनानंतर मिपाच्या तर्रीवर ताव मारायला आम्ही मिपाच्या दालनांमध्ये प्रवेश करतो. आज मात्र मिपाचे दर्शन मंगलमय वाटले. सकाळी सकाळी बाबूजींची आठवण, त्यांनी वीर सावरकर बनवताना केलेले शर्थीचे प्रयत्न, खाललेल्या खस्ता यांचे स्मरण करुन दिल्याबद्दल मिपाचे आभार! वीर सावरकर बनवताना बाबूजींनी वर्षानुवर्षे एक तपश्चर्याच केली. तिची माहिती सर्वसाधरणपणे मराठी जनतेला नाही. मला वाटते बाबूजींच्या या तपाची माहिती असणारे वा ती तपश्चर्या थोड्याफार प्रमाणात जवळून बघणारे काहीजन मिपावर आहेत.

आजची मुक्ताफळे (Quote of The Day)

लेखक एकलव्य यांनी शुक्रवार, 09/01/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्‍याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही. तसेही अलिकडे आपण जगतो ते Sound Bites च्या जगात.