१९४५ साली दुसरे महायुद्ध संपले चर्चील युद्ध जिंकला पण निवडणुक हरला, अटलीच्या मजुर मंत्रीमंडळाने भारताला स्वातंत्र्य देऊ केले. त्यावेळी चर्चिलने विरोधी बाकावरून पुढील समज नोंदवली होती .
"स्वातंत्र्य हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, परंतू या क्षणी सुत्रे कॊंग्रेसच्या हवाली करणे याचा अर्थ भारतातील लक्षावधी भुकेल्या प्रजेच्या हितसंबंधाना बदमाषांच्या, दरोडेखोरांच्या आणि चांडाळ लुटारूंच्या स्वाधिन करणे आहे, यांच्या कारकिर्दीत साधी पाण्याची बाटली किंवा पावाचा तुकडाही करमुक्त असणार नाही. फक्त हवा तेव्हडी विनामुल्य उपलब्ध असेल या भुकेकंगाल आत्म्याचे तळतळाट अटलीच्या माथी बसतील.