व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४
*व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४*
*कट्टर भाजप समर्थक* :
यांना देशातल्या प्रत्येक राज्यातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक गावातला प्रत्येक ग्रामसेवक हा सुद्धा भाजपचाच हवा असतो. त्यामुळे सतत मोदी किंवा भाजप , राममंदिर यांच्या पोस्टचा तुफानी मारा करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्यासारखे पोस्टत राहतात. समजा एखाद्या समूहात सगळे भाजप समर्थक आहेत हे माहिती असले तरीसुद्धा ; समजा जर आपण हा मारा थांबवला आणि चुकून त्यातला एखादा भाजपपासून थोडासा लांब गेला ; त्याची विचारसरणी ही भाजपला प्रतिकूल अशी बनली तर काय करायचं ?
मिसळपाव
मावळतीच्या सूर्याकडे पाहत पाहत पावले पडत होती. ओहोटी असल्याने चालायला भरपूर वाव होता. जसजसा पुढे जात होतो, तसतशी मागच्या लाऊडस्पिकर वर चालू असलेली क्रिकेट मॅचची कॉमेंटरी क्षीण होत होती. त्या तेजोनिधीने पाण्याच्या पृष्ठभागावर सोनेरी रेखा काढली होती आणि वाळूच्या खळग्यांमध्ये साचलेल्या ओहोटीच्या पाण्यात अनेक केशरी दिवे लावले होते. चालता चालता त्या पाण्यातील सूर्याच्या प्रखर प्रतिबिंबावर नजर रोखली गेली. आकाशातला सूर्य जणू जाता जाता वाळूवर रेंगाळत होता.