Skip to main content

प्रकटन

मै हर इक पल का शायर हूँ ----- साहिर लुधयानवी (भाग २)

लेखक अमर विश्वास यांनी मंगळवार, 19/09/2023 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागाची लिंक मै हर इक पल का शायर हूँ ----- साहिर लुधयानवी (भाग १) आवडता गीतकार याबद्दल चर्चा चालू होती .. आणि साहिर चे नाव आले नाही तर कसे चालले ? म्हणून साहिर विषयी थोडेसे ... ____________________________________________________________________________________________________________________ साहिरचा गीतलेखनाचा प्रवास सुरु झाला तो १९४९ सालच्या "आझादी कि राह पर" या चित्रपटापासून ... पण त्यांची खरी जोडी जमली ती सचिन देव बर्मन यांच्यासोबत.

जेव्हा तुझ्या बटांना (कथा)

लेखक केदार पाटणकर यांनी बुधवार, 06/09/2023 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
केतनने नेहमीप्रमाणे हाय टाकलं. जाईने उत्तर दिलं. तीही ऑनलाईन होती. बरेच दिवस ते ऑनलाईन बोलत होते. जाईची ब-यापैकी माहिती त्याला कळली होती. तिच्या आवडीनिवडी कळल्या होत्या. तिला एकदा पाहायचं होतं. मनात तुंबलेला प्रश्न विचारायचा होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर केतनने विचारलं. "कधी भेटायचं ?" "भेटू रे." हे जाईने तिस-यांदा तरी ऐकवलं होतं. आता मात्र केतन वैतागला. "भेटू रे, भेटू रे खूप दिवस चाललंय तुझं. नक्की सांग. आपण असं किती दिवस चॅटिंग करणार ? गेले दोन आठवडे तू टाळत आहेस.एकदा भेटूच ना.

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

लेखक पराग१२२६३ यांनी बुधवार, 06/09/2023 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

बेसुरा मी

लेखक शेर भाई यांनी मंगळवार, 05/09/2023 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला एखाद्या व्यक्ती बद्दल मन कलुषित करायच आहे, सोप्प आहे, आपण आपल्या परिचितांच्या कानात फक्त एव्हढच बोलायचं कि “बाबारे त्या अमुक तमुक पासून जरा जपून बरं!!” बस्स, ती व्यक्ती कितीही चांगली असली सगळ्यांशी किती हि आपुलकीने वागू दे, सगळे जण त्या व्यक्ती पासून थोडं फटकूनच वागतात. तुम्ही म्हणाल कि आता हे काय मध्येच. पण मंडळी हो, मागील काही दिवस Selective Ignorance चा इतका दीर्घ अनुभव घेत आहे. आपल्या भारत देशात तुम्ही सरळमार्गी असणे म्हणजे जगण्यासाठी नालायक. आणि सध्या जे काही तज्ञ त्यांचे ज्ञान पाजळतात ते एकदम दिव्य.

पुस्तक परिचय-वॉकिंग ऑन द एज-लेखक प्रसाद निक्ते

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 03/09/2023 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी अंगात भटकंतीचा किडा असल्याने मी भटकत असतो आणि जेव्हा भटकत नसतो तेव्हा भटकंतीविषयक काही मिळाले तर आधाशाप्रमाणे वाचत असतो. तेव्ह्ढीच दुधाची तहान ताकावर. तर असाच कुठेतरी या पुस्तकाचा उल्लेख वाचला आणि पुस्तक मागवले. पहीली एक दोन प्रकरणे वाचुन झाली, पण नंतर पुस्तक कपाटात गेले आणि हापिसच्या कामांच्या गडबडीत जरा बाजुला पडले. पण विकांताला आठवण झाली आणि पुस्तक बाहेर काढुन जवळपास एका बैठकीत संपवले. त्यापायी दुपारच्या साखरझोपेवरही मात केली. कारण पुस्तकच तसे आहे.

मनाचा पहिला श्लोक

लेखक arunjoshi123 यांनी रविवार, 03/09/2023 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनाचा पहिला श्लोक मनाचा पहिला श्लोक कोणीही का समजून घ्यावा? मनाचा पहिला श्लोक समजून घेणे ही एक आध्यात्मिक गरज नसून एक साधी सामाजिक आणि वैयक्तिक गरज आहे. आपले जीवन सुरळीतपणे जगण्याकरता आपण आपल्या ब्रह्मांडाचे एक साधे विभाजन करू शकतो. आपला देह, आपले मन किंवा आपला सूक्ष्म देह, आपला भोवताल, आपल्या समजेच्या आणि भोवतालच्या पलीकडचे अशा चार विभागात हे साधे सोपे विभाजन होऊ शकते. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या त्यांच्या ग्रंथामध्ये या चारही बाबींचे सविस्तर विवरण केलेले आहे.

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 01/09/2023 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" -- यावरून मला "कदम चूम लूं या, ये आंखे बिछा दूं" या ओळी, आणि लागलीच "आंखों से जो उतरी है दिल मे तस्वीर है इक अनजाने की" " ही गाणी आठवली, मग त्यावरून "तस्वीर तेरी दिल मे जिस दिन से उतारी है" आठवलं आणि त्यावरून मग "दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे" हे आठवलं आणि मग त्यावरून आणखी काहीच आठवलं नाही पण तेवढ्यात शेजारच्या गण्याच्या घरात रेडियोवर "पल भर के लिये कोई हमे प्यार करले" हे वाजू लागलं आणि मग "गाता रहे मेरा दिल" वाजत होतं तेवढ्यात गण्या धावत आला आणि म्हणाला "फिरायला चल बे लौकर, बेबी आणि सुम्मी फिरायला निघाल्यात चल पटकन" -- पण मी

क्लिक : कथा संग्रह प्रकाशन

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 29/08/2023 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो मला आनंद होत आहे. माझ्या कथांचा संग्रह हेडविग मिडीया या प्रकाशनसंस्थेतर्फे या ३ सप्टेबरला प्रकाशित होत आहे. 1 क्लिक करून फोटोत साठवलेले क्षण आपण पुन्हा पहातो तेंव्हा आपण ते नुसते पहात नसतो तर पुन्हा अनुभवत असतो. मनाने क्लिक केलेले काही आल्हाददायक, हवेहवेसे क्षण पुन्हा जिवंत करणा-या कथांचा संग्रह...

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

लेखक शीतलउवाच यांनी रविवार, 27/08/2023 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.