मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

पराग१२२६३ ·

चित्रगुप्त 07/04/2024 - 15:00
प्राचीन भारतीय तंत्रज्ञान / विद्येविषयी रोचक माहिती. आजवर दुर्लक्षित या विषयावर आता प्रत्यक्षात काही घडू लागले आहे, ही अतिशय मोलाची बाब आहे. याबद्दल पुढे काय काय घडते ते जाणून घ्यायला आवडेल. या धाग्यावर किंवा नवीन लेख अवश्य देत रहावेत ही विनंती. लेखाबद्दल अनेक आभार. . प्राचीन भारतीय जहाजाचे उठाव- शिल्प. . इ.स. पहिल्या शतकातील भारतीय समुद्र मार्ग. . सातवाहन नाणे. . . याविषयावरील विडियो आणि लेखः https://www.youtube.com/watch?v=M03ikNNDukQ&ab_channel=CACHEINDIA https://youtu.be/m1uBAZlmLu4?feature=shared https://brewminate.com/naval-warfare-in-ancient-india/ https://www.crystalinks.com/indiaships.html https://www.indiadivine.org/indias-ancient-great-maritime-history/

रामचंद्र 07/04/2024 - 16:04
ते नाव 'रॉयल्टी' नसून 'लॉयल्टी' होतं अशी माहिती मिळते. एकूणच सरकारचा हा एक चांगला उपक्रम वाटतो. पूर्वी टिम सेव्हरिन, थॉर हेयरडाह्ल यांसारख्यांनी अशाच मोहिमा केलेल्या होत्या. आपल्याकडे ओरिसात कटकला कार्तिक पौर्णिमेपासून आठवडाभर बाली यात्रा ही मोठी जत्रा असते. या मुहूर्तावर पूर्वी स्थानिक दर्यावर्दी आग्नेय आशियात व्यापारासाठी जायला निघत असत त्याची आठवण म्हणून ही जत्रा असते. मात्र अलिकडे अशी खरीखुरी सागरी मोहीम काढल्याचे माहीत नाही. अलिकडे तीसएक वर्षांपासून भारतीय नौदलातर्फे वेगवेगळ्या शांतताकालीन साहसी सागरी मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्यात लेखात उल्लेखलेल्या मोहिमेसारख्यांनी तर अजूनच चांगली भर पडेल.

रामचंद्र 07/04/2024 - 16:27
टिम सेव्हरिनच्या 'सोहार' या सिंदबादच्या सफरींवर आधारित मोहिमेवरचा व्यंकटेश माडगूळकरांचा लेख ललितच्या दिवाळी अंकात वाचल्याचं आठवतंय.

रामचंद्र 07/04/2024 - 22:43
इंग्रजांनी भारतीय सीमावर्ती तसेच एकूणच व्यापारी सागरी वाहतूक आपल्याच हातात ठेवली होती. या अधिकृत मक्तेदारीला आव्हान देणं हे एतद्देशीय व्यावसायिकांना अशक्यच होतं. मात्र त्यावरही मात करण्याचा एक प्रयत्न केरळात झाला. आपल्याकडे वालचंद हिराचंदांनी धाडस करून डावपेच लढवत गांधीजींच्या चळवळीला पाठिंबा देत लॉयल्टीचा म्हणजेच सिंदिया स्टीमशिप कंपनीचा प्रयोग संपूर्ण यशस्वी करून दाखवला. वालचंदांची दृष्टी आणि धमक याला तोड नाही.

लेखन माहितीपूर्ण आहे. बाय द वे, लेख वाचतांना चहा पिता पिता माझ्या मनात विचार आला. की, समुद्रपार करणे जिथे शास्त्रसंमत नव्हतं किंवा पाप मानल्या जात होतं त्या त्यापूर्वीचा काळ अतिशय प्रगतीचा होता असे म्हणावे लागेल. पाप मानल्या जायचं तो काळ अगदी अलिकडचे असावा असे वाटते. रामायण, महाभारत, काही धर्मग्रंथात समुद्र-प्रवास होत होता असे दिसते. अभ्यासु- जिज्ञासू भर घालतीलच. व्यापार- धन-लोभाच्या अपेक्षेने, सुंदर स्त्रीच्या अपेक्षेने आपले भारतीय लोक समुद्रात दुरवर फेरफटका मारुन समुद्र धोक्याची रिस्क घेत होते, असे दिसते. ( संदर्भ ) नवीन जहाज बांधणी आणि या निमित्ताने भारतीय सागरी व्यापार, भारतीय संस्कृती, सांस्कृतिक देवाण घेवाणात जहाजांची जी ऐतिहासिक-सांस्कृतिक भुमिका होती तीही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे (अभ्यासू )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 08/04/2024 - 11:05
प्रतिसाद आवडला. पूर्वी ब्रिटिश बोट बांधणी तज्ञ इथे मराठा आरमाराचे काम बघायला (किंवा त्यांना चार गोष्टी शिकवायला) आले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात बोट बांधणीविषयक माहिती आणि कागदपत्रे पाहून ते थक्क झाले आणि आम्ही तुम्हाला काय शिकवणार अशा आशयाचे बोलले.. असे कोणत्या तरी व्याख्यानात ऐकले होते किंवा कुठेतरी वाचले होते. पण नेमका संदर्भ मजजवळ नाही . शिलाई पद्धत हे नाव पूर्वी ऐकले नसले तरी फळ्या वाकवून आणि बऱ्यापैकी या तंत्राने कोंकणात लहान ते मध्यम मच्छीमार बोटी बांधताना बघितले आहे. फणसाचे लाकूड असे. आणि कसले तरी तेल. लेख रोचक.

लिओ 10/04/2024 - 13:43
या आधी भारतीय नौदलाने १९९७ च्या आसपास INS Tarangini नावाचॅ जहाज आपल्या ताफ्यात दाखल केले. हे जहाज जरी डिझेल इंजिन ने सज्ज असले तरी या जहाजावर शीडाची यंत्रणा आहे, डिझेल इंजिन आणि वारा या दोन्हीच्या सहाय्याने हे जहाज भ्रमंती करते.

चित्रगुप्त 10/04/2024 - 14:41
इस्लामी आणि ख्रिस्ती सत्तांचा हिंदु संस्कृतीवर झालेला परिणाम - या विषयावर कुणीतरी विस्तृत लेख लिहावा असे सुचवतो. अशी काही पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का?

5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.

रखमाई

मी-दिपाली ·

गवि 22/03/2024 - 11:44
कमाल आहे. डॉ. रखमाबाई यांच्याविषयी आधीही वाचले होते. डॉ. आनंदी आणि डॉ. रखमाबाई या दोघींचे धाडस आणि चिकाटी पाहून थक्क व्हायला होते. दुर्दैवाने आनंदीबाई डॉक्टर झाल्यानंतर फार काळ रुग्णसेवा करू शकल्या नाहीत. त्यांचे अकाली निधन झाले. रखमाबाई यांनी मात्र दीर्घकाळ प्रत्यक्ष रुग्णसेवा केली. त्या अर्थाने त्यांचे महत्व खूप आहेच. पहिला दुसरा तिसरा ही नंबरवारी खरेच चुकीची वाटू लागते.

किसन शिंदे 22/03/2024 - 13:43
लेखाची सुरूवातीची काही वाक्य वाचून असे म्हणावे वाटते की, समर्पक वाक्य, प्रसंग, उल्लेख लेखामध्ये बेमालूमपणे पेरायची लेखिकेची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. माहिती संक्षिप्त स्वरुपात वाटली तरीही, डॉ. राऊतांची ओळख करुन देणारा हा लेख बेहद्द आवडला.

आणि लेखविषय आवडला. मुंबईतील माझ्या आणि माझ्याअगोदरच्या पिढीत रखमाबाईंचा गौरवाने उल्लेख केला जात असे आणि शाळाकॉलेजात शिकणार्‍या मुलींना त्यांचे उदाहरण देऊन असेच कर्तृत्त्व गाजवावे असा उपदेश केला जात असे. कादंबिनी बोशू-गांगुली या आणखी एक रखमाबाईंच्या समकालीन स्त्री डॉक्टर. एका समाजसुधारणाविरोधक छापील नियतकालिकाच्या संपादकाने कादंबिनींचा एका लेखात 'वेश्या' असा उल्लेख केला होता. त्यांचे पती द्वारकानाथ हे ब्राह्मो समाजातील सुधारणावादी व्यक्ती असून ते वकील होते. त्यांनी त्या संपादकांवर या बदनामीविरुद्ध खटला भरून डॉक्टर पत्नीला नुकसानभरपाई देखील मिळवून दिली. अशी अनेक नावे इतिहासातून डिलीट झालेल्या महाराष्ट्राशी तुलना करतां हे वंगोत्पन्न समाजधुरीण अग्रेसर वाटतात. छान लेखाबद्दल धन्यवाद.

“ मून पे कदम रखनेवाला पहला इंसान कौन था ?” लेक्चर हॉलमध्ये प्रोफेसर विरू सहस्रबुद्धे उर्फ व्हायरसने प्रश्न विचारताच एकापाठोपाठ अनेक आवाज ऐकू येतात उत्तरादाखल, “ नील आर्मस्ट्रॉंग, सर. ” “ obviusly he was, we all know it. लेकिन दुसरा कौन था ? ” “.....” विचाराला फारसा अवधीही न देता लगेचच व्हायरसचं पुढचं वाक्य कानावर पडतं, “ Don't waste your time, it is not important. Nobody remembers the man whoever came second..” ‛थ्री इडियट्स' चित्रपटातील हा प्रसंग. असंच काहीसं ‛दुसरेपणाचं’ नशीब घेऊन जन्माला आलेलं एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे ‛डॉ. रखमाबाई राऊत' ! डॉ.

रेल्वे रिटायरिंग रूम्स

अक्षय देपोलकर ·

गोरगावलेकर 16/03/2024 - 22:05
न्यू जलपायगुडी आणि कामाख्या या दोन ठिकाणी AC रूम वापरल्या आहेत. बाथरूम/टॉयलेट स्वच्छ असतात एव्हडे सोडून बाकी मुद्द्यांशी सहमत. ऑन लाईन रूम बुक करतांना दिवसा आठ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ असे 12 तासाचे दोनच पर्याय होते.

कंजूस 17/03/2024 - 06:17
ओफ लाईन बुकिंग नेहमीच्या आरक्षण खिडकीवर होतं का? रेल्वे गाड्यांचं अमुक एक तारखेचं आरक्षण आहे का नाही ते जसं ओनलाइन रेल्वे साईट/ app वर पाहतो तसं या रिटायरींग रुम्सचं आरक्षण कसं पाहतात? एकदा विजापूर प्रवासात एका प्रवाशाने सांगितलं की सोलापूर स्टेशनची एसी रुम घेतल्याने तुळजापूर पटकन करता आलं. रुम चांगली होती. रेल्वे स्टेशनच्या अलीकडे राहण्याचं हॉटेल असेल आणि फिरण्याची जाग पलीकडे असेल तर ओटो रिक्षाचा मोठा फेरा पडतो. किंवा स्टेशनचे प्लॅटफॉर्म तिकीट काढून रेल्वे पुलाचा वापर करून पलीकडे जावं लागतं. भूवनेश्वरला हा अनुभव घेतला होता. पण स्टेशनचीच रिटायरींग रुम घेतली असती तर त्रास वाचला असता. रुममध्ये टीवी असतो का?

In reply to by कंजूस

खोल्यांचं आरक्षण ऑनलाईन बघू शकता IRCTC वेबसाईटवर आहे पण मला तरी एवढं उपयोगाचं नाही वाटलं.. ऑफलाईन आरक्षण जिथे रूम्स आहेत तिथे वेगळा रिसेप्शन एरिया आहे तिथून घेऊ शकता. थेट जाऊन रूम्स बघून घेतलेल्या बऱ्या नाहीच पसंत पडल्या तर बाहेर तरी बघू शकतो. डिलक्स रूम्स मध्ये टीव्ही चालू होता.

टर्मीनेटर 21/03/2024 - 22:10
सात-आठ वर्षांपूर्वी कामानिमीत्त केलेल्या केरळ ते हैदराबाद (नामपल्ली) आणि हैदराबाद ते मुंबई अशा रेल्वे प्रवासात (काहि तासांचा) ब्रेक जर्नी असल्याने हैदराबाद रेल्वे स्टेशन वरच्या रेल्वे रिटायरींग रूमचा अनूभव घेतला होता आणि तो समाधानकारक होता.

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 22/03/2024 - 06:19
आपण एकटे असू आणि काही सामान आहे तर रिटाइरिंग रूम. पण दोघे असतील तर एसी वेटिंग रुम घेता येईल दहा रु तासाने. काही मोठ्या जंक्शन स्टेशनांवर मिळते. उदाहरणार्थ झाशी,हुबळी.

रेल्वेचा प्रवास म्हणजे अस्वच्छ अशी छबी पुसून काढणाऱ्या अनेक गोष्टींपैकी अजून एक गोष्ट म्हणजे जंक्शनसारख्या ठिकाणी दिसणाऱ्या रेल्वे रिटायरिंग रूम्स.डिलक्स आणि डॉर्मिटरी प्रकारात सदर रूम उपलब्ध असतात. तीन तासापासून ते चौवीस तासापर्यंत आपल्या गरजेनुसार बुक करू शकता. फ्रेश होण्यासाठी दोन्ही प्रकारात स्वच्छ बाथरूम, टॉयलेट आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय असते. डिलक्स रूम ३ तासासाठी ५०० रुपये आणि डॉर्मिटरी बेड ३ तासासाठी १८० रुपये एवढा नाममात्र दर* आहे. आपल्या गरजेनुसार (३,६,१२,२४ तास) रूम किंवा बेड बुक करू शकता.रूम बुक करताना तिकिटाचा पीएनआर नंबर आणि ओळखपत्र द्यावं लागतं.

मेकॅनिकल इंजिनीअरिंगची ओळख

केदार भिडे ·
आता १२वी च्या परीक्षा सुरु होतील आणि त्यानंतर विविध प्रवेश परीक्षा होतील. जून महिन्यापासून उच्च शिक्षणाच्या प्रवेशांना सुरुवात होईल. तत्पूर्वी Mechanical Engineering या विषयाची माहिती देणारे हे PPT तयार केले आहे. YouTube वरील विडीओ लिंक खाली दिली आहे. ११-१२वीतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकरता हे तयार केले आहे. ही Mechanical Engineering या विषयाची जाहिरात नव्हे. Mechanical Engineering मध्ये केवळ काय आहे याची ओळख करून दिलेली आहे. बर्याचदा १२वी नंतरच्या choices या दूरचे भाऊ बहीण, नातेवाईक, शेजार पाजारची मोठी मुले, हवेतल्या गप्पा, खाजगी शिकवणी चालक आणि त्यांच्या जाहिराती यांवरून ठरतात.

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har ·

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.

नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला'

चित्रगुप्त ·

टर्मीनेटर 29/01/2024 - 16:45
मस्तच! माहिती आणि फोटोज छान 👍 (काय समस्या आहे माहित नाही पण काही फोटोज पुर्ण दिसत नाहियेत, ते नंतर पुन्हा बघतो.)
रोमन साम्राज्यातील वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम सारख्या भव्य इमारती, चिलखते, वस्त्रप्रावरणे वगैरेंबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालेले होते.
+१००० मला पण ग्रीक/रोमन वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम, अँफी थिएटर, अ‍ॅक्वाडक्ट अशा गोष्टींचे प्रचंड आकर्षण आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:00
प्रतिसादांबद्दल अनेक आभार. फोटो आवडत आहेत हे वाचून चांगले वाटले. रोमन 'अ‍ॅक्वाडक्ट' हा अद्भुत प्रकार आहे. त्यासाठी मुद्दाम जऊन बघायला हवे. पुन्हा कधी गेलो तर नक्की बघेन. . .

Bhakti 29/01/2024 - 18:14
सर्वच फोटो, वर्णन, माहिती सुंदर आहे. धबधब्याच्या आणि बाजूला किल्ला तो फोटो जास्त आवडला.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:04
लेख आणि फोटो आवडत आहेत हे वाचून आणखी लिहिण्याचा उत्साह वाढतो आहे. @कंजूस, 'अगदी रस्त्यापासून आकाशापर्यंत आपण डोळ्यांनी बघतो तसं चित्र आहे' हे वाचून मी पुन्हा तो फोटो बघितला, आणि मलाही तसेच वाटले आणि हे कसेकाय घडले असावे, हा प्रश्न पडला आहे. .

In reply to by मनो

चित्रगुप्त 30/01/2024 - 20:02
एक सुचले ते असे, की कोणतेही दृश्य बघताना बहुतांशी आपण आपली नजर 'आडवी' फिरवत असतो. मोठा विस्तीर्ण देखावा बघताना तर विशेषच. त्या मानाने खालपासून वरपर्यंत दृष्टीक्षेप टाकण्याचे प्रसंग कमी असतात. या फोटोत 'आडवे' बघण्यासारखे काही नाही. बाजूच्या भिंतींमधील खिडक्या पण आपली नजत 'आत आत' नेत आहेत. त्या मानाने फोटोत 'उभे' घटक जास्त आहेत. 'आत' जाणारा रस्ता, पलिकडील इमारती आणि तीन ठिकाणी दिसत असलेले निळे आकाश. यामुळे असे वाटत असावे. (असे वाटते) Sir Ernst Hans Josef Gombrich यांच्या Art and illusion : a study in the psychology of pictorial representation या चित्रकलाविषयक पुस्तकात या विषयी विस्तृत उहापोह वाचल्याचे आठवते, पण नेमके काय ते विसरलो. या पुस्तकाची पीडीएफ उपलब्ध आहे: https://archive.org/details/artillusionstud00gomb

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 10:07
Vertical shift किंवा perspective corrected पद्धतीचे wide angle lens चा एक प्रकार मिळतो. अतिशय महाग लेन्स असतं. (20/24mm prime with f/2) .तर ते वापरून फोटो घेतला असणार.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:06
सगळे फोटो स्वस्तातल्या शामसंग (-खेले होरी) मोबल्यातून, तेही फक्त आटो मोडमधे काढलेत. फक्त क्रॉप केलेत हवे तसे. बाकी काय नाय. 'दृष्टी' हवी, ती निसर्गचित्रणातून मिळाली असावी, आणि थोर चित्रकारांची चित्रे बघण्यातून. बाकी फोटोग्राफीतले ओ की ठो कळत नाही.

हा लेख आणि फोटो तर आवडलेच पण त्यात दिलेल्या ईतर लिंकाही उघडुन वाचल्या. केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते. फक्त खिसा काय म्हणतो ते पहावे लागेल. :) आपण ईतकी डिटेल माहीती काढुन ठिकाणे बघताय हे विशेष. नाहीतर ईथेतिथे सगळे सारखेच, तेच राजवाडे,त्याच मुर्त्या आणि काय काय. फोटोही सुंदर आलेत. रच्याकने- फार वर्षांपुर्वी ऑफिसच्या कामानिमित्ताने ब्रसेल्स आणि अ‍ॅमस्टरडॅम बघणे झाले होते, पण मॅनिकेन पिस, तुसाँ म्युझियम, व्हॅन गॉग म्युझियम अशा २-४ गोष्टी सोडल्या तर फारशी नावेही आठवणार नाहीत. पुभाप्र

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:12
केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते.
-- अगदी खरे. माझ्या ओळखीतले जे कुणी तसे फिरुन आलेले आहेत, त्यांच्याकडून ऐकलेले माझ्या आवडीत कुठेच बसणार नाही. कुठेही जाण्यापूर्वी तिथला सांगोपांग अभ्यास करून जाणे बरे, अर्थात नेहमी ते जमत नाही आणि काही ना काही बघणे राहूनच जाते.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 13:24
सहमत. ग्रूपवाले वेळ फार घालवतात. नाश्ता, जेवण, शॉपिंग यातून वेळ उरल्यास लीडरने सांगितलेलं पाहाणं. आणि हो ग्रूप फोटो.

तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला! रोमची पहिली ओळख Dan Brown च्या एंजल्स अँड डेमन्स पुस्तकातून झाली. पुस्तक वाचता वाचता एकेका स्थळविषयी इंटरनेटवर जास्त माहिती वाचत होतो. त्यातून रोममधील वास्तुकला, शिल्पकला यांची ओळख झाली. St Peter's Basilica, Castle Sant' Angelo, Pantheon या प्राचीन वास्तू, Fontana dei Quattro Fiumi (Fountain of the Four Rivers) सारखी स्थापत्य कला, Bernini सारख्या कलाकाराच्या स्वर्गीय कलाकृती - Ecstasy of St Teresa. इतक्या सुरेख, भव्य, बारकावे दाखवणाऱ्या कलाकृती! अशीच पॅरिस, लुव्र, लिओनार्दो दा विंची यांची ओळख दा विंची कोड मधून झाली, तर फ्लॉरेन्सचं सौंदर्य इन्फर्नो मधून दिसलं! ओरिजिन या पुस्तकातून Casa Milà आणि Sagrada Família अशा अनोख्या वास्तू समजल्या...

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 30/01/2024 - 13:47
तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!
या पुस्तकांपैकी फक्त 'दा विंची कोड' चे मराठी भाषांतर वाचले आहे. ते आवडले पण सिनेमा फारसा रुचला नाही. 'इन्फर्नो' वरील 'गुस्ताव्ह दोरे' (Gustave Dore) च्या चित्रांचे एक पुस्तक माझ्याकडे आहे. विलक्षण चित्रे असतात दोरेची. आत्ताच अ‍ॅमेझोनवर डॅन ब्राऊनची अन्य पुस्तके (मराठी) शोधून ठेवली आहेत. येत्या मार्चमधे दहा दिवस लंडनमधील संग्रहालये बघणार आहे. त्यासंबंधी काही विशेष पुस्तके, सिनेमे वगैरे असल्यास जरूर कळवावे. अनेक आभार.

सुंदर लेख ! दोन प्रश्न १. Tempio di Vesta मधील एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? असा उल्लेख कोठे आहे काय ? २. नदी / कालवे / समुद्राच्या अवतीभवती वसलेल्या शहरांत / गावांत त्या पाण्याचा काही विशीष्ट गंध वगैरे येतो काय ? अवांतर : बनेल काढून रोमन सम्राटाच्या आविर्भावात दिलेली पोज आवडली.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:18
एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? हा प्रश्न समजला नाही. 'जाणल्यामुळे' म्हणजे काय ? कौमार्यभंग वगैरे प्रकार रोमन साम्राज्याच्या दीर्घ इतिहासात घडलेही असतील, काही ठाऊक नाही. पाण्याला विशिष्ट गंध वगैरेही माहित नाही. त्या दिवशी कडक ऊन्ह असल्याने घामाघूम होत फिरावे लागले होते, म्हणून सदरा काढलेला होता. कुठे रोमन सम्राट आणि कुठे म्या पामर. या लेखात एवढी रुची घेत असल्याबद्दल अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

जुन्या मराठी ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांमधे जोसेफ ने मेरीला जाणल्यामुळे (संयोग झाल्यामुळे) येशूबाळाचा जन्म झाला अशा प्रकारचे उल्लेख असतात त्या अनुषंगाने हा शब्दप्रयोग केला.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 02/02/2024 - 12:32
'जाणण्या' चा नवीनच अर्थ जाणकाराकडून जाणून घेतला. आता कळले लहान मुलांना 'अजाण' 'निष्पाप' वगैरे का म्हणतात. जुन्या ख्रिस्ती धार्मिक पुस्तकातले आणखीही असे शब्दप्रयोग 'जाणून' घ्यायला आवडेल. आपली 'जाणीव' वाढीला लागली पाहिजे राव. अनेक धन्यवाद.

चौथा कोनाडा 31/01/2024 - 14:51
क्या बात ... एक नंबर मस्त ! माहिती आणि प्रचि लै छान ! रोम ची सुंदर सफर घडवलीत चित्रगुप्त जी !
या सेविकांना वय वर्षे ६ ते ३६ या अवधीत अखंड कौमार्य राखणे आवश्यक असायचे.
बाबो .. किती आवगड असं ह्ये म्हनायचं ! व्हिला ‘आद्रिआना जबरदस्त दिसतोय ! कल्पना करून तयार केलेला व्हिला ‘आद्रिआना चा व्हिडीओ भारी आहे ! Villa d'Este किती रम्य आहे ! वाहते पाणी,धबधबे, शंभर कारंजे, तलाव सुंदर ! रोमचा राजवाडा, गल्ल्या वास्तू भयन्कर सुंदर आहेत !
- अस्मादिक.
ह्यो फोटो लै पेशल !
आपुली आपण काढी शेलफी, तो येक मूर्ख.
हा हा हा

खूप सुंदर भटकंती आणि अप्रतिम फोटो! सोबतीला इतिहास उलगडून सांगितलात ते फार आवडलं. येणारी अनेक वर्षे तुम्हाला अशी छान भटकंती करायला मिळो या शुभेच्छा :)

नंदन 03/02/2024 - 17:02
लेख आणि फोटो - दोन्ही खासच! (काही वर्षांपूर्वी ट्रेवी कारंज्यात एक बारकंसं नाणं टाकून पुनर्भेटीचा मनसुबा व्यक्त केला होता - तो योग केव्हा येतो ते पहायचं!)

परत एकदा वाचला धागा. काय सुंदर आहेत सगळे फोटो. मन खूष झालं. असेच लिहित रहा चित्रगुप्तकाका _/\_

श्वेता२४ 08/02/2024 - 12:53
अतिशय विस्तृत ओळख करून दिलीत. फोटो देखील अतिशय सुंदर. भविष्यात ही जागा बकेट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे तुमच्या या माहितीचा खूप उपयोग होईल. धन्यवाद!

चौथा कोनाडा 19/02/2024 - 22:07
श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे उद्यापासुन एक आठवडा चित्रप्रदर्शन होत आहे: माहिती खालील ठिकाणी: सेव्हन_आर्टिस्ट_फ्रॉम_इंदोर चित्रगुप्तजी, हार्दिक अभिनंदन आणि प्रदर्शनासाठी समस्त मिपाकरांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !

जुइ 27/02/2024 - 06:33
विहंगम आणि भव्य महाल! रोमचे असे सुंदर दर्शन तुमच्या मुळे झाले! फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले! रोम बद्द्ल अजून वाचायला आवडेल.

पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.अशा या रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे. . टायबर नदीवरील अनेक पुलांपकी एक. पलीकडे सेंट पीटर्स कॅथेड्रल दिसते आहे.

३० वर्षांपासून अखंडित....

पराग१२२६३ ·

नाॅर्थ ब्लॉकमधील असताना सलग पाच वर्ष परेड खुप जवळुन बघीतली. छान ,थोडक्यात आढावा इथे सादर केलात. संपूर्ण संकलनाचे एक काॅफी पुस्तक काढा. नक्कीच लोकांना आवडेल. धन्यवाद.

मी नेहरू प्लेस ला २-३ वर्षे नोकरी केली. २५ जानेवारी ला सक्तीचा हाफ डे मिळायचा सुरक्षा कारणास्तव . प्रत्यक्ष परेड दिल्लीत राहूनही पाहिली नाही . मुंबईस पळायचो सुट्टीसाठी. ऑफिसमधले सांगायचे कि नेहरू प्लेस हुन परेड जायची फार वर्षांपूर्वी

संग्रह सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही.

पुस्तक परिचयः करूणाष्टक- लेखकः व्यंकटेश माडगुळकर

सुजित जाधव ·

मिसळपाव 17/01/2024 - 08:33
बनगरवाडी वाचलं आहातंच आणि आता हे. याच बरोबर "सत्तांतर", "वावटळ" आणि "कोवळे दिवस" ही पुस्तकं पण जरूर वाचा. धाकट्या माडगूळकरांचं आणिकही भरपूर लेखन उपलब्ध आहे, अतिशय वाचनीय आहे. पण ही तीन पुस्तकं अगदी अजिबात चुकवू नका. टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

रामचंद्र 17/01/2024 - 16:28
मागं एका दिवाळी अंकात व्यंकटेश माडगूळकर ('करुणाष्टक') आणि दुर्गा खोटे अशा दोघांच्या आत्मकथेतले भाग वाचल्याचं आठवतं. त्या दोन्ही कथनांत वीसेक वर्षांचं अंतर आहे. पण भिन्न पार्श्वभूमी असलेल्या दोन व्यक्तींचं आयुष्य किती वेगळं असू शकतं ते जाणवून शाळकरी वयात तेव्हा खूपच आश्चर्य वाटलं होतं. माडगूळकरांचाच 'मंतरलेले बेट' हा अनुवादही वाचनीय आहे. एका लहान मुलाच्या नजरेतून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळातल्या न्यूयॉर्क शहरातल्या आपल्या आठवणी त्यात आहेत.

नठ्यारा 17/01/2024 - 20:17
शब्दात कटुपणा न येऊ देणे हीच खरी करुणा. मनांत आणलं असतं तर विद्रोही धर्तीने कडवाष्टकही लिहिता आलं असतं. मात्र तिकडे लेखकाचा कल नसल्याचं जाणवतं. -नाठाळ नठ्या

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

पराग१२२६३ ·

सर टोबी 17/12/2023 - 16:59
वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स. पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

In reply to by सर टोबी

पराग१२२६३ 17/12/2023 - 23:30
पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

मनो 17/12/2023 - 22:27
वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

सौंदाळा 18/12/2023 - 10:26
माहितीपूर्ण लेख तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः १. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे) २. अंतर्गत स्वछता ३. आरामशीर आसनव्यवस्था ४. चांगली खान-पान सेवा लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले. नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही. एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

दिवस चुकला ... वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही . त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

कंजूस 18/12/2023 - 20:16
साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.

VB प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.

उत्कृष्ट मराठी कथासंग्रह / कादंबरी पुरस्कार २०२३

विनिता००२ ·

'सुचेतस आर्टस'चं लेखकांना प्रोत्साहन मिळावं याबातीतचं धोरण उत्तमच आहे , पण पुरस्काराची रक्कम फारच तोकडी आणि लेखकांचीही प्रतिष्ठा घालवणारी आहे असे वाटले. अर्थात ज्यांना कोणत्याही परिस्थितीत पुरस्कार मिळाले पाहिजेच् नाव मिळाले पाहिजेत असे वाटते असे लेखक आपली पुस्तके पाठवतीलही पण खरंच लेखकाचा सन्मानच करायचा तर पुरस्काराची रक्कम वाढवली पाहिजे असे वाटले. सर्वच चांगली पुस्तके मान्यवर प्रकाशन संस्था प्रकाशित करतातच असे काही म्हणता येत नाही. काहींना पुस्तकासाठी स्वत:च फार मोठा खर्च कारावा लागतो. भाग्य उजळलेच एखाद्या लेखकाचं तर, तो पुरस्कार किमान सन्मानजन्य असला पाहिजे. लेखकांचा अपमान करणारा तरी किमान नसावा असे माझे स्पष्ट मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 16/11/2023 - 17:57
तो पुरस्कार किमान सन्मानजन्य असला पाहिजे. लेखकांचा अपमान करणारा तरी किमान नसावा असे माझे स्पष्ट मत आहे.
प्रतिसादातील ह्या वाक्याशीच नाही तर प्रत्येक शब्दाशी सहमत आहे! पुरस्काराची रक्कम नगण्य आहे तेही एकवेळ ठिक पण ज्यांच्या नावे हे पुरस्कार दिले जाणार आहेत ते 'कै. सर्जेराव माने' आणि 'कै. इंदुमती कोकाटे पाटील (बाबी)' हि महान व्यक्तीमत्वे नक्की आहेत तरी कोण? साहित्य किंवा अन्य कुठ्ल्या क्षेत्रात त्यांनी काय भरिव कामगीरी केली आहे हे देखील स्पष्ट केले असते तर ह्या पुरस्काराला काही प्रतिष्ठा आहे कि नाही हे वाचकांना ठरवता आले असते, तसेच हे पुरस्कार आपल्याला मिळाल्यास आपली प्रतिष्ठा वाढेल असे लेखकांना वाटु शकले असते. गल्ली बोळात भरणाऱ्या 'अंडरआर्म बॉक्स क्रिकेट' सारख्या टुकार क्रिडा स्पर्धांनाही ५१०००, २१००० आणि ११००० अशी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यासाठी आयोजकांना प्रसिद्धीलोलुप पुरस्कर्ते सापडण्यास अडचण येत नाही आणि इथे लेखकांनी ११०० रुपयांचा पुरस्कार आणि सन्मानपत्र मिळवण्यासाठी त्यांच्या 'प्रकाशित झालेल्या कथासंग्रह व कादंबरीच्या प्रत्येकी दोन प्रती व आपला अल्प परिचय खालील पत्त्यावर पाठवावे' वगैरे अपेक्षा ठेवणे हे फार विचित्र वाटत आहे. असो, वर तुम्ही म्हणाला आहात त्याप्रमाणे "ज्यांना कोणत्याही परिस्थितीत पुरस्कार मिळाले पाहिजेच् नाव मिळाले पाहिजेत असे वाटते असे लेखक आपली पुस्तके पाठवतीलही" असे लोक आपल्या प्रवेशिका पाठवतीलही!

In reply to by टर्मीनेटर

गवि 16/11/2023 - 18:48
आणि इथे लेखकांनी ११०० रुपयांचा पुरस्कार आणि सन्मानपत्र मिळवण्यासाठी त्यांच्या 'प्रकाशित झालेल्या कथासंग्रह व कादंबरीच्या प्रत्येकी दोन प्रती व आपला अल्प परिचय खालील पत्त्यावर पाठवावे' वगैरे अपेक्षा ठेवणे हे फार विचित्र वाटत आहे.
येथील प्रतिसाद वाचून रास्त वाटले. दोन प्रती समजा २००-२०० रूच्या असतील आणि DTDC किंवा ब्लू डार्टने पाठवल्यास दीडशे दोनशे धरले तर इथेच पाचशे. आणि पुरस्कार घेण्यास कोण्या एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवास म्हणजे आणखी जास्त. त्यामुळे पुरस्कार रक्कम किंचित जास्त ठेवावी ही अपेक्षा रास्त वाटते.

पुरस्कारासाठीचे निकष दोन शब्द. कादंबरीतला वाचकास येणारा अनुभव, कथानक, पात्र, वातावरण, कथनपध्दती व भाषा आणि इतर काही घटकांचा विचार कादंबरीत असतो. कथा - कादंबरी समान असले तरी हे दोन्ही साहित्यप्रकार स्वतंत्र आहेत. कथा हा स्फूट साहित्यप्रकार आहे तर कांदबरी हा दीर्घ साहित्यप्रकार आहे. कथा व कादंबरी यांमधील फरक नुसता दीर्घतेचा, आकाराचा नसून प्रकाराचा आहे. कथेत रचनेचे, अनुभवाचे एककेद्रित्व असते तर कादंबरी ही अनेक केंद्री असते. कादंबरीत अनुभवांच्या अनेकविध घटक असतात, त्यांचा एकमेकांशी संबंध असतो कितीतरी गोष्टी वेगवेगळ्या असतांना एकाच निकषावर दोन्हीतल्या उत्तम प्रकाराची एकाच निकषावर निवड कशी होऊ शकते ? बाय दे वे, पुरस्कार देणारे आपण आहात तेव्हा त्याचे स्वरूप कसे असावे निकष कसे असावे ते आपणच ठरवाल तेही मान्य तो आपलाच अधिकार हेही मान्य. पण एका मिपाकराचा जो स्वभाव आहे त्याला जागावे लागते. आपण हर्ट झाला असाल तर दिलगिरी आहेच. आपणास दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 16/11/2023 - 18:18
निवेदनासाठी धन्यवाद ! पुरस्कार प्रक्रिया आणी पुरस्कारार्थी महोदयांना आगाऊ हार्दिक शुभेच्छा ! आपण नमुद केलेली व्यक्तिमत्वे कै. सर्जेराव माने आणि कै. इंदुमती कोकाटे पाटील (बाबी) यांच्या साहित्याचा आम्हा सामान्य वाचकांना परिचय नाही. तेव्हा यांच्या कार्किर्दीचा आणि साहित्याचा परिचय करुन दिल्यास खुपच समर्पक राहिल. पुनश्च आभार ! (अवांतर : वरिल महोदयांच्या साहित्यावर कुणी रसग्रहणात्मक अथवा विश्लेषणात्मक लिहिले असेल तर ते ही वाचायला आवडेल !)

विनिता००२ 16/11/2023 - 22:34
मिसळपाव ही साहीत्याशी सबन्धित वेब साईट आहे असे वाटुन मी हे निवेदन इथे दिले होते.. पण जी मुक्ताफळे इथे उधळली गेली आहेत ते पहाता एखाद्या पुरस्काराची किंमत केवळ त्याच्या रकमेवरुन किंवा ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जात आहेत त्यावरुन ठरवावी ?? ते पण त्यांची काहीही माहीती नसतांना?? सर्जेराव माने माझे वडिल होते. त्यांना वाचनाची फार आवड होती. तसेच मला लिहीण्याची प्रेरणा जिच्याकडुन मिळाली ती माझी बाल विधवा मावशी बाबी होती. अर्थात त्यांच्यासाठी मला जे काही करता येत आहे ते मी करते आहे. पुरस्कार नक्कीच चान्गल्या लेखकाला मिळेल, ते पण नाव किंवा चेहरा पाहुन नाही तर साहीत्याचा दर्जा पाहुन...पैसे भरुन जे पुरस्कार मिळतात त्यातच तुम्हांला आनंद वाटतो आहे असे एकंदरीत दिसते आहे. तसेच दारोदार देणग्यांची भीक मागुन दिले जाणारे पुरस्कार तुम्हांला भुषण वाटत असतील कदाचित....मला नाही..जी रक्कम दिली जाणार आहे ती माझा कष्टाच्या कमाईतुन दिली जाणार आहे. माझ्या आणि एका चान्गल्या लेखकासाठी दर्जा पहुन मिळालेला पुरस्कार नक्कीच गौरवास्पद असेल. बाकी तुमच्या कुठल्याही अर्थहीन कमेंट्ना उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही.

In reply to by विनिता००२

आम्ही म्हणजे मी आणि काही मिपाकरांनी लेखकांच्या बाजूने लिहिले आणि काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यामुळे ती जरी 'मुक्ताफळे' असली तरी त्यावरुन नाराज होऊ नका. आपल्या संस्थेचा व्याप मोठा असेल असे वाटल्यामुळे ती रक्कम मोठी असली पाहिजे, अशी एक अपेक्षा होती कदाचित ती चुकही असू शकते. उलट आपण ज्यांचे स्मरण व्हावे म्हणून 'अकराशे' रुपये ठेवत आहात त्या व्यक्ती आपल्यासाठी सर्वोच्च आहे, ते कळल्यामुळे तर आता खरंच ती रक्कम कमी वाटली आहे, ही रक्कम अजून काही काळ वाट पाहून अधिक करता आलीही असती, करताही येईल. रक्कम महत्वाची नसली तरी 'सन्मान' हा दोन्ही बाजूंनी 'मोठा' वाटला पाहिजे. आपल्या सर्वांचेच पैसे मेहनतीचे असतात. बाकी, कधी कधी देणग्याही महत्वाच्याच असतात. देणग्यांमुळे पुरस्काराची रक्कम वाढणार असेल आणि कोणी देणगी देणार असाल तर, तर देणगी नक्की घ्या असे एक वाचक म्हणून सुचवतो. भले आपण त्याला 'भिक' म्हणत असला तरी सार्वजनिक उपक्रमात आणि असे साहित्यिक उपक्रम यशस्वी व्हावे यासाठी अशी मदत लागतच असते त्यामुळे आपली भाषा योग्य वाटत नसली तरी आपल्या मताबद्दल आदर आहे. अर्थहीन कमेंट्सना आपण उत्तरे देऊ नका. पण मी आणि इतर वाचकांनी मांडलेली मतं इतकीही गैर नाहीत, तेव्हा करता आला तर सकारात्मक विचार करा किंवा सोडून द्या. रागावू नका. इतकीच नम्र विनंती. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 17/11/2023 - 10:14
शब्दा शब्दाशी सहमत. काही सूचना सकारात्मक घेतल्याने लेखकांसाठी हा पुरस्कार अनुभव अधिक आनंददायक करण्याची संधी अशा वेळी मिळून जाते. तसे न करता दुखावून निघून जाणे आणि त्या सल्ल्यांचे मूल्य गमावणे असे करू नये अशी विनंती. बाकी नकळत काही दुखावले गेले असल्यास दिलगिरी आहेच. काही मोठ्या संस्था काहीही मानधन न देता केवळ मानद पुरस्कार किंवा व्याख्यान देण्यास निमंत्रित करतात. तिथे बोलावले हाच सन्मान असतो. पण हे एखाद्या संस्थेच्या सुरुवातीच्या काळात सहसा नसते. अनेक दशके आपला ठसा निर्माण करून हे शक्य होते (उदा रोटरी किंवा तत्सम). अशा प्रकारच्या संस्थेइतकी तुमची संस्थाही भविष्यात नावारूपास येवो अशी सदिच्छा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनिता००२ 19/11/2023 - 18:16
डॉक्टर, तुमच्याबद्दल आदर आहे, म्हणून उत्तर देते आहे. हे ह्या उपक्रमाचे पहिले वर्ष आहे, यात अजुन सुधारणा नक्कीच होईल. आत्ता इतर सदस्यांचे जे प्रतिसाद आले आहेत, तो विचार आधीच्या प्रतिसादा आधी केला असता तर मला जो त्रास झाला तो झाला नसता. सजेशन मी नक्कीच स्वागतार्ह मानते, पण ते सांगण्याची एक पध्दत असते. दुसर्यांच्या भावनांचा अपमान करुन, त्यांना कष्टी करुन, तुम्ही अपेक्षा कराल तर ते होणार नाही. जाहीर केलेली रक्कम माझ्या दृष्टीने रास्त आहे. ऋण काढुन सण करायचा नाही हे मी वडिलांकडुनच शिकले आहे. मला जेवढे झेपेल तेवढेच ओझे मी उचलते. त्याचा भार होउ नये.. नाहीतर त्यातली मजा, आनंद निघुन जातो. बाकी पुरस्कार जाहीर करुन, मग सभासद फी मागणे, एक रक्कम जाहीर करुन कमी रक्कम पाकीटात देणे असले प्रकार माझ्या संस्थेत होणार नाहीत. देणग्यांचे म्हणाल तर त्यासाठी संस्थांनी लोकांचे उंबरे झिजवलेले मी पाहीले आहे, पाहते आहे. वर्षात एकदा मिळणार्‍या काही नोटांच्या बदल्यात आयुष्यभराची मिधेंगिरी घ्यावी लागते. पिंपरी चिंचवड मधील सर्व संस्थांचे कामकाज मी पाहीलेले आहे. मला ते जमणार नाही. आपल्या साहीत्याला कुठल्याही वशिल्या शिवाय पुरस्कार मिळतो याचा आनंद एक मनस्वी लेखकच समजु शकतो. त्याचा आनंद मला अनुभवायचा आहे. बरेच चांगले लेखक ह्या उपक्रमाची दखल घेत आहेत याचा आनंद आहे. मागिल दोन वर्शात मी बर्यापैकी कामे सुरु केली आहेत. आमचा दर्जा आणि कामाची पध्दत याची पोचपावती मला मिळते आहे.

In reply to by विनिता००२

नठ्यारा 20/11/2023 - 14:03
विनिता००२, बिनपैशांचा म्हणजे मानद स्वरूपाचा पुरस्कार देता येईल काय? पैसे म्हंटले की काही अपेक्षा जागृत होतात. हे मी काय लिहिलंय ते मला नेमकं समजावून सांगता येत नाही. पण कोणाला तरी हे समजेल असं मला वाटतं. मी या क्षेत्रातला तत्ज्ञ नाही. मला साहित्य आणि पुरस्कार वगैरे विषयांत अजिबात गती नाही. मी कुठलीही संस्था चालवलेली नाही. मी सर्वार्थाने तृतीयपक्षी बघ्या आहे. पैसे म्हंटल्यावर अपेक्षा जागृत होणे हे अशाच एका बघेपणाचं लक्षण आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by विनिता००२

रामचंद्र 19/11/2023 - 21:34
या पुरस्कारासाठी फक्त कामगार/नोकरी करणाऱ्या महिला/अविकसित ग्रामीण भागातील/प्रथमच प्रकाशित इ. अशांपैकीच साहित्यिकांच्या साहित्यातूनच निवड करून पुरस्कार जाहीर केला तर बक्षिसाची रक्कम अल्प असूनही किमान प्रसिद्धी मिळून त्यांच्या पुढील साहित्यप्रवासाला कौतुकाचे दोन शब्द लाभल्यासारखं तरी साध्य होईल असे वाटते. इंटरनेट, फेसबुकमुळे प्रसिद्धी अप्राप्य राहिली नसली तरी मिपासारख्या संकेतस्थळांवरून जाणकार वाचकांपर्यंत पोहोचता येईल हा लाभ काही कमी नाही. आणि खरोखरच चांगली निवड असेल तर आपल्या उपक्रमाचीही योग्य दखल नक्कीच घेतली जाईल.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 20/11/2023 - 15:14
इंटरनेट, फेसबुकमुळे प्रसिद्धी अप्राप्य राहिली नसली तरी मिपासारख्या संकेतस्थळांवरून जाणकार वाचकांपर्यंत पोहोचता येईल हा लाभ काही कमी नाही.
कल्पना स्वागतार्ह, पण पुस्तक व्यवहार हा सध्या छापील माध्यमांशी जास्त संबंधीत आहे. अशी उदाहरणे आहेत की लेखक आधी मिपावर लिहितात आणि मग प्रकाशित (छापील माध्यमांद्वारे) करतात. मिपासारख्या संकेतस्थळांवरून वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी या स्पर्धेचा वापर कितपत करतील ही शंका वाटते.

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 22/11/2023 - 23:11
पुस्तक व्यवहार हा सध्या छापील माध्यमांशी जास्त संबंधित आहे... खरं आहे. याबाबत मिपाकरांकडून काही उपयुक्त आणि अभिनव कल्पना सुचवल्या जातील अशी अपेक्षा. मागेही याच आयडीकडून मराठी साहित्य वाचनासाठी ऑडिओ संदर्भात काही विचारणा केली होती असं आठवतं. त्याबाबत मिपाचा किंवा अन्य कुठला कसा अनुभव होता, काही शिकायला मिळालं का, अशी माहिती इथं प्रसिद्ध केली तर तीही उद्बोधक असेल. कारण साहित्यसंबंधी वेगवेगळ्या उपक्रमांच्या बऱ्यावाईट अनुभवांवर इथं चर्चा होत असते.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 23/11/2023 - 12:49
मराठी साहित्य वाचनासाठी ऑडिओ संदर्भात काही विचारणा केली होती असं आठवतं. त्याबाबत मिपाचा किंवा अन्य कुठला कसा अनुभव होता, काही शिकायला मिळालं का, अशी माहिती इथं प्रसिद्ध केली तर तीही उद्बोधक असेल.
अतिशय छान सुचवणी +१ अश्या माहितीचे हार्दिक स्वागत !

In reply to by विनिता००२

चौथा कोनाडा 17/11/2023 - 13:14
अ‍ॅड्मिन, कृपया हे निवेदन अजिबात डिलीट करू नये ही कळकळीची विनंती ! मिपा हे मराठी मनं व्यक्त होण्यासाठीचं खुलं व्यासपीठ आहे. इथं वेळोवेळी विविध विषयांवर वैचारिक अभिसरण होत असतं ! प्रस्तुत निवेदन काही सभासदांना खटकलं ! त्यांनी मांडलेले मुद्दे रास्त वाटले, निवेदनकर्त्याने त्यांची बाजू मांडली. तीही प्रांजळ वाटली आपल्या सहस्वासातील सहवासातील साहित्य प्रेमींच्या नावे असा पुरस्कार देणे हे खरंच कौतुकास्पद आहे त्याबद्दल त्या अभिनंदनस पात्र आहेत ! किंबहुना हा आदर्श आपण डोळ्यांसमोर ठेवून असे उपक्रम आयोजित करू शकतो किंवा अशा उपक्रमात सहभागी होऊ शकतो ! त्यांची बाजू मारताना त्या पुरस्कारांची व्यवहार्य बाजूचा फारसा विचार केलेला दिसत नाहीये असे जाणवले, आणि तेच मुद्दे सभासदांनी मांडले. असो. निवेदनकर्त्याने इथे येऊन त्यांची बाजू मांडली हे मला सभासद म्हणून खूपच छान आणि अतिशय महत्त्वाचे वाटले. त्यांनी इथे येऊन त्यांची बाजू मांडली नसती तर एकतर्फी चर्चा झाली असती मी मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटला ! (फक्त माझे वैयक्तिक मत असे की निवेदनकर्त्याने त्यांची बाजू मांडताना असा फणकाला दाखवायला नको होता. आणि मिपा साइटवर परत कधी येणार नाही असा विचार व्यक्त करायला नको होता ! अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे) त्यामुळे एडमिनला नम्र विनंती एक रुपया हा धागा कृपया डिलीट करू नये ! निवेदनकर्त्याने देखील मिपा सोडून जाण्याची भाषा करू नये, उलट या क्षेत्रात मिपाद्वारे कसा सहभाग आणखी वाढवता येईल हे बघावे ही नम्र विनंती ! अशा उपक्रमात मिपाकरांचा सहभाग आणि सल्ला मिळाला तर निवेदनकर्त्याचा उपक्रम आणखी मोठा होईल आणि आणखी मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल असे वाटते. उपक्रमास मनापासून हार्दिक शुभेच्छा !

In reply to by चौथा कोनाडा

त्यामुळे एडमिनला नम्र विनंती एक रुपया हा धागा कृपया डिलीट करू नये ! एडमीनना एक रूपया देऊन धागा डिलीट करू नये अशी विनंती करताय?? एक रूपया फक्त?

टर्मीनेटर 16/11/2023 - 23:01
अ‍ॅड्मिन, कृपया हे निवेदन डिलीट करावे ही विनंती
निवेदनच नाही तर हा मिपाच्या धोरणात न बसणारा जाहिरातपर धागाच डिलीट करावा ही मी अ‍ॅडमीनला विनंती करतो!

In reply to by टर्मीनेटर

सर टोबी 17/11/2023 - 10:57
बिरुटे सर आणि गवि या धाग्यावर उपस्थित असतांना धागाच डिलिट करावा ही सुचना आगाऊपणाची आणि खासकरून महिला सदस्याचा उपमर्द करणारी वाटते.

टर्मीनेटर 17/11/2023 - 12:10
धागाच डिलिट करावा ही सुचना आगाऊपणाची आणि खासकरून महिला सदस्याचा उपमर्द करणारी वाटते.
Lol... निवेदन डिलिट करावे अशी विनंती खुद्द त्या महिला सदस्यानेच केली आहे. तरीही त्या विनंतीला दुजोरा देत मी केलेली विनंती आपल्याला 'आगाऊपणाची' सुचना आणि 'महिला सदस्याचा उपमर्द करणारी' वगैरे वाटली असल्यास वैचारिक स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता/समर्थक असल्याने मला त्यातही काही गैर वाटले नाही 😀

नठ्यारा 17/11/2023 - 13:35
अवांतर : एक व्याकरणीय शंका आहे. एखाद्या स्त्रीचा वा सदस्यानामाचा उपमर्द कसाकाय होऊ शकतो? तिची उपस्त्री अथवा उप + औरत = उपावरत होईल ना? -नाठाळ नठ्या

सर टोबी 17/11/2023 - 14:23
सहसा ज्यांना माझा प्रतिसाद पटत नाही त्यांना काही समजावण्याच्या अथवा पटवून देण्याच्या फंदात मी पडत नाही. आपापल्या भूमिकेवर ठाम असण्यात काही गैर नसते. पण इथे संपादक मंडळ हि नियामक जबाबदारी आहे कि प्रशासकीय जबाबदारी आहे हा समजुतीचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसते. माझ्या मते संपादन करणे नि नियामक जबाबदारी आहे आणि सदस्य एखादा धागा अथवा प्रतिसाद 'नियमबाह्य' आहे कि नाही ते तपासण्याची विनंती करू शकतात. इथे अमुक एक गोष्ट नियमात बसत नाही असा निर्देश दिल्याबद्दल झाला प्रकार आगाऊपणाचा आहे असे मी म्हटले. तसेच धागा काढून टाका असे सांगण्यामध्ये कुणाचा तरी सन्मान तर नक्कीच नसतो त्यामुळे संबंधित प्रतिसाद चांगला नाही असे समजण्यात अडचण नसावी. धोरणं हे सर्वसाधारण निर्देशक असतात आणि चालू परिस्थिती कधी कधी धोरणांच्या सीमांचा आपण पुनर्विचार करावा याची आपल्याला जाणीव करून देत असते. त्यामुळे अव्यावसायिक आणि साहित्याशी संबंधित एखाद्या कामाला आपण जाहिरात म्हणणार आहोत का हेही यानिमित्ताने ठरविले जावे.

मला आधी ११०० वाचून वाटलं होतं की चुकून एक शून्य द्यायचा राहीला असावा. पण खाली विनीता मानेंचं स्टेटमेंट पाहून कळालं की ११०० च आहेत. पुरस्काराची रक्कम फारच तोकडी आहे. वडीलांसाठी नी आपल्या मावशीसाठी फक्त ११०० रूपयांचं बक्षीस ठेवावं हे काही पटलं नाही. कुणी खरंच कादंबरी पाठवेल का ही देखील शंका आहे. किंवा २२०० रूपयांत आठ दहा हजारांच्या कथा कादंबर्या जमा कराव्यात नी वाचाव्यात अशी आयड्या वापरली गेली असावी का? असेही वाटतेय. असो. माझी ना कथा प्रसिध्द झालीय ना कादंबरी. माझ्या नशीबात २२०० रूपयांचं भरघोस बक्षीस नाही. :( - अमरेंद्र बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

विजुभाऊ 23/11/2023 - 11:21
एका गृहस्थानी दिवाळी अंक स्पर्धा जाहीर केली होती ( मी मुद्दामच नाव घेत नाहिय्ये) त्यानी दहा हजार रुपये ( पाच, तीन आणि दोन हजार ) रोख आणि मानपत्र असे पुरस्कार जाहीर केले. त्यांच्या कडे स्पर्धे साठी असे दोनशे पंधरा दिवाळी अंक आले. यात अनेक मान्यवर दिवाळी अंक देखील होते. एकूण छापील रक्कम पाहिली तर वीस हजाराच्या वर त्या दिवाळी अंकांची किम्मत जात होती ( तो वेगळा मुद्दा आहे) स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. ते व्हॅट्स अ‍ॅप वर आले. ज्या दिवाळी अंकाना बक्षीसे मिळाली ती ( वडाचा कोंड जिल्हा रत्नागिरी , नंदूरबार आणि भिवडी ( वणी चंद्रपूर ) या गावांतून प्रकाशीत ( ?) झालेले होते अंकांची नावे कधी ऐकिवाताली नव्हती . ज्याना मानपत्र पुरस्कार मिळाले ती नावे ऐकण्यातली होती. पण अशा रितीने त्या गृहस्थांस दोनशे पंधरा दिवाळी अंक किरकोळ पैसे ( मानपत्र छापण्याचे ) खर्चून घरपोच वाचावयास मिळाले. तसेच त्या नंतर त्यानी दिवाळी अंकाची लायब्ररी देखील सुरू केली होती ( ही कल्पना वाटली तरी ती प्रत्यक्षात आलेली आहे )

चौथा कोनाडा 23/01/2024 - 17:24
राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी आवाहन..... ------------------------------------------------------ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत. कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य या तीन साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार 1) सदाशिव धों. जठार यांचे स्मरणार्थ (₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) 2) आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ (₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) 3) दोन विशेष पुरस्कार (शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार 1) यशवंत आ. इंदुलकर यांचे स्मरणार्थ (₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) 2) सरस्वती य. इंदुलकर यांचे स्मरणार्थ (₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) 3) दोन विशेष पुरस्कार (शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार 1) दत्तात्रय स. जठार यांचे स्मरणार्थ (₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) 2) तातोबा द. पोवार यांचे स्मरणार्थ (₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) 3) आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ (₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) 4) तीन विशेष पुरस्कार (शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) ------------------------------------------------------ * पुरस्कार वितरण * 20/5/2024 इ. रोजी होईल. ------------------------------------------------------ लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय दि. 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा रितीने खालील पत्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी संपर्क लेखक - बा. स. जठार 98 50 39 39 96 94 20 43 62 56 ------------------------------------------------------ पुस्तके पाठवणेचा पत्ता सौ. रंजना बा. जठार विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर - 416209 ------------------------------------------------------ (कृपया सदर आवाहन इतर ग्रुपवर प्रसिद्ध करावे.)

सस्नेह नमस्कार, 'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथासंग्रह / कादंबरी ह्या साहित्यकृतीचा गौरव करावा आणि मराठी साहीत्यिकांना प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’ ने खालील पुरस्कार देण्याचे योजिले आहे. १. कै. सर्जेराव माने स्मृती कादंबरी पुरस्कार २. कै.