मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

पराग१२२६३ ·
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.

रखमाई

मी-दिपाली ·
“ मून पे कदम रखनेवाला पहला इंसान कौन था ?” लेक्चर हॉलमध्ये प्रोफेसर विरू सहस्रबुद्धे उर्फ व्हायरसने प्रश्न विचारताच एकापाठोपाठ अनेक आवाज ऐकू येतात उत्तरादाखल, “ नील आर्मस्ट्रॉंग, सर. ” “ obviusly he was, we all know it. लेकिन दुसरा कौन था ? ” “.....” विचाराला फारसा अवधीही न देता लगेचच व्हायरसचं पुढचं वाक्य कानावर पडतं, “ Don't waste your time, it is not important. Nobody remembers the man whoever came second..” ‛थ्री इडियट्स' चित्रपटातील हा प्रसंग. असंच काहीसं ‛दुसरेपणाचं’ नशीब घेऊन जन्माला आलेलं एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे ‛डॉ. रखमाबाई राऊत' ! डॉ.

रेल्वे रिटायरिंग रूम्स

अक्षय देपोलकर ·
रेल्वेचा प्रवास म्हणजे अस्वच्छ अशी छबी पुसून काढणाऱ्या अनेक गोष्टींपैकी अजून एक गोष्ट म्हणजे जंक्शनसारख्या ठिकाणी दिसणाऱ्या रेल्वे रिटायरिंग रूम्स.डिलक्स आणि डॉर्मिटरी प्रकारात सदर रूम उपलब्ध असतात. तीन तासापासून ते चौवीस तासापर्यंत आपल्या गरजेनुसार बुक करू शकता. फ्रेश होण्यासाठी दोन्ही प्रकारात स्वच्छ बाथरूम, टॉयलेट आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय असते. डिलक्स रूम ३ तासासाठी ५०० रुपये आणि डॉर्मिटरी बेड ३ तासासाठी १८० रुपये एवढा नाममात्र दर* आहे. आपल्या गरजेनुसार (३,६,१२,२४ तास) रूम किंवा बेड बुक करू शकता.रूम बुक करताना तिकिटाचा पीएनआर नंबर आणि ओळखपत्र द्यावं लागतं.

मेकॅनिकल इंजिनीअरिंगची ओळख

केदार भिडे ·
आता १२वी च्या परीक्षा सुरु होतील आणि त्यानंतर विविध प्रवेश परीक्षा होतील. जून महिन्यापासून उच्च शिक्षणाच्या प्रवेशांना सुरुवात होईल. तत्पूर्वी Mechanical Engineering या विषयाची माहिती देणारे हे PPT तयार केले आहे. YouTube वरील विडीओ लिंक खाली दिली आहे. ११-१२वीतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकरता हे तयार केले आहे. ही Mechanical Engineering या विषयाची जाहिरात नव्हे. Mechanical Engineering मध्ये केवळ काय आहे याची ओळख करून दिलेली आहे. बर्याचदा १२वी नंतरच्या choices या दूरचे भाऊ बहीण, नातेवाईक, शेजार पाजारची मोठी मुले, हवेतल्या गप्पा, खाजगी शिकवणी चालक आणि त्यांच्या जाहिराती यांवरून ठरतात.

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har ·
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला'

चित्रगुप्त ·
पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.अशा या रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे. . टायबर नदीवरील अनेक पुलांपकी एक. पलीकडे सेंट पीटर्स कॅथेड्रल दिसते आहे.

३० वर्षांपासून अखंडित....

पराग१२२६३ ·
संग्रह सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही.

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

पराग१२२६३ ·
VB प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.

उत्कृष्ट मराठी कथासंग्रह / कादंबरी पुरस्कार २०२३

विनिता००२ ·
सस्नेह नमस्कार, 'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथासंग्रह / कादंबरी ह्या साहित्यकृतीचा गौरव करावा आणि मराठी साहीत्यिकांना प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’ ने खालील पुरस्कार देण्याचे योजिले आहे. १. कै. सर्जेराव माने स्मृती कादंबरी पुरस्कार २. कै.