रेल्वे रिटायरिंग रूम्स
रेल्वेचा प्रवास म्हणजे अस्वच्छ अशी छबी पुसून काढणाऱ्या अनेक गोष्टींपैकी अजून एक गोष्ट म्हणजे जंक्शनसारख्या ठिकाणी दिसणाऱ्या रेल्वे रिटायरिंग रूम्स.डिलक्स आणि डॉर्मिटरी प्रकारात सदर रूम उपलब्ध असतात.
तीन तासापासून ते चौवीस तासापर्यंत आपल्या गरजेनुसार बुक करू शकता. फ्रेश होण्यासाठी दोन्ही प्रकारात स्वच्छ बाथरूम, टॉयलेट आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय असते. डिलक्स रूम ३ तासासाठी ५०० रुपये आणि डॉर्मिटरी बेड ३ तासासाठी १८० रुपये एवढा नाममात्र दर* आहे. आपल्या गरजेनुसार (३,६,१२,२४ तास) रूम किंवा बेड बुक करू शकता.रूम बुक करताना तिकिटाचा पीएनआर नंबर आणि ओळखपत्र द्यावं लागतं. रेल्वे स्टेशन मध्येच रूम असल्यामुळे वेळ पण वाचतो हॉटेल शोधायचा आणि स्वस्तात सोय पण होते म्हणून पुढील प्रवासात नक्की उपयोग करा.
(दोन वेगवेगळ्या ठिकाणी सदर सोय वापरून चांगला अनुभव आल्यामुळेच लिहीत आहे)
*(दर रेल्वे स्टेशनप्रमाणे कमी जास्त असू शकतात अंदाज यावा म्हणून बडोदा येथील दर दिलेले आहेत)
-अक्षय देपोलकर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतील.
हो नक्कीच...
ओफ लाईन बुकिंग नेहमीच्या
कंजूसजी..
सात-आठ वर्षांपूर्वी
आपण एकटे असू आणि काही सामान