बचत हे आम्हा मध्यमवर्गीयांचं आमरण व्यसन. पैसे वाचवले याचा आनंद काही वेगळाच असतो. बरोबरच आहे. आपला कष्टाचा पैसा उगाच का दवडायचा?
निवृत्तीनंतर वेळ भरपूर, शिवाय मिळकत बंद! आम्ही खाजगी क्षेत्रातले मजूर त्यामुळे पेन्शन नाही, फक्त टेशन. सबब काहीही खरेदी करायचं झालं तर वाण्यापासून अनेक ऑन लाईन विक्रेत्यांच्या किमती पडताळून पाहायच्या. जो स्वस्त तो आपला. कालंच घरातला तेलाचा बुधला संपला आणि राखिव बुधला वापरात आणला गेला. म्हणजे तेल विकत घेणे आले.
तपासाअंती अॅमेझॉन फ्रेश वर ९९९ चा बुधला ६९९ रुपये हा सर्वात स्वस्त दर आढळून आला. मागणी नोंदवणार तेवढयात डोक्यात किडा वळवळला.