मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

माहिती हवी आहे - प्रि -अ‍ॅप्रुव्ह्ड होम लोन

पर्नल नेने मराठे ·
प्रि -अ‍ॅप्रुव्ह्ड होम लोन बद्दल सविस्तर माहिति हवी आहे. धन्यवाद, आपली

50 First Dates आणि गोजिरी

परिकथेतील राजकुमार ·
काल दुपारी मस्त '१४०८' हा भयपट पहात बसलेलो असतानाच एक मैत्रिण आली. भयपटाची तिला बिलकुलच आवड नसल्याने आणि मुख्य म्हणजे ती २/२.३० तास मुक्काम ठोकण्याच्या इराद्यानेच आलेली असल्याने मग 'एखादा मराठी पिक्चर लाव रे !' अशी फर्माईश आलीच. मग इकडे तिकडे शोध घेत असतानाच अचानक कधितरी कॉपी करुन ठेवलेला 'गोजिरी' चित्रपट हाताला लागला. (भवतेक मकीच्या कडुन मिळाला असावा. खात्री नाही) चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे.

I bet तुम्ही कधी हे पाहीले नसेल - भाग ४

शानबा५१२ ·
फोटोत कैद झालेले भुत/आत्मा. विशेष नोंद : १) मुळ छायाचित्र प्राप्त झाले त्याच अवस्थेत ईथे प्रकाशित करण्यात आले आहे.त्यात तसुभरही बदल केला गेला नाही. २) हा लेख लिहण्या मागच्या उद्देशाबद्दल साशंक असलेल्या सदस्यांनी 'ते काय आहे?' ह्यावर भाष्य करावे. ३) हा काय प्रकार आहे हे कळण्यात आपली मदत अपेक्षित आहे,तेव्हा प्रतिसाद लेखासंबंधीतच असावेत. ४) आम्हाला कल्पना आहे की लेख थोडा करेशाटम आहे,पण आपण आपले मत सांगावे ही माफक अपेक्षा ठेवत आहे.

अरुंधती !!

अनिल हटेला ·
नमस्कार मिपाकर्स !! गेले २-३ दिवस गणपाभै नी टाकलेल्या भयपटा च्या धाग्यावर वेगवेगळे प्रतीसाद वाचले.अजुनही धागा पहील्या पानावरच आहे.आलेले सारे प्रतीसाद हा लेख लिहुन (हो ! हो !

सफर कलाडगड, कुंजरगड, भैरवगड आणि पाबरगडाची

बज्जु ·
श्रावण आणि भाद्रपदातील पुजांच्या धावपळीमुळे ऒगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळ्जवळ दोन-अडीच महिने ट्रेक झाला न्हवता. पित्रुपक्षात पंधरा दिवस आराम असल्याने आणि गिरीषला २ ऒक्टोबरला गांधीजयंतीची सुट्टी रविवारला जोडुन आल्याने लगेच कलाड्गड, कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असा ट्रेक ठरवुन टाकला. ट्रेकला मेंबर दोनच मी आणि गिरीष साठे. दोघेच जण असल्याने अर्थातच बाईकने जायचे ठरले. २ तारखेला पहाटे लवकर निघायचे असल्याने १ ऒक्टोबरला संध्याकाळीच गाडीत पेट्रोल भरुन ठेवले आणि थोडेसे ड्रायफ़ुड घेऊन ठेवले होते. सॆका रात्रीच भरल्या.