Skip to main content

मी, बाटली आणि देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/11/2010 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप! पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.

दि. १७ नोव्हेंबर, सिंह राशीतला उल्कावर्षाव!

लेखक असुर यांनी मंगळवार, 16/11/2010 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, उल्कावर्षावावर लिहून बरेच दिवस झाले. अदितीतै, चतुरंगकाका आणि घासकडवी गुर्जींनी सुचवल्याप्रमाणे त्यात अजून थोडी भर घालायचा हा एक प्रयत्न! उल्कावर्षाव पहायचे अनेक मौके वर्षभर आपणास मिळतच राहतात. पण काही उल्कावर्षाव असे असतात की ते टाळून किंवा चुकवून चालतच नाही मुळी! अशाच प्रसिद्ध वर्षावांपैकी एक म्हणजे सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव! १७ नोव्हेंबर ही त्या उल्कावर्षावाची मुख्य तारीख मानली जाते.

अनंतमुखी मुशर्रफ

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 14/11/2010 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
अनंतमुखी मुशर्रफ आपण ब्रह्मदेवाला चार तोंडे आहेत असे आपण मानतो व म्हणून त्याला ‘चतुरानन’ म्हणतो. तसेच लंकापती रावणाला दहा तोंडे होती म्हणून त्याचा उल्लेख ‘दशानन’ असा केला जातो. पण मुशर्रफ इतक्यांदा आपली निवेदने बदलतात कीं त्यांना किती तोंडे आहेत हा एकाद्या संशोधनाचाच विषय व्हावा! "या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे" त्यांचे चातुर्य पहाता त्यांना एका वेगळ्याच अर्थाने "चतुरानन ("चतुर+आनन)" म्हटले पाहिजे. एका पाठोपाठ परस्परविरोधी निवेदने करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाहीं. कसलाही विधिनिषेध न ठेवता ते असे करतात. खरं तर हे गृहस्थ इतके वारंवार रंग बदलतात कीं त्यांना मी तर‘सरडा (Chameleon )’च म्हणतो!

रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 12/11/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेलीओस..

लेखक गवि यांनी गुरुवार, 11/11/2010 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचकांपैकी विमानात खूपदा बसणारे किती असतील माहीत नाही. पण पूर्वीपेक्षा विमान प्रवास आता सहज केला जातो. मला आज तथाकथित साहित्यिक मूल्य नसलेलं काहीतरी लिहिण्याची खूप इच्छा होतेय. म्हणून माझा आवडता विषय विमानाचे अपघात (शुभ बोल ना-या..) घोळवत होतो डोक्यात. त्यात मला काही अपघात असे आठवले की जे खूप विचित्र किंवा वेगळे आहेत. साउंड्ज इंट्रेस्टिंग..?? सायप्रस देशात हेलीओस एअरवेज नावाची विमान कंपनी होती.

बाहुल्यांच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 10/11/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद! वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर मास् कम्युनिकेशन्, पत्रकारिता व कम्युनिकेशन् मिडिया फॉर चिल्ड्रन् या विषयात उच्चशिक्षण घेणाऱ्या सुषमा दातार यांचा बायोडेटा वाचतानाच त्या किती विविध क्षेत्रांमध्ये लीलया संचार करतात याची कल्पना येऊ लागते.

पार्टी गेम्स

लेखक पारुबाई यांनी बुधवार, 10/11/2010 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही पार्टी गेम्स ....तुम्हा सर्वांसाठी. हे खेळ प्रामुख्याने जोडप्यांसाठी आहेत. १.खेळ पहिला=बायकोला दागिने घालणे. पार्टीला यायच्या आधीच यजमानांनी बायकांना जास्तीत जास्त दागिने घालून यायला सांगावे. खेळ सुरु करण्यापूर्वी बायकांनी हे सगळे दागिने एखाद्या ताटलीत घेवून खुर्चीवर बसावे. आणि मग नवर्यानी हे सर्वं दागिने बायकोच्या अंगावर परत घालावेत. जो सगळ्यात आधी सर्वं दागिने बायकोला घालेल तो जिंकला.यात बायकांनी कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. बोलून किंवा एक एक दागिना हातात देवून वगैरे.गुपचूप बसून राहायचे. (अवघड आहे नाही ? आणि नवर्याला सूचना नाही द्यायच्या तर कोणाला द्यायच्या ? ) २.

-आह..हिअर वुई गो....!!

लेखक गवि यांनी मंगळवार, 09/11/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
-वॉच इट.. -वुई आर फिनिश्ड.. - पीट..सॉरी.. -हे व्हॉटस हॅपनिंग हियर? -देअर ही इज..लूक एट हिम...गॉडडॅम्ड दॅट सन ऑफ बिच इज कमिंग. गेट ऑफ.. -मा आय लव्ह यू.. -हिट द वॉटर..हिट द वॉटर...हिट द वॉटर...!!! - ओह फक. धिस कान्ट बी..!!! -दॅट्स इट..आय एम डेड.. -देअर इट गोज..देअर इट गोज..ओह नो..!! -एमी, आय लव्ह यू..!! -माउंटन्स ..!!!!! - आआआ ..अल्लाह अकबर.. -ओह माय गॉड !

क्ष-किरणांच्या शोधाचा वाढदिवस

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 08/11/2010 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्याप्रमाणे आजचा दिवसही गुगलशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. इंटरनेट वापरायचं आहे, इंटरनेटवर काही कुठेतरी वाचायचं आहे आणि गुगल वापरलं नाही हे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य असतं. तसंच आजही काहीतरी धुंडाळताना 'सर्च रिझल्ट्स'च्या डाव्या बाजूला वर गुगलचा चमत्कारिक लोगो दिसला. आज क्ष-किरणांच्या शोधाचा ११५वा वाढदिवस आहे हे गुगलबाबाकडून समजलं. क्ष-किरण सर्वप्रथम शोधले ते जर्मन शास्त्रज्ञ विल्हेम कॉनराद राँतजेन याने, आजचीच तारीख, साल १८९५. आणि या शोधासाठी त्याला नोबेल पुरस्काराची फार वर्ष वाट पहावी लागली नाही, १९०१ साली राँतजेनही नोबेल लॉरिएट झाला.