श्रावण आणि भाद्रपदातील पुजांच्या धावपळीमुळे ऒगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळ्जवळ दोन-अडीच महिने ट्रेक झाला न्हवता. पित्रुपक्षात पंधरा दिवस आराम असल्याने आणि गिरीषला २ ऒक्टोबरला गांधीजयंतीची सुट्टी रविवारला जोडुन आल्याने लगेच कलाड्गड, कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असा ट्रेक ठरवुन टाकला. ट्रेकला मेंबर दोनच मी आणि गिरीष साठे. दोघेच जण असल्याने अर्थातच बाईकने जायचे ठरले. २ तारखेला पहाटे लवकर निघायचे असल्याने १ ऒक्टोबरला संध्याकाळीच गाडीत पेट्रोल भरुन ठेवले आणि थोडेसे ड्रायफ़ुड घेऊन ठेवले होते. सॆका रात्रीच भरल्या.