मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१
आज दिनांक 07/11/2021, रविवार, नाशिक मध्ये मिपाकरांची छोटी भेट (मीनी कट्टा) आयोजित केला गेला. त्याचा हा वृतांत.
आपणास माहित असेलच की मिपाकर नाशिककरांनी गेल्याच महिन्यात मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ साजरा केला होता.
आजचा दिनांक 07/11/2021, रविवार, हा कट्टा अचानक दोन दिवस आधीच ठरला. सकाळी ठरल्या वेळेत योगेश पुराणिक (yogi900), व सचिन बोरसे (पाषाणभेद) मुंबई नाक्यावर हजर झाले. थोड्याच वेळात जानु - सर्वेशसरांचा फोन आला व तेथे पोहोचले. त्याच दरम्यान डॉ. दातरंगे सरांचा फोन आला. ते पण वेळेत पोहोचले. नेहमीप्रमाणे इतर दोन जणांनी येण्याचे कबूल करूनही ऐनवेळी टप्पा दिला.