नमस्कार मंडळी,
या शनिवारी ८ नोव्हेंबरला दक्षिण कॅलिफोर्नियातील पहिला मिसळपाव कट्टा - मराठी वाहिन्यांच्या भाषेत सांगायचे तर - मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी डांबिसकाका सॅन डिएगो मुक्कामी आले असताना त्यांची प्रथम भेट झाली होती. तेव्हाच मुंबई, पुणे, बंगळूर, जर्मनी, अमेरिकेचा पूर्व किनारा आणि बे एरियातील मिपाकरांप्रमाणेच लॉस एंजेलीस - सॅन डिएगो परिसरातही लवकरच एक कट्टा भरवावा अशी मनीषा पिडांकाकांनी बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे मिपावर हाळी देऊन घाटावरचे भट, भाग्यश्री आणि मी यांनी काकांच्या घरी भेटायचं असं ठरवलं.