Skip to main content

आस्वाद

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 29/09/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूच्या फर्माईशीवरून हा लेख लिहीत आहे... धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना... उत्तरायण चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं! 'धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना..' या पहिल्या ओळीत शुद्ध गंधाराचा व शुद्ध रिखभाचा सुंदर संवाद आहे. 'धुंद होते शब्द सारे' तल्या शुद्ध गंधाराला 'भावना' या शब्दातून शुद्ध रिखभाने फार सुरेख होकार भरला आहे. त्यामुळे गाण्याची ही पहिली ओळच फार छान वाटते, फ्रेश वाटते.. वार्‍यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना.. क्या बात है..

अगम्य...!

लेखक प्राजु यांनी सोमवार, 29/09/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज हे असं काय झालंय?? काल पर्यंत तर सगळं ठिक होतं. आज अचानक हे असं?? काहीतरी नक्की झालयं. मी ही अशी .. अशी कधी होते?? आणि माझं पिल्लू... माझा नवरा?? हे असे.. असे कसे झाले?? कुणी केलं हे असं?? हे स्वप्न तर नाही ना?? काल पर्यंत हे असं नव्हतं. आज अचानक सगळंच वेगळं दिसतं दिसतं आहे. का? नक्की कोण बदललं आहे?? मी, लेक की नवरा?? की सगळेच. अरे हे काय?? माझा चेहरा?? हा असा?? आता मला सगळे काय म्हणतील?? मी अशी नव्हते. अशी कशी झाले? सुंदर नसले तरी दिसायला वाईट नव्हते. आणि आज मी अशी काय दिसते आहे?? एखाद्या जोकरसारखी?? माझे केस? माझे इतके सुंदर सळसळीत केस.. असे काय झाले आहेत?

महाराष्ट्र वैभव.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 28/09/2008 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा विचार आणि तोही सांस्कृतिक अंगाने केला तर माझ्या मनात खालील विचार आले. महाराष्ट्राचे तीन बा : ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा. ( मराठीभाषेचे आध्यात्मिक जीवन यांच्याशिवाय कसे बरे समजता येईल?) कदाचित चालतेबोलते विद्यापीठच म्हणा हवे तर. महाराष्ट्राचे तीन बाबा : गाडगेबाबा, बाबा(साहेब) आंबेडकर आणि बाबा आमटे. या तिघांनीही पददलितासाठी आपले जीवन वेचले. महाराष्ट्राचे तीन तात्या : तात्या सावरकर, कुसुमाग्रज आणि आपले आवडते सेनानी तात्या टोपे. महाराष्ट्राचे तीन लाडके क्रीडा खेलाडु : खाशाबा, सुनिल गावस्कर आणि सचिन. आपल्या क्रीडा आयुष्यात अनेक अडचणी सोसुन महाराष्ट्राचे नाव पंचखंडात नेले.

डोक्यात जाणार्‍या जाहिराती

लेखक सुचेल तसं यांनी शनिवार, 27/09/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
शितलनी मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती हा धागा सुरु केला. त्याचबरोबर अशाही काही जाहिराती असतात ज्या अगदी डोक्यात जातात. समोरचा प्रेक्षक मुर्ख आहे, त्याला काही समजत नाही हे गृहीत धरून केलेल्या जाहिराती. मी मला आठवणार्‍या अशा जाहिराती सांगतो; तुम्ही पण तुमच्या डोक्यात जाणार्‍या जाहिराती सांगा. १) हार्पिकः अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून (एवढं पिवळं होऊस्तोवर कोण ठेवेल तसच) डोकं फिरवतात. नेमकी ती जाहिरात जेव्हा जेवायला बसलेलो असतो तेव्हाच लागते २) विसा पॉवर: शंकर-एहेसान-लॉयनी केलेली अतिशय टुकार जाहिरात.

समुद्रपक्षी (प्रकाशचित्रे)

लेखक लिखाळ यांनी शनिवार, 27/09/2008 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! मध्यंतरी जर्मनीच्या उत्तर किनार्‍यावर फिरायला गेलो होतो. त्या बाजूला लहान लहान अशी काही बेटे आहेत आणि त्या बेटांवरील खारी हवा श्वसनाच्या आजारांवर लाभदायी असल्याने बरेच लोक मुक्कामासाठी येत असतात. तेथे फिरताना सर्वप्रथम आपले स्वागत करतो तिथला दीपस्तंभ.
मला तिथे समुद्रपक्ष्यांची काही चित्रे काढता आली. या पक्षाचे सामान्य इंग्रजी नाव आहे हेरिंग गल.

सोलापुरची आणखी एक खासीयत

लेखक पांथस्थ यांनी शनिवार, 27/09/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाजलेले मटण सोलापुरला भाजलेले मटण म्हणुन एक खाद्य प्रकार मिळतो. खाटिका कडुन मटण विकत घ्यायचे. त्याला सांगायचे की भाजुन घेण्यासाठी हवे आहे. म्हणजे तो मटणाचे थोडया वेगळ्या प्रकारे तुकडे करतो आणि चिरा मारुन देतो. बोनलेस पाहिजे असल्यास तसे सांगावे. हे मटण घेउन भाजणार्‍याकडे जायचे. ते लोक मटणाला त्यांचा पारंपारिक घरगुती मसाला लावुन काहि वेळ मुरत ठेवतात (मटणाला चिरा मारल्यामुळे मसाला आतपर्यंत जाण्यास मदत होते - अर्थात खाल्ल्यावर आग किती लागली पाहिजे हे सांगितल्यावर त्यानुसार मसाला लावला जातो).

संयमाची रेघ..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 26/09/2008 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही मीलनाची ओढ होती संयमाची रेघही ओठ नाही त्या गुलाबी दोन होत्या पाकळ्या चुंबताना होत काटेरी जरासा स्पर्शही कामिनीचे रूप पाहू दे मला गे सुंदरी रोखले मी श्वास आणी सोसला आवेगही तारकांचे गूज सांगे रातराणी गंधुनी चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चंद्रही पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही - प्राजु
Taxonomy upgrade extras

आठवण

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 25/09/2008 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यापरी तु निघुन गेलीस,नजरे पुढुनी बघता बघता इथे-तिथे मी शोधीत असतो तुझ्याकडे येणार्‍या वाटा... दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे... दिलास तू जो हात उदासीत, स्पर्श तयाचा आहे घेरुन तुझे प्रेम ही बरसत आहे मनात माझ्या श्रावण होवुन... दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे....
Taxonomy upgrade extras