Skip to main content

वसंत (पादाकुलक)

लेखक चेतन यांनी मंगळवार, 11/11/2008 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
धोंडोपंताच्या अष्टक्षरीने मला भुरळ घातली. लहानपणी ग्रुहपाठ कधीच न करणारा मी सुद्धा या छंदशास्त्राच्या वर्गात ग्रुहपाठ आवडिने करतोय. अष्टाक्षरी किंवा पादाकुलक छंदातला माझा एक प्रयत्न वसंत फुलता दारी नको पंढरीची वारी पानापानातुन वाहे इश्वराची क्रुपा सारी || फुलाफुलातुन नटे स्रुष्टिदेवता ही न्यारी डोळे भरुन पहावी सौदंर्याची खाण सारी || भान हरपून जाते दिसे सुंदर हे रुप मन उल्हासित होइ अनं आनंदित खुप || झाडाझाडांनाही आता नवी पालवी फुटली नव्या युगाच्या स्वागता जणु कातचं टाकली || मन मोहरुन जाते घेता निखळ अस्वाद सारी देवाची किमया आता सर्वत्र अल्हाद || (नवशिका) चेतन
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1561
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया