Skip to main content

आस्वाद

छायाचित्र टीका

लेखक गणा मास्तर यांनी शनिवार, 20/12/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
nikko निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले. अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.

झोका...

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 19/12/2008 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेला उंच वर, नाही थार्‍यावर खाली झरझर, आला झोका.. अंगणी बांधला, झाडाले टांगला मैत्रीने सांधला, एक झोका.. आंदोलने वेडी, निसर्गाची खोडी मारावीशी दडी, घेत झोका.. झुले पाण्यावरी, होडी नी नावाडी वल्ह असे मारी, देत झोका.. गुंजन करीतो, फ़ुलाशी रमतो भवर हसतो, घेत झोका.. पाखरांचे गाणे, आभाळ दिवाणे पाऊस बहाणे, देई झोका.. इंद्रधनुष्य ते, क्षितिजी रंगते भुईला सांधते, देते झोका.. पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग माझे प्रतिबिंब, घेते झोका.. पिकावर जाई, बांधावर गाई मन माझे घेई, पुन्हा झोका.. आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका.. जीवनाचा खेळ, गेला किती काळ नाही त्याचा मेळ, असा झोका.. -

गांधीवाद आणि मराठी साहित्य !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 18/12/2008 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर सध्या वेगवेगळे 'वाद' गाजत आहेत. दहशतवाद, गांधीवाद, अवांतरवाद इत्यादी इत्यादी. सध्या या विचारांनी मिसळपाववरील जनजीवन ढवळून निघाले आहे आणि त्याचा परिणाम मिपावर वावरणार्‍या मंडळींवर होतो, या सर्व विचारांचा परिणाम येथे वावरणार्‍यावर झाला नाही तर नवल वाटावे. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. गांधीविचारांच्या चर्चेवरुन असे दिसते की भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती.

सहज भेट्ली----

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 17/12/2008 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर ओळ्ख पटुनी गाली बर्‍याच दिवसानंतर रंग रेशमी उधळून आले नभात दाटे लाली क्षीतिजावरचे मुग्ध चांदणे फुलुनी आले गाली आनंदघन संध्या झाली बर्‍याच दिवसानंतर सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर उपचाराच्या मोडूनी सीमा हाती घेतला हात वळ्णावरती अवघड वेड्या सहज देशील साथ? गडबडली आणि लाजली मान घातली खाली त्या मौनाचा अर्थ सांगण्या कोकीळ धाउन आली आनंदाची उधळ्ण झाली बर्‍याच दिवसानंतर सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर
Taxonomy upgrade extras

खेळ दोन ओळींचा - ३

लेखक राघव यांनी बुधवार, 17/12/2008 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मागल्यावेळी सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! बघुयात कसे काय जमते ते!! शुभेच्छा. :) मुमुक्षु

कोकणवारी

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 17/12/2008 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षांखाली कोकणात गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो इथे डकवत आहे. तेव्हा काही फोटोग्राफीमधली फार अक्कल नव्हती (आताही आहे अशातला भाग नाही), पण आता तांत्रिक बाबी जरा अधिक समजतात (त्यामुळे मी अजून वाईट फोटो काढतो ;)).

बोंबीलाच्या निमीत्तानं

लेखक रामदास यांनी मंगळवार, 16/12/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
जयेश माधव यांचा बोंबीलाचा पाकचर्चा प्रस्ताव आज वाचला.माझे मित्र उदय यांनी एकूण संपूर्ण मत्स्य परीवारावर एक सुरेख लेख लिहीला होता .तो आज येथे देतो आहे.(लेखक परगावी असल्यामुळे त्यांची पूर्वपरवानगी घेऊन प्रकाशीत करत आहे.)

स्नेहसंमेलने.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 16/12/2008 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपण दे रे देवा असे काहीसे आपण नेहमीच म्हणतो. अशा लहानपणाच्या आनंदाचा उत्कर्ष आपापल्या स्नेहसंमेलनात होत असतो. लहानपणी याला विविधगुणदर्शन असेही म्हणत असत. आज माझ्या मुलीच्या स्नेहसंमेलनात जाण्याचा योग आला. पूर्वी कार्यक्रमाला सूत्र असे नसायचे. आजचा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्र या कल्पनेभोवती विणला होता. गणेशवंदना, कोळी नृत्य, ज्ञानेश्वर-चांगदेव संवादाचे नाट्यकरण, गणपती मिरवणूक, वासुदेव, जात्यावरच्या ओव्या आणि शिवराज्याभिषेक असा सर्वांग सुंदर कार्यक्रम होता. सर्वसाधारण नाताळाच्या १ ते १ १/२ महिने अगोदर स्नेहसंमेलनाची तयारी सुरु होते.

क्युकेनहॉफ: हॉलंड

लेखक कोलबेर यांनी गुरुवार, 11/12/2008 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च एप्रिल आणि मे ह्या तीन महिन्यांच्या सुमारास कधी नेदरलँडस/ हॉलंड देशाच्या भेटीवर असाल तर ऍमस्टरडॅम जवळील 'क्युकेनहॉफ' या गावाला भेट दिलीच पाहिजे. वर्षातुन फक्त तीन महिने खुली असणारी ट्युलीपच्या फुलांची अवर्णनिय बाग इथे आहे. गेल्या वर्षी सुदैवाने त्याचसुमारास ऍमस्टरडॅम मध्ये असल्याने ह्या बागेस भेट दिली आणि तिथले सौंदर्य पुरेपुर पाहू शकलो.