Skip to main content

आस्वाद

वाचा आणि थंड बसा

लेखक भोचक यांनी मंगळवार, 21/10/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.

अगर तूम मिल जाओ...

लेखक फटू यांनी सोमवार, 20/10/2008 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
सहज तू नळी वर भटकत असताना "जहर" चित्रपटातील "अगर तुम मिल जाओ" या गाण्याचं पाकीस्तानी रुप पाहायला आणि ऐकायला मिळालं. हे गाणं त्यांच्या १९७४ साली आलेल्या त्यांच्या "इमानदार" या चित्रपटात होतं... गाण्याची मुळ गायिका तस्सवर खानुम... आवाज एकदम भारदस्त... श्रेया घोशालच्या गोड आवाजाहून पुर्णपणे वेगळा...

आवडती शीर्षक गीते

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 19/10/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी दूरदर्शनवरच्या मालिका॑ची शीर्षक-गीतेसुद्धा तेव्हढीच लोकप्रिय होत असत. एकतर एकच एक चॅनेल होता व काही मालिका खरोखरच दर्जेदार होत्या. आत्ताच्या सगळ्याच मालिका एकदम फालतू आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाही पण रविवार सकाळी रामायण- महाभारताच्या वेळी रस्त्या॑वर अक्षरशः शुकशुकाट असायचा तसा आता 'क्यो॑ कि..' ला होत नाही हे खरे आहे. अश्या मालिका॑ची शीर्षकगीतेही मनावर खोल ठसा उमटवत असत. मालिकेच्या विषयाला अनुसरून तसे चित्रण व पार्श्वगायन अथवा स॑गीत असेल तर अचूक परिणाम साधला जायचा. नेमक॑ उदाहरण म्हणजे 'उडान' मालिका व त्याच॑ टायटल.

त्रिवेणीचा प्रयत्न :

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणीचा प्रयत्न : आज कधी नव्हे ते मला खरंच यशाची किल्ली मिळाली आहे.. अरे! कुलुपच बदललं कोणीतरी ! ****************************** यशाकडे जाणारा मार्ग दिसत असतो...पण नेहमीच अंडर कन्स्ट्रकशन असतो.. - प्राजु (कुठेतरी इंग्रजीमध्ये वाचलेल्या विचारांना त्रिवेणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.)

आठवांचा पसारा..

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
भुजंगप्रयातात ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.. उगा जाहला आठवांचा पसारा खळेना कशा आज डोळ्यांत धारा सुगंधी क्षणांना जपावे उराशी उडू लागला गंध हा आज सारा असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा जरी वादळी घेतली झेप मी ती तुझ्या प्रीतिचा ना मिळाला निवारा जरी टाळतो मी तुझ्या आठवांना तुला पाहता देहि येतो शहारा चला संपला अर्थ या जीवनाचा दिला नीयतीने मला हा इशारा - प्राजु
Taxonomy upgrade extras

बालकं - खलिल जिब्रानच्या मुक्तकाचा अनुवाद

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 14/10/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी विनायक प्रभूंच्या एका समुपदेशनाच्या लेखात प्रतिक्रिया देताना मी खलिल जिब्रानच्या एका इंग्लिश मुक्तकाचा उल्लेख केला होता. विप्रंनी त्याचा अनुवाद करुन देता का म्हणून विचारणा केली होती. बरेच दिवस त्याला हात घालीन म्हणत होतो आज थोडी सवड मिळाली आणि मी त्याच्या माझ्या परीने भावानुवाद केलाय तो मिपाकरांसाठी सादर आहे. जिब्रानने व्यक्त केलेले विचार मला पटलेत आणि माझ्या मुलाशी वागताना ते मला पदोपदी जागेवर आणायचे काम चोख करत असतात!

दुपारच्या कविता.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 14/10/2008 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
टच् टच वाजती जोडवी किण् -किणती काकण माडीवर कशी येऊ आई दारात राखण. ****** कशी उठू कशी बसू दाराआड उभी सासू चाळ -पाखड करून कसं सैलावलं नेसू. ******* वही नको बुकं नको नको आता उजळणी तीळ मोजून संपले पुरे झाली शिकवणी. ******
Taxonomy upgrade extras

विडंबन : सफरचंद

लेखक मी असाकसा वेगळा वेगळा यांनी सोमवार, 13/10/2008 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन - सफ़रचंद मूळ कविता - सफ़रचंद कवी - संदीप खरे संदीप् खरे यांची माफ़ी मागुन........... प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते, करायाची नसते काळजी आजुबाजुला सोबती असण्याची नसण्याची डेडलाईन आली कळतक्षणीच सारा कोड गोळा करुन रिलीज करायचा असतो प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते मग तो कोड बघुन पी.एम. ला तुझी स्तुती सुचू देत ना सुचू दे पी.एम.
Taxonomy upgrade extras

एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 10/10/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस : रामाच्या रुपाने विश्वातल्या चांगल्या शक्तींनी रावणाच्या रुपातल्या वाईट, अमंगल शक्तींवर विजय मिळवुन आपल्या विजयी सेनेसह भारत भुमध्ये प्रवेश केला तो ... विजयादशमीचा ... स्थळ : आर्यांचा देश .... जर्मनी ! अजुन विस्तारात सांगायचे म्हटले तर माझ्या आस्थापनाचे कार्यालय ... वेळ : दुपारी १ वाजल्यानंतर संध्याकाळी ६ पर्यंत .... आज सकाळपासुनच खुप उत्साहात आहे, आजचा दिवस दसर्‍याचा, सण हा "आनंदाचा, मांगल्याचा, आप्तजनांना शुभेच्छा व आपट्याची पानेरुपी सोने" देण्याचा. अतिशय उत्साहात सर्वांना शुभेच्छा देऊन झाल्या व रुटीन कामाला सुरवात झाली.

गाणी अंगणातली, गाणी माजघरातली, गाणी तीन सांजेची... (१)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 10/10/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला हे गाणं जसं दिसलं, जसं भावलं, जसं कळलं तसं मी लिहिलं आहे. ते चूक की बरोबर हे मला माहीत नाही! एकतर आपल्याला काव्यातलं फारसं काही कळत नाही मग उगाच खोटं कशाला बोला! :) हां, त्याला एकदा सुरांचा साज चढला की माझी थोडीफार मैत्री होते काव्याशी! तीसुद्धा अगदी माझ्यापुरतीच..! :) नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे.. हे सांगतांना त्या नविकाबद्दल एक विश्वास आहे. जणू काही तो नाविक कुणी माहेरचाच मनुष्य आहे, ज्याला विश्वासाने काही सांगावं! डौलाने हाक जरा आज नांव रे..! मग? मला जायचंय पैलतिरी असलेल्या माझ्या घरी!