Skip to main content

आस्वाद

आस्वाद — साहित्य, संगीत, चित्रपट आणि खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणारे मराठी लेखन. रसिक मनाला भिडणारे आस्वादपर मराठी लेख येथे वाचा.

बेडर!

लेखक राघव यांनी शुक्रवार, 28/11/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.

मध्ये माझ्या बाबांचे, ते शाळेत असतानाचे मराठी पाठ्यक्रमिक पुस्तक मला सापडले. त्यांनी ते जपून ठेवले होते. त्या वेळेस मी बराच निराश मनस्थितीत होतो. शिक्षण पूर्ण झालेले होते, पण पुढे काय करावे ते समजत नव्हते. कुणी मार्गदर्शन करणारा भेटत नव्हता. त्यात लोकांचे टोमणे ऐकून जीव विटून जायचा. अशा मनस्थितीत ते पुस्तक हाती पडले. अन त्यातल्या बेडरच्या व्यक्तिचित्राने माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. त्याचीच ही संक्षिप्त ओळख..!

(कधीच का नाही?)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 27/11/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.

जयश्री ताइंची कधीच नाही वाचुन आमची झोप उडाली आणि काय म्हणतात ते एक विडंबन पाडले (एक प्रयत्न)
https://misalpav.com/node/4738

का बंध रेशमाशी जुळले कधीच नाही
गात्रात कंप माझ्या भरले कधीच नाही

त्या सॉवळ्याच होत्या रात्री जागून माझ्या
वाह्यात वागणे मज जमले कधीच नाही

सलवार ही फुलांची मद झुलवीत येते

मज त्या लयीत झुलणे जमले कधीच नाही

डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या
सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही

यज्ञकर्मी' तृप्त झालो

लेखक पुणेरी मिसळ्पाव यांनी बुधवार, 26/11/2008 15:39 या दिवशी प्रकाशित केले.

पेठकरकाकांनी यज्ञकर्म नावाचे रेस्तरॉं सुरू केल्याचे मि.पा. वर वाचले आणि कधी एकदा इथे भेट देऊन येतो असे झाले. शेवटी काल, सोमवारी सायंकाळी एकदाचा योग आला. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सहकुटुंब "यज्ञकर्म' ला गेलो.

प्रथमभेटीतच नजरेत भरावी अशी यज्ञकर्मची रचना आहे. छानसे टेबलक्‍लॉथ अंथरलेली टेबलं, त्याला जुळणारी रंगसंगती असलेल्या खुर्च्या. टेबलवर काचेचे ग्लास, उंची क्रॉकरीच्या डिशेश, हातरुमाल व्यवस्थित मांडून ठेवलेले होते. बाजूला सुरेख मंद दिवे तेवत होते. विशेष म्हणजे नजरेत भरण्याजोगी अशी इथली स्वच्छता आहे.

रात्ररंग..

लेखक प्राजु यांनी रविवार, 23/11/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.

रात्ररंग..

चांदण्यांचे तेज सारे श्यामरंगी रंगले
मोगरीचे चांदणेही भूवरी या गंधले

शीळ घाली दाट रानी चांदवेडे पाखरू
क्षेम* द्यावी चांदण्याला स्वप्न त्याचे भंगले

सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे
काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले

डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले
ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले

पिंपळाचा पार भासे होत बैरागी कुणी
सावळासा भार त्याचा ध्यान त्याचे सावळे

रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली
रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले

खव्वयांसाठी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी आणि हैदराबाद मधिल हॉटेलांची यादी [त्यातल्या त्यात सामिश भोजन]

लेखक संताजी धनाजी यांनी शनिवार, 22/11/2008 10:45 या दिवशी प्रकाशित केले.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

ही घ्या हॉटेलांची यादी. ज्या लेखावरुन यादी बनवली तो येथे आहे.

तुम्ही प्रतिक्रिया देवुन यादिमध्ये वाढ करु शकता.

पुणे
१. सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३०
झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण.
मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव Smile
पत्ता: सदाशिवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्‍या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे.

अकल्पित..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 21/11/2008 21:17 या दिवशी प्रकाशित केले.

"सुमना, निघतो गं." रावसाहेबांनी सुमनाला म्हणजे त्यांच्या सुनबाईला हाक मारून सांगितलं.
"हो बाबा या. आणि हो, संध्याकाळी दाजी काका येणार आहेत तेव्हा ओफिसधून लवकर या. मी, सुशांतलाही सांगितलं आहे. तो ही संध्याकाळची त्याची डिप्लॉयमेंट उद्या करतो आहे. मी ही आज स्टुडीओतून लवकरच येणार आहे." सुमनाने, स्वतः चा डबा बॅगमध्ये ठेवत ठेवत सांगितलं.
"पण आज तू उशिरा निघाली आहेस का? कारण ८.३० वाजले गं" .. रावसाहेबानी विचारलं.

सकाळचा "च्य़ा "

लेखक शितल यांनी शुक्रवार, 21/11/2008 00:34 या दिवशी प्रकाशित केले.

"कसला ह्यो च्या म्हणायचा?? दे वोतुन मोरीत...!!!" आबा कडाडले.. ..

नवीनच लग्न होऊन आलेल्या आबांच्या सुनेचे डोळे भरून आले ... तरीही मन घट्ट करून तिने विचारलेच, "आबाजी, काय झाल जी? चहा गुळमाट झाला व्हय? पर दिसायस तरी बेस दिसतोया... "

"अग बाय, दिसण्यात आणि असण्यात वाईच तरी फरक अस्तो का न्हाय?? तूच पिऊन बघ ह्यो च्या, म्हंजी समजल तुला बी...."

"आता उरला नाय, व्ह्ता नव्हता त्यो समदा तुम्हासणीच दिला नव्हं...." सुनेने उत्तर दिले.

"चैत्र"

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 20/11/2008 01:22 या दिवशी प्रकाशित केले.

कै. जी ए कुलकर्णी हे नाव मराठी वाचकांना एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून चांगले परिचित आहे. त्यांनी लिहीलेल्या सुमारे शंभरेक मराठी कथा हा , आजही वाचक आणि अभ्यासकांकरता वाचनाचा , चिंतनाचा , अभ्यासाचा, विषय आहे.

जीएंनी त्यांच्या सुरवातीच्या काळात लिहिलेली एक कथा म्हणजे "चैत्र". या कथेवर बनविलेला एक छोटासा चित्रपट बघण्याचा योग अलिकडे आला. या चित्रपटाबद्दल थोडे आपल्या मित्रमैत्रिणिंना सांगावे म्हणून या लिखाणाचा प्रपंच. सुरवातीला मूळ कथेबद्दल.

सखी मदिरा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 19/11/2008 18:38 या दिवशी प्रकाशित केले.

फॉर्म्युला वन आणी किंगफिशर ची चढाओढ ह्यातुन कहिसे बाहेर पडल्या नंतर प्रसिद्ध उद्योजक, फॉर्म्युला वन सारख्या ठिकाणी संघ उभे करणारे एकमेव भारतीय विजय मल्ल्या हे थोडेसे रिलॅक्स होण्यासाठी 'सखी मदिरा' पार्टि चे आयोजन करत आहेत, हे ऐकल्या बरोब्बर आमची कळी खुलली. विजय मल्ल्यांची पार्टि म्हणजे झाडुन सगळे पेज ३ वाले मान्यवर, क्रिकेटर्स, मायानगरी मधिल तारे, राजकारणी हजेरी लावणार, आणी आम्हाला मि.प. च्या सभासदांना खमंग काहितरी वाचायल देता येणार ह्याचा आनंद आम्हाला सर्वाधिक झाला. त्या आनंदाच्या भरात आम्ही विजय मल्ल्यांच्या संपत्ती मध्ये त्या रात्री रोजच्या पेक्षा जरा जास्तच भर टाकली.

दिलखुलास

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 19/11/2008 00:46 या दिवशी प्रकाशित केले.

आज झी मराठी च्या लिट्ल चॅम्प्स चा कार्यक्रम पाहिला आणि शंकर महादेवनला मानला!

शंकर महादेवन आजचा पाहुणा परिक्षक होता आणि शंकर महादेवनने आपल्या दिलखुलासपणाने सर्वांना जिंकुन घेतले. एका प्रथितयश कलाकाराने उमलत्या कलाकारांना ज्या उस्फुर्तपणे, ज्या उत्साहाने आणि ज्या पद्धतिने दाद दिली त्याला तोड नाही. परिक्षक हे बहुधा स्पर्धकांचे कौतुकच करतात, काही सल्ल्ला वा सुचना देतात आणि प्रोत्साहनही देतात, कधी सौम्यपणे त्रुटी नजरेस आणुन देतात. मात्र 'मी' पण विसरुन सर्व बालस्पर्धकांचे कौतुक शंकर महादेवनने केले त्याला दाद दिलीच पाहिजे.