मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग २

हेमंतकुमार ·

उत्तम माहिती . या सर्व चाचण्या मी माझ्या बालकाच्या केल्या. ५ हजारापर्यंत खर्च येतो. प्रसूतीच्या एकूण खर्चापुढे ५ हजार जास्त मला तरी वाटले नाही. भाग १ वाचलेला नाही. त्याची लिंक मिळेल का ?

In reply to by विअर्ड विक्स

हेमंतकुमार 06/03/2018 - 15:14
http://www.misalpav.com/node/42123 ५ हजार जास्त मला तरी वाटले नाही.>>>>> बरोबर, प्रश्न सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रसूती होणाऱ्यांचा आहे. त्यात अज्ञानाची भर.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 06/03/2018 - 16:38
तुमच्या बालकाचे रक्त जन्मानंतर कितव्या दिवशी घेतले आणि चाचण्या कुठल्या देशात ते सांगता का जरा? रक्त घ्यायचा दिवस २/३/६/७ अशी मतभिन्नता दिसते, म्हणून विचारतो

In reply to by हेमंतकुमार

मी चाचणी डोंबिवलीत केली. भारत vaccine अँड serum pvt ltd - कुर्ला बेस्ड कंपनी . लहान बाळाचे का रक्त घ्यायचे ? कशाला हव्यात टेस्ट ? असा सासुरवाडीचा विरोध होता , पण मी स्वतः सूक्ष्मजीव शास्त्र पदवीधर असल्यामुळे चाचणीचे महत्त्व जाणून टेस्ट करून घेतल्या. बाळाची पचनशक्ती जागृत झाल्या नंतर हि टेस्ट कधीही करू शकता. साधारण ४८ तासानंतर पचन सुरु होते, नवजात बाळांत

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 06/03/2018 - 19:34
लहान बाळाचे का रक्त घ्यायचे ? कशाला हव्यात टेस्ट ? असा सासुरवाडीचा विरोध होता चाचण्या केल्यात ते उत्तम केलेत. थायरॉईडची जन्मजात कमतरता हा आजार साधारण हजार ते बाराशे मध्ये एका बाळाला आढळतो. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4366791/ परंतु वेळेत इलाज केला नाही तर बाळ मतिमंद होऊन आयुष्यभरासाठी परावलंबी होते. आणि वेळेत इलाज केला तर बाळा संपूर्णपणे व्यवस्थित आणि निरोगी होते. आपण आयुर्विमा करतो तेंव्हा आपली मरण्याची शक्यता हजारात एक इतकीच कमी ( खरं तर त्याहूनही कमी) असते. तेंव्हा आयुर्विम्याची काय गरज आहे असेच म्हणण्यासारखे आहे.हि तशीच परिस्थिती आहे. आपले अभिनंदन.

Nitin Palkar 06/03/2018 - 15:03
खूपच नवीन माहिती. खरोखरीच ३४ चाचण्या हा आकडा ऐकून दचकलोच...किंबहुना माझ्या पिढीतील (साठीतील नवतरुण) अनेकजण दचकतील. देवी (small pox), क्षय(BCG), पोलिओ, त्रिगुणी (धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प Triple Vaccin), MMR (या लसीला मराठी प्रतिशब्द माहित नाही) साधारणपणे या एवढ्याच लसी तीस वर्षांपूर्वी माहित होत्या. थोड्या नंतरच्या काळात विषमज्वराची आणि काविळीची लस बाजारात आली. आंतरराष्ट्रीय शिफारशी हा थोडासा मतभेदाचा मुद्दा असू शकतो तरीदेखील जर त्या चाचण्या आपल्याकडेही आवश्यक असतील तर त्या खरं तर मोफत उपलब्ध असायला हव्यात, त्या बद्दल जन जागृती व्हायला हवी...

हेमंतकुमार 07/03/2018 - 07:47
आंतरराष्ट्रीय शिफारशी हा थोडासा मतभेदाचा मुद्दा असू शकतो >>>>>> बरोबर. म्हणूनच भारतात आधी १, मग ७ आणि टप्प्याने इतर चाचण्यांचा विचार योग्य आहे.

लेखात लिहीलेली कारणे सोडून अन्य कोणती कारणे आहेत का ज्याने बाळ मतिमंद होईल? जन्मत: मतिमंदत्व असू शकते का? जर उत्तर हो असेल तर ते कसे टाळता येईल?

हेमंतकुमार 07/03/2018 - 12:22
लेखात लिहीलेली कारणे सोडून अन्य कोणती कारणे आहेत का ज्याने बाळ मतिमंद होईल? >>> कारणे खंडीभर आहेत. सगळी इथे लिहायची म्हटली तर MD च्या परीक्षेतील निबंध होईल ! थोडक्यात ५ गट असे: १. गुणसूत्रांचे आजार : यात Down Syndrome सगळ्यात महत्वाचा. २. चयापचयाचे अनेक आजार ३. स्वमग्नता ४. गर्भवतीस झालेला जंतूसंसर्ग : Rubella, CM Virus ५. गर्भवतीने केलेले खूप मद्यपान ६. माहित नसणारी कारणे : तब्बल ३०% आहेत .

हेमंतकुमार 07/03/2018 - 12:33
जन्मत: मतिमंदत्व असू शकते का? >>>. असू शकते पण पालकांना ते समजून यायला वेळ लागतोच. म्हणूनच चाळणी चाचण्यांचे महत्व आहे. तर ते कसे टाळता येईल? >>> यासाठी गर्भावस्थेतच काही चाचण्या करतात. याचे विवेचन या लेखमालेच्या सहाव्या भागात येईल. असे निदान केल्यावर पालकांना २ पर्याय सुचवले जातात: १. गर्भपात २. मतिमंद मूल वाढवण्याची मानसिक तयारी करणे.

गवि 07/03/2018 - 16:21
उत्कृष्ट लेखमाला. आभार आणि उत्सुकता.. एक प्रश्न, काही आजार जे आज १००% असाध्य आहेत पण जे जन्मत: टेस्टने सिध्द होऊ शकतात.. तर अशा आजारांचीही चाळणी परीक्षा जन्मत:च करावी का? त्याची लक्षणं नेमकी कधी दिसायला लागतील ते सांगता येत नसेल तर तेवढा काळ तरी अज्ञानातलं सुख त्यांना घेऊ द्यावं का? उदा. DMD किंवा अन्य असाध्य डिस्ट्रॉफी किंवा टीन एज मधे उद्भावू शकणारे काही आजार. यात टाळता न येणाऱ्या आणि उपचार (क्यूअर किंवा कंट्रोल) नसलेल्या आजारांविषयीच उत्तर अपेक्षित आहे.

हेमंतकुमार 07/03/2018 - 16:27
अभिप्रायाबद्दल आभार ! अशानेच लेखनाचा हुरूप येतो. सवडीने उत्तर देतो

हेमंतकुमार 07/03/2018 - 17:22
गवि, तुमचा प्रश्न चांगला आहे. DMD हा स्नायूंचा आजार संदर्भास घेऊन बघूया: १. हा एक स्नायूंचा नाश करणारा अनुवांशिक आजार २. जन्मतःच लक्षणे नसतात ३. मूल जेव्हा चालायला लागणार त्या दरम्यान अंदाज येतो. ४. उपचार असाध्य असल्याने २०-३० वयांत मृत्यू ५. निदान चाचणी : DMD जनुकातला बिघाड PCR तंत्राने शोधणे ६. आता गर्भावस्थेतच विशिष्ट तंत्राने चाचणी करून निदान शक्य ७. आता जर खात्री झाली तर गर्भपात-सल्ला योग्य वाटतो पण, ..... आता नैतिक प्रश्न असा येतो की....... जो रोगी जन्मानंतर दोन दशके तरी जगू शकेल त्याचा गर्भावस्थेतच खातमा करायचा का? माझ्या मते याचे उत्तर वैयक्तिक पातळीवर ठरेल. .. उत्तर पटले का ते जरूर लिहा . तुमचेही विचार जाणण्यास उत्सुक.

In reply to by हेमंतकुमार

गवि 07/03/2018 - 19:57
सध्या इतकंच म्हणतो की माझ्या प्रश्नाचा रोख गर्भातील चाचणी किंवा त्यानुसार गर्भपात याबद्दल नसून मूल ऑलरेडी जन्माला आल्यानंतर करण्याच्या चाचणीविषयी आहे. (उपरोक्त प्रकारच्या रोगांबाबत) एक आर्ग्युमेंट असंही होऊ शकतं की आजार नाही हे कळल्यामुळे मिळणारा आनंद / निश्चिंतपणा हाही हवासा असू शकतो.

In reply to by गवि

हेमंतकुमार 07/03/2018 - 20:56
मूल ऑलरेडी जन्माला आल्यानंतर करण्याच्या चाचणीविषयी आहे>>>> जर आजार दुर्धर असेल तर त्याचे निदान लवकरात लवकर करावे. त्या दृष्टीने 'जन्म' ही थोडी उशीराची पायरी ठरते. म्हणून अलीकडे गर्भचाचण्यांचे महत्व वाढत आहे

सुबोध खरे 07/03/2018 - 19:12
जो रोगी जन्मानंतर दोन दशके तरी जगू शकेल त्याचा गर्भावस्थेतच खातमा करायचा का? माझ्या मते याचे उत्तर वैयक्तिक पातळीवर ठरेल. हे संपूर्णपणे मान्य करूनही असे वाटते कि जर मूल नीटपणे धावणार नसेल ( स्नायूंच्या अशक्तपणाची सुरुवात ३-४ वर्षाला सुरु होते) आणि ते मूल जाणते होण्याच्या वयाच्या अगोदरच पूर्णपणे परावलंबी होणार असेल तर त्याला जन्माला घालून आयुष्यभर( साधारण २०-३० वर्षांचे आयुष्य) दुःखात ठेवायचे आणि शेवटी श्वसन करणे सुद्धा कठीण होते तेंव्हा व्हेंटिलेटर वर ठेवून तीळतीळ मरत असलेल्या आपल्या मुलाला असहाय्य्य पणे पाहत राहणे अशा परिस्थितीत मातापित्यांची अतिशय वाईट अवस्था होते. हे जर होणार असेल तर जन्म देण्यापेक्षा वेळेत गर्भपात करणे हे श्रेयस्कर आहे असेच वाटते. माझ्या डॉक्टर वर्गमित्राची अशी स्थिती पाहिल्यावर गर्भपात करणे हेच उत्तम ठरेल अशी माझी तरी मनोवृत्ती झाली आहे. गर्भपात केल्यावर एकदाच रडून मोकळे होता येते. सोनोग्राफीमध्ये जन्मजात व्यंग असलेल्या मुलाचे रोगनिदान झाल्यावर आईवडिलांची होणारी परिस्थिती मी पाहत आलो आहे. आणि धार्मिक कारणासाठी काहीही झाले तरी गर्भपात न करणारे कॅथॉलिक लोक आयुष्यभर कष्ट काढताना पाहत आलो आहे.

हेमंतकुमार 07/03/2018 - 19:51
गर्भपात करणे हेच उत्तम ठरेल अशी माझी तरी मनोवृत्ती झाली आहे. >≥> मी अगदी सहमत आहे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणून ठाम विधान केले नाही

लई भारी 03/04/2018 - 15:30
अजून एक उत्तम लेखमालिका. मुलींच्या जन्मावेळी त्यांनी रक्त शर्करा आणि थायरॉईड ची चाचणी केल्याचं आठवतंय. मला वाटलं की आईला थायरॉईड चा त्रास आहे म्हणून टेस्ट केली की काय.

हेमंतकुमार 03/04/2018 - 17:12
तुमच्या मुलींच्या चाचण्या केल्या हे चांगलेच झाले.अशीच जागरूकता सर्व स्तरातील रुग्णालयांत येवो ही इच्छा.

पुंबा 05/04/2018 - 17:34
कुमारजी, अतीशय उत्तम लेखमालिका. आता, लगोलग बाकीचे भागही वाचून टाकतो. वैद्यकिय बाबींविषयी आपण जितक्या जिव्हाळ्याने व सोप्या भाषेत लिहिता तितके माहितीपूर्ण लिखाण वाचनात आले नव्हते.

हेमंतकुमार 05/04/2018 - 17:52
आभार ! तुमच्यासारखे अभ्यासू वाचक लाभल्यामुळे लेखन करण्यास हुरूप येतो. तुमचे प्रोत्साहन महत्वाचे आहे.

हेमंतकुमार 20/10/2022 - 10:03
लेखात खालील उल्लेख आहे:
आंतरराष्ट्रीय शिफारसीनुसार प्रत्येक नवजात बालकाच्या ३४ चाचण्य>>
> आता या संदर्भात भारतातही चांगली प्रगती होत आहे. महाराष्ट्रातील महानगरांमध्ये काही जनुकसंशोधन केंद्रे कार्यरत झालेली आहेत. त्यामुळे नवजात बालकाच्या सुमारे 35 प्रकारच्या चाळणी चाचण्या आता केल्या जातात. त्यासाठी NGS हे अत्याधुनिक जनुक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या चाचण्यात मुख्यत्वे: *हिमोग्लोबिन संदर्भातील आजार *जन्मजात श्रवणदोष *चयापचय आणि हार्मोन्सचे आजार यांचा समावेश आहे

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

वयोगट ०-१ वर्षे : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात !

मला भेटलेले रुग्ण - १३

डॉ श्रीहास ·

Nitin Palkar 27/02/2018 - 19:22
मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते हे अनेकांना ठाऊक नसते, लक्षात येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

गवि 27/02/2018 - 19:47
स्वतःचे आणि अन्य काही प्रातिनिधिक आजोबा आठवले. -डॉक्टरला काय कळतंय? -हे सर्व मुळात पोट साफ नसल्याने आहे. चूर्ण आण मला. -एक आयुर्वेदिक सिरप सांगतो ते आण मला. नाहीतर मीच शोधतो. -डॉक्टर फार स्ट्रॉन्ग औषध देतात. म्हणून मी प्रत्येक औषधाची पाव गोळीच घेतो. -चुंबक चिकित्सा करुन पाहतो. वगैरे.

shashu 28/02/2018 - 09:59
मस्तच...... पुन्हा एकदा तेच म्हणतो...... तुम्ही मिपा कर आहात म्हणून असे डॉक्टर आहात किंवा असे डॉक्टर आहात म्हणून मिपा कर आहात....

डॉ श्रीहास 28/02/2018 - 14:33
मला अनेक प्रतिसाद मिळालेत ...पण मागचा भाग संपादित झाल्यानंतर जो व्यनि आला , त्या डाॅक्टरांनी असं लिहीलं होतं माझेच अनुभव तू लिहून काढलेत असं वाटतंय .... हा खरंच आगळावेगळा प्रतिसाद होता _/\_.

Ram ram 28/02/2018 - 15:52
चुंबन चिकित्सा . हा हा हां. अशावेळी चेपु सारखं लाईक चे बटण असावं असे वाटून जातं. बाकी डॉक्टर साहेब आपल्या कामास सल्लाम.

नाखु 03/03/2018 - 14:51
डॉ क यांची परीक्षा पहायला लागले असं दुसऱ्या त दिसतंय. अर्थात पहिला दमदार आहे

प्रीत-मोहर 08/03/2018 - 07:58
Hats off doc!! मानसिक/भावनिक ताण तणाव आल्याक्षणी धाप लागणे हा माझाही अनुभव आहे. एरवी मस्त.

http://www.misalpav.com/node/42057#new हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? ..... जणू काही ह्याच प्रश्नाची वाट बघत होते दोघे जण , बोलू लागले घडाघडा “काय सांगू डाॅक्टर पोरगा बारवीची परिक्षा देतोय, पण पुढचं काय करावं (आयुष्याचं) काही माहिती नाही, ऐकत नाही अजिबात ‘....

मला भेटलेले रूग्ण - १२

डॉ श्रीहास ·

शिव कन्या 22/02/2018 - 23:53
पटलं ..... कधी कधी काहीच न करता, फक्त धीराचे दोन शब्द डॉक्टर कडून गेले कि बळ येते माणसाला.

एस 23/02/2018 - 05:52
केवळ वैद्यकीय सल्ला देण्यापेक्षा रुग्णांचं रोजचं आयुष्य सुसह्य व्हावं यासाठी प्रयत्न करणारे असे डॉक्टर हल्ली कमीच पहायला मिळतात. पुभाप्र.

राजाभाउ 23/02/2018 - 11:22
लेख मालीका परत सुरु केल्या बद्दल धन्यवाद. अनेकांनी पुर्वी म्हणल्या प्रमाणे तुमच्या सारखे डॉक्टर सर्वांना लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना !! तुम्ही डॉक्टर म्हणुन उत्तम आहातच, पण माणुस म्हणुन जास्त चांगले आहात. असेच चालू ठेवा, आणि लिहीत रहा.

नितीन पाठक 23/02/2018 - 12:49
एस आर डॉक़, नमस्कार, तुमच्या सारखे डॉक्टर सर्वांना लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ...... तुम्ही डॉक्टर म्हणून उत्तम आहात एक सायकलीस्ट म्हणून उत्कृष्ट आहात आणि एक माणूस म्हणून "महान" आहात.

Nitin Palkar 23/02/2018 - 18:54
नेहमीसारखे छान लेखन, सर्वांनी एवढ्या छान प्रतिक्रिया दिल्यावर म्या पामर आणखी लिहिणार....? तुमचं लेखन नेहमीच आवडत आलं आहे. त्यातून तुमच्यातल्या डॉक्टर बरोबरच तुमच्यातला सहृदय, कनवाळू माणूस दिसतो. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा! पुलेशू , पुभाप्र.

केडी 23/02/2018 - 19:40
लिहत राहा होत डॉक तुम्ही ...ते ILD बद्दल वाचून जरा कंठ दाटून आला, का ते तुम्हाला माहिती आहेच....असेच हि लेखमाला सुरु राहू देत ह्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

डॉ श्रीहास 28/02/2018 - 14:05
हे भेटणारे रुग्ण खूप सारे अनुभव देऊन जातात, त्यामुळे मला एक माणूस म्हणून प्रगल्भता जाणवत आहेच ... बरेचदा हे अनुभव लिहीणं होत नाही किंवा स्पष्टच सांगायचं तर कंटाळा येतो, पण ईथले प्रतिसाद वाचून मी जोमानी लेखन/टंकन करतो हे मात्र खरं!! तुमच्या उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी अनेकानेक धन्यवाद आणि तुम्हाला माझी डाॅक्टर म्हणून गरज पडू नये ह्या शुभेच्छा :)) ......

http://www.misalpav.com/node/41320 ओपिडी संपत आली होती, आज फारसे पेशंट नव्हते मी रिलॅक्स मुड मध्ये होतो आणि तेवढ्यात एकजण केबिन मधे शिरला .... हातात भली मोठी पिशवी , बरेच रिपोर्ट्स असावेत असा अंदाज आला.

ग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही

हेमंतकुमार ·

In reply to by Nitin Palkar

हेमंतकुमार 24/02/2018 - 18:30
धन्यवाद. थोडी भर घालतो : ...आणि खलनायक म्हणजे सर्व इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स.

In reply to by चाणक्य

हेमंतकुमार 20/02/2018 - 17:47
अहो चाणक्य, तुमच्या आस्थेवाईक प्रतिसदाबद्दल तितक्याचे वेळा आभारी आहे!! एका विषिष्ट कल्पनेत गुंफलेल्या लेखांची ही माला थांबवत आहे, माझे लेखन नाही ! पुरेशा लेखन-विश्रांती नंतर स्वतंत्र आरोग्य-लेख जरूर लिहीन. लोभ असावा

अनिंद्य 20/02/2018 - 14:23
@ कुमार१, उत्तम लेख. उपोषणाच्या परिणामांबाबत सांगितलेत त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. परिचयातले काही लोक फक्त पाण्यावर राहून आठवडा-पंधरवडा असा उपास करतात ! मधुमेहींनी हे अजिबात करू नये ना?

तेजस आठवले 20/02/2018 - 18:23
पोट सुटलेल्या व्यक्तींमध्ये, काही कारणाने त्यांना एक/जास्त दिवस उपाशी राहावे लागले, तरी सुटलेल्या पोटाच्या आकारात काहीच बदल होत नाही. तसंच चरबी ऐवजी स्नायू जाळून शरीरासाठी ऊर्जा मिळवली जाते, ह्याचे काही कारण स्पष्ट झाले आहे का ?

कंजूस 20/02/2018 - 19:19
मजेदार उपयुक्त माहिती. विश्रांती घ्याच. एखादा लेख फक्त प्रश्नांसाठी( कोणताही रोग/इलाज) काढता येईल. मग त्यांची उत्तरे ओडिओफाइलमध्ये MP3 देता येईल॥ लिहिण्याचा त्रास वाचेल.

हेमंतकुमार 20/02/2018 - 19:20
@ तेजस : अगदी तुम्ही म्हणता तसे नाही होत. उपोषणाचा कालावधी किती त्यानुसार घडामोडी अशा होतात : सुरवातीस बघा. मुख्य हेतू असतो ‘नव-ग्लुकोजनिर्मिती’. त्यासाठी दोन पर्याय असतात: १. स्नायुतील प्रथिने >> त्यांचे विघटन >> १९ प्रकारची अमिनो आम्ले सुती होऊन यकृतात जातात >> त्यांपासून ग्लुकोज तयार होतो. २. मेदसाठ्यांचे विघटन >>> ग्लीसेरोल + मेदाम्ले .यातील फक्त ग्लीसेरोलचेच ग्लुकोज होते. आता लक्षात येईल की १९ अमिनो आम्ले वि. एकटा ग्लीसेरोल यात आम्लांचा वाटा खूप आहे. म्हणजेच त्यासाठी जास्त स्नायू-प्रथिन विघटीत होते. पण..... जेव्हा उपोषणाचा कालावधी बराच वाढेल तेव्हा मात्र स्नायूंना spare करून मेदसाठ्यांचे विघटन अधिक होईल.

In reply to by हेमंतकुमार

तेजस आठवले 20/02/2018 - 22:17
धन्यवाद. अजून एक प्रश्न विचारतो... समजा एखादा माणूस दुर्घटनेत सापडून एका निर्जन बेटावर/ पर्वतावर अडकला. ह्या बेटावर फक्त बटाटे/रताळी(पिष्टमय पदार्थ) आहेत बाकी काहीही खायला नाही. अश्या स्थितीत त्याच्या शरीराचे चलनवलन कसे चालेल. तो ते खाऊन नक्कीच जिवंत राहील पण चौरस आहार न मिळाल्याने कमतरतेमुळे काही आजार / प्रश्न होतील ना? हीच परिस्थिती फक्त मधाची पोळी (खायला त्या बेटावर फक्त मध आहे) असे समजूया तर मग शरीर त्या मधाचे कशाकशात रूपांतरण करेल? सहज म्हणून विचारले....

In reply to by तेजस आठवले

हेमंतकुमार 21/02/2018 - 10:05
ह्या बेटावर फक्त बटाटे/रताळी(पिष्टमय पदार्थ) आहेत बाकी काहीही खायला नाही. अश्या स्थितीत त्याच्या शरीराचे चलनवलन कसे चालेल. >>>>>> शरीराची उभारणी आणि पोषण मुख्यतः तीन घटकांवर होते : कर्बोदक, मेद आणि प्रथिन. यापैकी कर्बोदक व मेद हे कार्बन व हायड्रोजनने बनलेले आहेत. प्रथिने तयार करताना मात्र त्याहून अधिकचा नायट्रोजन लागतोच. वरच्या कथेत तो माणूस फक्त कर्बोदके खातोय. त्यामुळे उर्जा व मेद निर्मिती होत राहील व तो जिवंत राहील. पण, पुरेसा नायट्रोजन (डाळी, दूध, अंडे इ.) न मिळाल्याने प्रथिन-निर्मिती मार खाईल. परिणामी शरीर-सांगाड्याची बळकटी आणि प्रतिकारशक्ती दुबळी होईल. शेवटी आपले हिमोग्लोबिन व इम्म्युनोग्लोब्यूलिनस मजबूत असतील तरच दणकट आयुष्य जगता येते. (कृपया हे उत्तर वाचल्याची पोच द्यावी ही वि.)

In reply to by कलंत्री

हेमंतकुमार 21/02/2018 - 11:36
मला असे वाटते की इथला लेख whats app वर पाठवण्याऐवजी त्याचा फक्त दुवा तिकडे द्यावा. यामुळे आपण काही नवे वाचक मिपाकडे वळवू शकू.

अनुप ढेरे 21/02/2018 - 10:12
गोड पदार्थ किंवा इतर कर्बोदकं तुपाबरोबर वा दुधाबरोबर खल्ल्यास त्या गोडामुळे रक्तातील ग्लुकोज प्रमाण कमी प्रमाणात वाढते यात कितपत तथ्य आहे.

In reply to by अनुप ढेरे

हेमंतकुमार 21/02/2018 - 10:24
गोड पदार्थ किंवा इतर कर्बोदकं तुपाबरोबर वा दुधाबरोबर खल्ल्यास त्या गोडामुळे रक्तातील ग्लुकोज प्रमाण कमी प्रमाणात वाढते यात कितपत तथ्य आहे. >>>> माझ्या मते तथ्य नाही. आता बघा, तूप आणि दूधात सुद्धा कर्बोदके आहेत ना ! मग एकूण ग्लुकोज जास्तच गेला ना पोटात ?

अगदी तरुणपणापासून मला एक प्रॉब्लेम आहे पण तो hypoglycemia नव्हे हे नक्की तर तो काय व कशामुळे? मला giddy वाटू लागते, हातपाय थरथरतात, मी घामाघूम होतो. (हे सामान्यतः संध्याकाळी घडते, सकाळी जवळजवळ नाहीच.) अशा वेळेस मला फक्त भूक ही एकमात्र जाणीव असते, त्यापलीकडे काही नाही. त्यावर एकच उपाय असतो; काहीतरी खाणे. मौज अशी की ही अवस्था एकाएकी निर्माण होते, अचानक spike यावी, तसे. बरे, हे होण्याआधी काही दमवणाऱ्या वगैरे गोष्टी घडलेल्या असतात असेही नाही. खुर्चीत अगदी स्वस्थ बसून वाचन करतोय, अशा वेळीही हे होऊ शकते. त्यामुळे चटकन तोंडात टाकण्याजोगे काहीतरी नेहमी - अगदी गाडी चालवितानासुद्धा - मी ठेवतो. केळे, बिस्कीट, लाडू, इ. ह्यापैकी काहीही तोंडात टाकले की दोन-चार मिनिटात मी ठीक होतो. चहा मिळाला तर छानच. आतापर्यंत एक-दोनदाच असे झाले की माझ्याकडे काहीच खायला नव्हते, व खाण्याची संधीही. मग मी तसाच स्वस्थ बसून राहिलो. आणि बऱ्याच वेळानंतर जरा सावरलो. आपल्या मते glucose ची लेव्हल अशी अचानक आणि झपाट्याने खाली कशी जाऊ शकते? PS. my fasting and PP sugar levels are normal.

In reply to by रविकिरण फडके

कलंत्री 02/03/2018 - 20:14
मागच्या ४ / ५ वर्षापासून हीच समस्या झाली आहे. दुपारी ४ वाजता काहीतरी खावेच लागते. त्यात थोडाही उशीर झाला तर, अस्वस्थ वाटते. घाम येतो, तोंडाची चव जाते. हे लक्षात आल्यापासून मीही काहीतरी खायचे ठेवतोच. फुटाणे, मूरमूरे, एखादे फळ ही अश्यावेळेस चालते. अश्यावेळेस पाण्याच्या घोटानेही बरेच दिलासा मिळतो. वैद्यांना विचारले असता त्यांनी सांगितली की हे सर्व नैसर्गिकच आहे.

In reply to by कलंत्री

हेमंतकुमार 02/03/2018 - 20:28
खरे आहे काही वेळेस स्पष्टीकरण देता येत नाही. उपचार घेणाऱ्या मधुमेहींच्या बाबतीत असे होऊ शकते

हेमंतकुमार 21/02/2018 - 11:15
my fasting and PP sugar levels are normal. ">> याचा स्पष्ट अर्थ आहे की ती ग्लुकोज-कमतरता नाही. फिजिशियन ला दाखवून योग्य त्या तपासण्या केल्यावर प्रश्नाचे उत्तर देता येईल

हेमंतकुमार 22/02/2018 - 09:59
१६/१०/२०१७ ला इन्सुलिनच्या लेखाने सुरवात केलेली ही मालिका आज समाप्त करीत आहे. या लेखनामागची भूमिका अशी होती. सध्या अनेक माध्यमांतून बरेच आरोग्य लिखाण चालू असते. त्यातील बरेचसे हे 'आजार-केंद्रित' असते. त्याचीच री मला ओढायची नव्हती. म्हणून या मालेत मी थोडा वेगळा प्रयोग केला. त्यातील विषय ( इन्सुलिन, कोलेस्टेरॉल, हिमोग्लोबिन, बिलिरुबिन, ग्लुकोज , इ.) पाहता हे लक्षात येईल. प्रत्येक लेखात शरीरातील एखाद्या महत्वाच्या रासायनिक पदार्थाला मध्यवर्ती भूमिका दिली होती. म्हणजेच ही माला 'पदार्थ-केंद्रित' होती. त्या पदार्थाची मूलभूत माहिती, इतिहास आणि मग संबंधित आजाराचा थोडक्यात आढावा असा येथे दृष्टीकोण होता. या लेखनाचे आपण स्वागत केलेत तसेच चर्चेत सहभागी झालात याबद्दल मी आपला आभारी आहे. बऱ्याच सदस्यांनी सातत्याने प्रोत्साहन देऊन मला लेखनाची स्फूर्ती दिली. तसेच लेखमाला थांबवायचा निर्णय घेतल्यावर काहींनी तसे न करण्याची आग्रही व प्रेमळ विनंती केली. आपणा सर्वांचा मी ऋणी आहे. लेखकाने एकाच धाटणीतले लेखन दीर्घकाळ न करता काही वेगळे करावे हे माझे मत. कारण वाचकाला सतत काहीतरी नाविन्यपूर्ण हवे असते. दरम्यान काही मिपाकरांनी काही आरोग्य विषय लेखनासाठी सुचवले आहेत. ते स्वतंत्रपणेच हाताळायचे आहेत. त्यातील एका विषयाच्या मी प्रेमात पडलो आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. सध्या मी त्याचा गृहपाठ करीत आहे. माझे पुरेसे समाधान झाल्यावरच लेखनाला हात घालेन. या लेखमालेदरम्यान अनेक मिपाकरांनी वैयक्तिक संपर्कातून त्यांच्या आजारांची माझ्याशी चर्चा केली याचे खूप समाधान वाटते. त्यामुळे मिपा हे माझे एक विस्तारित कुटुंब झाल्याची सुखद भावना जाणवली. तसेच याच दरम्यान ‘मिपा-पुणे कट्टा’ झाला व मला आपल्यातील काहींच्या भेटीचा आनंद मिळाला. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच मनापासून लेखन करता आले. प्रशासक आणि साहित्य संपादक यांचेही आभार. लोभ असावा

In reply to by हेमंतकुमार

चौकटराजा 22/02/2018 - 10:52
दैनिक सकाळ मध्ये डॉ एम वाय बापये हे लेख लिहित. मला ते लेख आवडत. एका नातेवाईकाच्या दुखण्याच्या निमित्ताने त्याना भेटण्याचा योग आला त्यावेळी लेख यायचे थांबले होते. मी त्याना विचारले की आपण आता लिहित का नाही ? त्यावर त्यांचे मिशकील उत्त्तर असे की " मध्ये थांबलेले बरे.. नाहीतर लोक म्हणतात .. रिकामा असतो वाटते दवाखाना हल्ली ... !

चौकटराजा 22/02/2018 - 11:01
प्राधान्याने शरीर जर ग्लुकोज रक्तातील वापरीत असेल तर .. मी असे विधान करीन की कमीतकमी मधुमेही लोकांनी सकाळी उठल्यावर चालत जाणे बंद करून दोन वेळच्या मुख्य भोजना नंतर दोन तासांनी ( स्वादुपिंडाने शरणा गती पत्करल्यावर ) चालण्याचा व्यायाम करावा . ही वेळ साधारण पणे अशी येईल दुपारी तीन ते चार व रात्री दहा ते साडेदहा . दोन्ही वेळा गैरसोयीच्या आहेतच पण सैधान्तिक रित्या बरोबर !

सुखीमाणूस 22/02/2018 - 20:02
शब्दात मांडत आहात ही माहीती. समजावून सान्ग्ण्याची हातोटी छान आहे. सोदाहरण मस्त समजावता!! धन्यवाद

हेमंतकुमार 22/02/2018 - 20:14
अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! आपणा सर्वांना आरोग्य्-सुख लाभू देत आणि आपण तुमच्यासारखेच सुखी राहू !

हेमंतकुमार 25/02/2018 - 10:04
केटोजेनिक’ आहार : १) यात कर्बोदकांचे प्रमाण बरेच कमी व प्रथिनाचे मध्यम असते. या आहाराचे प्रयोग बऱ्याच मधुमेहींवर केले गेले आहेत आणि त्याचे फायदे दिसून आले आहेत. अशा नियमित आहारानंतर पेशींमधील घडामोडी अशा होतात: कमी कार्बोदके >>> कमी ग्लुकोज पुरवठा >> शरीरातील मेदसाठ्यांचे अधिक विघटन >> आता ग्लुकोज ऐवजी मेदाम्ले ही प्रमुख इंधन होतात >>> वजन कमी होते आणि ग्लुकोजची रक्तपातळीही कमी. तसेच मधुमेह-औषधांचेही प्रमाण कमी होऊ शकते. या प्रकारच्या उपचाराला nutritional ketosis म्हणतात. २) अलीकडे अजून एक नवीन प्रयोग निरोगी व्यक्तींवर करण्यात आले. त्यात ग्लुकोज खाण्यापूर्वी अर्धा तास आधी ते लोक 'केटो-पेय' पितात. त्याने ग्लुकोज- इन्सुलिन समन्वय सुधारतो आणि ग्लुकोज पातळी आटोक्यात राहते. पण या पेयाची चव अतिशय घाण (अगदी याक-थू !) असते. अद्याप हा प्रयोग पुरेशा मधुमेहींवर झालेला नाही.

वाटणारी लेखमाला संपन्न होत आहे. हुरहूर लागलीच. माझ्या मते पूर्णविराम देऊं नका. अर्धविराम द्या. याच अनुषंगाने कितीही काळानंतर आणखी एखादा विषय सुचला की जरूर लिहा. आणखी पाचदहा लेख वर्षादोनवर्षात सहज येऊन जातील.

हेमंतकुमार 05/03/2018 - 08:13
आभार ! नुकतीच माझी नवी लेखमाला 'तंदुरुस्त का नादुरुस्त?' ही मिपावर सुरू झाली आहे. तेव्हा आरोग्य लेखन चालू आहे ☺

लई भारी 08/03/2018 - 12:21
अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल आभार. अगदीच बाळबोध शंका(काहीतरी चुकतंय माहित आहे :) ) जर ४०% ग्लुकोजचे रुपांतर नेहमीच मेदात होते, आणि उपाशी राहण्याची वेळच आली नाही, तर मग मेद बेसुमार वाढतच राहणार नाही का? आपली नेहमीची जीवनशैली आणि मर्यादित व्यायाम(!) पुरेसा आहे का हे मेद वापरण्यासाठी? की इथेच मग व्यायामाची गरज सुरु होते?

हेमंतकुमार 08/03/2018 - 12:52
@ लई भारी, तुमचे एकदम बरोबर आहे. याबद्दल अजून थोडेसे: • मानवाच्या आदिम अवस्थेत शारीरिक श्रम भरपूर होते आणि अन्न मात्र मोठ्या कष्टाने मिळवावे लागे. • म्हणून तेव्हा अन्न कधीतरी मिळायचे. त्यामुळे आपल्या जनुकांमध्ये इंधन हे मेदरुपात साठवण्याची प्रक्रिया नोंदली गेली, जेणेकरून जर काही दिवस अन्न मिळाले नाही तरी आपण जिवंत राहू. • आज बघा काय झालंय! अन्नाची मुबलकता, खूप खायची सवय आणि व्यायामाचा मात्र अभाव. • म्हणून आपले मेदसाठे सातत्याने वाढतात. • मेदपेशींचे वैशिष्ट्य बघा. सुरवातीस जसा मेद वाढू लागतो तसा त्यांचा आकार वाढतो. पण हे एका मर्यादेपर्यंत होते. मग पुढचा मेद स्वीकारण्यासाठी त्या पेशींचे विभाजन होऊन दुप्पट पेशी बनतात. • एकदा का पेशीसंख्या वाढली की ती कधीही कमी होत नाही. • परिणाम –लठ्ठपणा !

चित्रगुप्त 18/03/2018 - 16:54
उत्तम आणि अतिशय उपयोगी लेखमाला. दिवसभरात आहार किती वेळा घ्यावा, याविषयी दोन (परस्परविरुद्ध) मते प्रचलित दिसतात. १. दिवसभरात सात-आठ वेळा थोडे थोडे खावे. २. दिवसातून फक्त दोन वेळा, कडकडून भूक लागली असता खावे. या दोन्हीतील फायदे-तोटे काय काय आहेत ? कुणाकुणासाठी कोण-कोणती पद्धत हितकारक आहे? इन्सुलिन निर्मिती, रक्त शर्करेची पातळी, चरबी साठणे-शरीराचे वजन वगैरेंचा या पद्धतींशी काय संबंध आहे , वगैरेंबद्दल खुलासा करावा ही विनंती.

हेमंतकुमार 18/03/2018 - 21:18
दिवसातून कितीदा खायचे यावर मत देणारे 2 गट आहेत ते अगदी आस्तिक / नास्तिक प्रमाणे ठाम आहेत ! माझे 2 पैसे: १. तारुण्यात जेव्हा सगळे काही तंदुरुस्त आहे तेव्हा दणकून व्यायाम करावा व आवडेल तितक्यावेळा खावे २. 40 नंतर रात्रीचे ‘जेवण’ न करता फक्त थोडेसे खावे, न्याहरी व दुपारचे जेवण यथास्थित घ्यावे. ३. जाड लोकांच्या बाबतीत : जर एका वेळेस मजबूत खायची सवय असेल तर ती वाईट कारण अतिरिक्त ग्लुकोजचे मेद होत राहते. ४. मधुमेहींबाबत : जर PP पातळी बरीच वाढत असेल तर मग अनेकदा थोडेथोडे खावे ५. फक्त दोनदा आणि मजबूत खाणे हे श्रमजीवीना योग्य. ….. मतभेद राहणारच. प्रयोग करून आपापले ठरवावे

चित्रगुप्त 20/03/2018 - 10:56
@कुमार१. आभार. आतापर्यंत मी दिवसभर खात रहावे या प्रमाणे जगत आलो, सध्या वय ६६ आहे. गेल्या चाळीसेक वर्षात कडाडून भूक लागणे हे ठाऊकच नाही कारण पोट नेहमी भरलेलेच असते. अडीच वर्षांपूर्वी मी इथे शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ? या धाग्यात लिहील्याप्रमाणे प्रयोग करून एकंदरित आरोग्य मिळवले. आता वयानुरूप जीवनशैलीत आणखी बदल काय करावेत याचा शोध घेताना डॉ. जग्न्नाथ दिक्षित यांचा व्हिडियो बघण्यात आला, त्यात फक्त दोनदा जेवण्याचे महत्व सांगितलेले आहे. माझे वडील फक्त सकाळी दहा आणि संध्याकाळी ५ वाजता जेवत असत, बाकी वेळी काहीही खात पीत नसत. त्यांचे आरोग्य ८०+ वयातही उत्तम होते, हे उदाहरण माझ्यासमोर असल्याने आता तो प्रयत्न करावा असा विचार आहे, अर्थात दिवसभर खात रहाण्याची सवय सोडणे जरा कठीणच आहे. आपण डॉ. दिक्षित यांनी इन्सुलिन बद्दल जे सांगितले आहे, त्याबद्दल लिहील्यास चांगले होईल.

हेमंतकुमार 20/03/2018 - 11:04
डॉ. दिक्षित यांनी इन्सुलिन बद्दल जे सांगितले आहे,">>> असेच मत डॉ श्रीकांत जिचकार यांचे होते. पण ते सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांनी व्यक्त केले होते. सध्याची वैद्यक पुस्तके 'small frequent meals' चा पुरस्कार करतात. एकूणच या मुद्द्याचे सरसकटीकरण अवघड आहे. पुन्हा डॉक्टर व आहारतज्ज्ञांचेही एकमत नाही.

हेमंतकुमार 15/04/2020 - 09:39
कोविद१९ ने मरण पावलेल्या रुग्णांत बऱ्याच जणांना पूर्वीचा मधुमेह होता, हे एव्हाना माहिती आहे. अन्य काही रुणांच्या अनुभवातून अजून काही माहिती समोर येत आहे. कोविद्चे काही रुग्ण असे होते की त्यांना पूर्वी मधुमेह नव्हता. मात्र आताच्या आजारात रुग्णालयात दखल केल्यानंतर त्यांची ग्लुकोज पातळी खूप वाढत गेली. हे पाहता अशी एक शक्यता व्यक्त केली गेली आहे. करोना २ हा विषाणू स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींनाही इजा पोचवत असावा. अर्थात हे सध्याचे केवळ गृहीतक आहे. अधिक अनुभवातूनच पुढील चित्र स्पष्ट होईल.

हेमंतकुमार 12/07/2021 - 09:38
मधुमेहींच्या जखमा लवकर भरुन काढणारं जैविक बॅंडेज; मराठी शास्त्रज्ञांचं संशोधन https://www.esakal.com/pune/pune-university-second-session-examination-from-today अभिनंदन !

हेमंतकुमार 14/12/2021 - 16:38
नुकताच आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने प्रौढांच्या मधुमेहासंदर्भात एक जागतिक अहवाल प्रकाशित केलेला आहे. त्यासाठी 144 देशांमधील मधुमेह विदा अभ्यासण्यात आला. त्यातील ठळक मुद्दे असे : १. सध्या जगातील दर १० व्यक्तींमागे १ व्यक्ती मधुमेही आहे. २. सुमारे 24 कोटी लोक हे मधुमेहाने बाधित असण्याची शक्यता आहे परंतु त्यांचे निदान झालेले नाही, तर 32 कोटी लोक मधुमेहपूर्व अवस्थेत आहेत. ३. एकूण मधुमेहींच्या तीनचतुर्थांश लोक अल्प व मध्यम आर्थिक उत्पन्न असलेल्या देशांमधले आहेत ४. २०२१ मध्ये ६७ लाख मृत्यू हे मधुमेहाशी संबंधित गोष्टींमुळे झाले. त्यापैकी एक तृतीयांश जण हे साठ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. ५. भविष्यकाळात या आजारात जागतिक वाढ होणार असून ती प्रामुख्याने आफ्रिका, जागतिक मध्यपूर्व आणि दक्षिणपूर्व आशियात होणार आहे.

सिरुसेरि 14/12/2021 - 17:52
उपयुक्त माहिती . काही शंका - १. रक्त तपासणी मधील डी३ , बी१२ , कॅल्शिअम , सीबीसी - हिमोग्राम , शुगर , लोह , प्रो थॉम्बिन , एस पातळी हे घटक एकमेकांवर अवलंबुन असतात का ? २. रक्तातील लोह पातळी कशी मोजतात ? ३. लिव्हर , फुफ्फुस आणी किडनी यांची कार्य क्षमता एकमेकांवर अवलंबुन असते का ?

In reply to by सिरुसेरि

हेमंतकुमार 14/12/2021 - 18:22
१. डी३ , बी१२ , कॅल्शिअम >>> हे ३ हाडांच्या आरोग्याचे संदर्भात एकमेकांशी निगडित आहेत. सीबीसी - हिमोग्राम , लोह >>> हे रक्तघटक एकमेकांशी निगडित आहेत. ग्लुकोज >>> याचा स्वतंत्र प्रांत आहे. प्रोथॉम्बिन >>>> रक्त गोठण्याबाबत याचा स्वतंत्र प्रांत आहे.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 14/12/2021 - 18:28
रक्तातील लोह पातळी कशी मोजतात
त्यासाठी शिरेतून रक्त काढतात. ते बाटलीत गोठू दिल्यावर त्यातून सेरुम नावाचा द्रव पदार्थ पाझरतो. त्या द्रवामध्ये लोहाची मोजणी प्रयोगशाळेत करता येते. त्याच्या जोडीने टीआयबीसी ही तपासणी देखील करतात. अर्थात ह्या मोजण्या तशा पुरातन आहेत आणि अलीकडे त्यांना सर्वसामान्य रुग्णांमध्ये विशेष महत्त्व दिले जात नाही. हिमोग्लोबिनची पातळी आणि सीबीसी यांच्या एकत्रित अभ्यासावरून आपल्याला शरीरातील लोहासंबंधी पुरेशी माहिती मिळते. रक्ताच्या ठराविक आजारांत लोहाकडे स्वतंत्र लक्ष दिले जाते.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 14/12/2021 - 18:38
यकृत , फुफ्फुस आणी मूत्रपिंड यांची कार्य क्षमता एकमेकांवर अवलंबुन असते का ?
>>>> यकृत व मूत्रपिंड यांचे एकमेकाशी जवळचे नाते आहे. शरीरातील चयापचयात यकृत मध्यवर्ती भूमिका निभावते. चयापचयात तयार झालेले त्याज्य पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे तितकेच महत्त्वाचे काम मूत्रपिंड करते. या दोघांपैकी एकाचे कार्य बिघडल्यास दुसऱ्यावर देखील कालांतराने परिणाम होतो. फुफ्फुस हे श्वसनाशी संबंधित असल्यामुळे वरील दोघांपेक्षा वेगळ्या विभागात मोडते. त्याचा वरील दोन इंद्रियांशी तसा थेट संबंध नाही. (मात्र सर्व महत्त्वाच्या इंद्रियांचा एकमेकांशी अप्रत्यक्ष संबंध कुठेना कुठे येतो).

हेमंतकुमार 31/12/2021 - 10:59
मधुमेह (प्रकार1) असलेल्या रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन उपचार घेत राहावे लागतात. अशा दीर्घकालीन इंजेक्शन्स पासून सुटका होण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन केली काही वर्षे चालू आहे. त्यातील अलीकडे चालू असलेले संशोधन म्हणजे मूळ पेशींचा वापर. यामध्ये शरीरात त्वचेखाली विशिष्ट मूळ पेशी रोपित केल्या जातात. शरीरात पुढे त्यांचे रूपांतर स्वादुपिंडाच्या बी पेशींमध्ये होते आणि मग ह्या नव्या पेशी इन्शुलिन निर्मिती करू लागतात. सध्या या अभ्यासाचे दुसऱ्या टप्प्यातील प्रयोग चालू आहेत. तूर्त अशा रुग्णांना हे उपचार केल्यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती दाबणारी काही औषधे द्यावी लागतात. हा तोटा आहे. परंतु भविष्यात यावरही मात करायचा विचार चालू आहे. त्यासाठी अशा मूळ पेशींची निर्मिती केली जाईल की, ज्या रोपित केल्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे घ्यावी लागणार नाहीत. येत्या काही वर्षात हे संशोधन यशस्वी होऊ शकेल.

हेमंतकुमार 02/02/2022 - 19:33
मधुमेही रुग्णांसाठी रक्तातील ग्लुकोजची तपासणी वारंवार करावी लागते. त्यासाठी बोटाला सुई टोचण्याचा अप्रिय उद्योग करावा लागतो. यापासून सुटका करण्यासाठी विविध प्रकाचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे. नुकतेच एका कॅनेडियन उद्योगाने एक नवे उपकरण बनवले आहे ज्यात रुग्णाच्या बोटाला सुई टोचण्याचा प्रकार नाही. रुग्णाने फक्त उपकरणाच्या भागावर एक मिनिट बोट ठेवायचे आहे. या उपकरणात ईसीजी तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला नवप्रज्ञेची जोड दिलेली आहे. या उपकरणाचे प्रारूप नुकतेच एका परिषदेत सादर झाले. यथावकाश ते औषध प्रशासनाच्या मान्यतेसाठी दाखल होईल.

हेमंतकुमार 11/05/2022 - 10:10
रक्तातील ग्लूकोज पातळी जाणून घेण्यासाठी आता सुई थेट रक्तवाहिनीत जाण्याची गरज नाही. यासंदर्भात नुकतेच जाहीर झालेले कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन इथे आहे यामध्ये काही सूक्ष्म सुया एका पापुद्र्यावर लावतात आणि तो एका छोट्याशा इ- डबीत ठेवून ती डबी दंडावर सतत लावून ठेवता येते. सूक्ष्म सुयांच्या मदतीने त्वचेखालील पेशीद्रवामध्ये ठराविक रसायनाची पातळी मोजता येते. सध्या या उपकरणात त्यांनी ग्लूकोज, अल्कोहोल आणि लॅक्टेट या तिघांची पातळी सतत समजत राहील अशी योजना केली आहे. त्यासाठी या छोट्या उपकरणाला मोबाईलमधील ॲपची जोड द्यावी लागते. आता हे तीन घटक एकत्र का, असा प्रश्न पडेल. ज्या मधुमेहींना बऱ्यापैकी मद्यपानाचे व्यसन असते त्यांच्यात ग्लूकोज पातळी एकदम कमी होण्याचा धोका असतो. त्यानंतर जे काही बदल शरीरात होतात त्यात लॅक्टेट हा नकोसा घटकही वाढतो. या तिन्ही पातळ्या एकत्रित समजल्याने अशा रुग्णांना मद्यपान नियंत्रणात ठेवता येईल.

हेमंतकुमार 19/05/2022 - 15:33
मधुमेह उपचारांची नवी दिशा या आजारावर साध्या गोळीपासून ते इन्शुलिनच्या विविध पंपांपर्यंत अनेक प्रकारचे उपचार सध्या उपलब्ध आहेत. तरीदेखील सर्व रुग्णांना समाधानकारक वाटेल अशा उपचारांची गरज कायम आहे. अलीकडे संशोधकांनी अल्ट्रासोनिक लहरींचा शरीरावर ठराविक भागात मारा करून काही प्रयोग केले आहेत. यामध्ये पोटावरील यकृताचा भोवतालच्या भागामध्ये ठराविक प्रकारच्या लहरींचा बाहेरून मारा केला जातो. त्यातून ग्लुकोजचा चयापचय आणि इन्शुलिनचे कार्य सुधारते असे प्राण्यांमध्ये दिसून आले आहे. नुकताच एक प्रयोग मानवी स्वयंसेवकांरही करण्यात आलेला आहे त्याचे निष्कर्ष अद्याप प्रसिद्ध व्हायचे आहेत.

हेमंतकुमार 23/09/2022 - 10:54
मधुमेहाच्या पहिल्या प्रकारासंदर्भात (T 1) काही महत्त्वाची माहिती प्रकाशित झालेली आहे. सुमारे 201 देशातील अशा रुग्णांचा अभ्यास करून एक महाविदा तयार केलेला आहे . या आजाराची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातली वाटचाल अशी असणार आहे: १. या आजाराची सुरुवात लहान वयात होते असे आता राहिलेले नाही. या आजाराने.बाधित रुग्णांचे जागतिक सरासरीचे (median) वय 37 झाले आहे. २. सध्या या आजारामुळे बाधित असलेल्या सुमारे ८४ लाख रुग्णांपैकी सुमारे वीस टक्के रुग्णांचा मृत्यू वयाच्या 25 वर्षांच्या आत होतो. आजाराचे वेळीच निदान न होण्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. ३. सन २०४० पर्यंत एकूण रुग्णांची जागतिक संख्या दुप्पट होण्याचा अंदाज आहे. ही वाढ मुख्यत्वे गरीब देशांमध्ये होईल.

हेमंतकुमार 14/11/2022 - 09:57
सर्व मधुमेहीना जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने आजार नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा ! आज बालदिन सुद्धा आहे. भारतातील एकूण मधुमेह रुग्णांपैकी 12 टक्के रुग्ण बालके आहेत.

हेमंतकुमार 08/12/2022 - 08:28
जागतिक मधुमेह नियंत्रणासंबंधी WHO ने नुकतीच सन 2030 पर्यंतची उद्दिष्टे जाहीर केलेली आहेत : • मधुमेह असणाऱ्या 80 टक्के लोकांचे रोगनिदान झाले पाहिजे • 80 टक्के मधुमेही रुग्णांची ग्लुकोज पातळी नियंत्रणात रहावी • 80 टक्के मधुमेही रुग्णांचा रक्तदाब 140 /90 च्या आत असावा • टाईप 1 मधुमेह असणाऱ्या 100% रुग्णांना इन्शुलिन आणि घरच्या घरी ग्लुकोजपातळी स्वतः मोजण्याची यंत्रणा उपलब्ध व्हावी

हेमंतकुमार 15/03/2023 - 20:38
प्रगतीपथावरील संशोधन: stevia या वनस्पतीपासून बनवलेला गोड पदार्थ सध्याच्या साखरेइतकाच (किंवा जास्त) गोड, परंतु न्यूनतम उष्मांकयुक्त. https://scitechdaily.com/a-sweeter-more-environmentally-friendly-alternative-to-sugar/

हेमंतकुमार 28/05/2023 - 16:26
मधुमेह (प्रकार २) नियंत्रित करण्यासाठी 21 प्रकारच्या वनस्पतींवर नुकतेच भारतात संशोधन झालेले आहे. या उपयुक्त वनस्पतींमध्ये विजयसार, जांभूळ, जिरे, दारूहरीद्र, तोंडली, बेल, मेथी, लिंबू, आवळा आणि हळद यांचा समावेश आहे. यातील काही वनस्पतींपासून BGR 34 हे औषध तयार करण्यात आलेले आहे. सदर संशोधन JIPMER - पुदुच्चेरी आणि AIIMS -कल्याणी या संस्थांमध्ये झाले. संबंधित शोधनिबंध "वर्ल्ड जर्नल ऑफ डायबिटीस" मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

हेमंतकुमार 14/07/2023 - 08:52
गव्हाचे पदार्थ खाल्ल्यानंतर वाढणारा ग्लुकोज निर्देशांक हा मधुमेहींच्या दृष्टीने कळीचा मुद्दा. अलीकडेच पंजाब कृषी विद्यापीठाने गव्हाची एक नवी जात (PBW RS1) विकसित केली आहे. या गव्हात रेझीस्टंट स्टार्चचे प्रमाण जास्त आहे. हा गहू आतड्यांमध्ये सावकाश पचतो आणि त्यामुळे ग्लुकोज निर्देशांक नियंत्रणात राहतो. तसेच या गव्हाच्या पदार्थांमुळे पोट भरण्याची भावना लवकर येते. ( बातमी : छापील इंडियन एक्सप्रेस, १० जुलै 2023).

हेमंतकुमार 21/03/2024 - 12:14
निर्बंध
एनसीपीसीआर म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स या आस्थापनेने नुकतीच सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्राहक व्यवहार विभागांना नोटीस पाठवून बोर्नव्हिटासह तत्सम कोणतीही पेये आरोग्यदायी पेये म्हणून विकली जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला सांगितले आहे. ..... बालरोगतज्ज्ञांनी मात्र या कंपन्यांचे दावे खोडून काढले होते. त्यांच्या मते आरोग्यदायी पेये म्हणून मुलांना दिल्या जाणाऱ्या पेयांमध्ये असलेली साखर मुलांच्या रोजच्या हालचालींसाठी अतिरिक्त ठरते. या साखरेचे सेवन केल्याने मुलांमध्ये तृष्णा, चिडचिड, थकवा इत्यादी गोष्टी वाढू शकतात. आरोग्यदायी पेय म्हणवल्या जाणाऱ्या पेयांमुळे प्रत्यक्षात मुलाचे आरोग्य सुधारत नाही.

हेमंतकुमार 07/04/2024 - 06:02
जागतिक आरोग्य दिनानिमित्त (७ एप्रिल) सर्वांना उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा ! सद्यस्थितीत भारतातील प्रमुख आजारसमस्या अशा आहेत : १.सर्वच राज्यांमध्ये बिगर-संसर्गजन्य रोग आणि अपघाती इजा यांचे प्राबल्य आहे. या दोन समस्यानी मिळून, संसर्गजन्य रोग आणि बालरोग यांना मागे टाकले आहे. २.परंतु उत्तरेकडील गरीब राज्यांमध्ये मात्र हगवण, श्वसनविकार, लोहन्यूनता, क्षयरोग आणि नवजात बालकांचे आजार या प्रमुख समस्या आहेत. ३.बिगर-संसर्गजन्य रोगांमध्ये, हृदयविकार, मधुमेह, श्वसन अडथळ्याचे विकार, मनोविकार, मेंदूविकार, कर्करोग, हाडांचे विकार आणि दीर्घकालीन मूत्रपिंड विकारांचा प्रामुख्याने समावेश आहे. ४. विविध आजारांचे धोके वाढवणारे घटक असे दिसले आहेत : *कुपोषण आणि अतिपोषण *उच्च रक्तदाब *उपाशीपोटीची वाढलेली ग्लुकोज पातळी *वाढलेली कोलेस्टेरॉल पातळी या घटकांचा वाटा एकूण आरोग्यसमस्यांच्या एक चतुर्थांश आहे. असे हे सर्वसाधारण चित्र.

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 07/04/2024 - 14:24
धन्यवाद कुमारजी! खुप छान माहिती आहे.जागतिक आरोग्य दिवस पण कशाप्रकारे सामूहिकरित्या याविषयी ऊहापोह करावा हे समजत नव्हते.तुमची ही माहिती स्टेटसला आज ठेवली, खुप जणांना आवडली. प्लीज प्रश्नाचा आवाका मोठा आहे पण थोडक्यात सांगाल का?
उपाशीपोटीची वाढलेली ग्लुकोज पातळी
म्हणजे काय व कसे?

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 07/04/2024 - 15:33
ही माहिती स्टेटसला आज ठेवली
>>> धन्यवाद !
उपाशीपोटीची वाढलेली ग्लुकोज पातळी म्हणजे काय व कसे?
चांगला प्रश्न आहे. निरोगी माणसात उपाशीपोटीची ग्लुकोज पातळी ७० - १०० mg/dL असते. या पुढील टप्प्यात जेव्हा ती १०१ - १२५ mg/dL या रेंजमध्ये येते त्याला आपण बिघडलेली पातळी ( IFG) किंवा मधुमेहपूर्व अवस्था म्हणतो. त्यानंतर सुमारे दहा वर्षांच्या आतच ( नक्की हे संक्रमण नक्की किती वर्षांमध्ये होईल हे अर्थातच आनुवंशिकता आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून असते) ही पातळी १२६ mg च्या वर जाऊ शकते आणि मधुमेह-निदान होते. म्हणूनच निरोगीपणात चाळणी चाचण्यांचे महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला एखाद्याची पातळी मधुमेहाच्या पूर्व अवस्थेतच मिळते तेव्हा आपण आहार आणि व्यायामासारखे नैसर्गिक उपाय राबवू शकतो. सध्याच्या भारतातील परिस्थितीत खूप जण अशा पूर्व अवस्थेमध्ये आहेत. तसेच, जिथे आरोग्य सुविधा पुरेशा उपलब्ध नाहीत त्या भागात चाचण्याही न झाल्यामुळे असे अनेक छुपे लोक आहेत. ते शोधून काढणे महत्त्वाचे आहे.

हेमंतकुमार 25/04/2024 - 07:46
नवे संशोधन बटाटा हा अनेकांना खाण्यास अत्यंत प्रिय असतो. परंतु त्यातील गच्च भरलेल्या स्टार्चमुळे तो ग्लुकोज निर्देशांकाच्या बाबतीत काळजी उत्पन्न करतो. यावर उपाय म्हणून इसराइलमधील संशोधकांनी जैवतंत्रज्ञान आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या मदतीने PoLoPo या प्रकारचे नवे बटाटे तयार केले असून ते प्रथिनसमृद्ध आहेत. सन 2026 मध्ये ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकतील.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 25/04/2024 - 09:11
या संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे, गरीब देशांमधील कुपोषित बालकांसाठी या नव्या बटाट्याच्या रूपाने एक चांगला (बऱ्यापैकी) स्वस्त आणि मस्त प्रथिनयुक्त आहार उपलब्ध होईल.

युरिआ व क्रिअ‍ॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक

हेमंतकुमार ·

एस 01/01/2018 - 14:58
दीर्घ उपोषणाने क्रिअ‍ॅटिनीनची पातळी वाढते असे अण्णा हजारे यांच्या उपोषणासंबंधित बातम्या वाचून समजले होते. रक्तात युरिआ आणि क्रिअ‍ॅटिनीन यांची पातळी वाढल्यास कोणते दृश्य परिणाम होतात? पित्ताच्या गांध्या येण्याशी त्याचा काही संबंध आहे का?

In reply to by एस

कंजूस 02/01/2018 - 12:35
कुमार१ यांचे पुर्वीचे आरोग्यविषयीचे लेख बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस 20 Dec 2017 लिंक:http://www.misalpav.com/node/41676 रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर 3 Dec 2017 3 Dec 2017 लिंक:http://www.misalpav.com/node/41581 हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन 15 Nov 2017 लिंक:http://www.misalpav.com/node/41474 कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ 8 Nov 2017 लिंक:http://www.misalpav.com/node/41421 मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक 25 Oct 2017 लिंक:http://www.misalpav.com/node/41353 इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा 16 Oct 2017 लिंक:http://www.misalpav.com/node/41287 कर्करोगाचा विळखा 21 Sep 2017 - लिंक:http://www.misalpav.com/node/41018 उपवासाचे ढोंग 20 Sep 2017 लिंक:http://www.misalpav.com/node/40992

हेमंतकुमार 01/01/2018 - 15:29
दीर्घ उपोषणाने शक्य आहे रक्तात युरिआ आणि क्रिअ‍ॅटिनीन यांची पातळी वाढल्यास कोणते दृश्य परिणाम होतात? >>>>> या पदार्थांचे असे परिणाम नसतात. त्यामागील मूत्रपिंड-विकाराची लक्षणे दिसतील. त्वचा खाजेल पण गांधी नाही येणार

तिमा 01/01/2018 - 19:12
अतिशय माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेख. इतक्या सोप्या भाषेत याआधी अशी माहिती वाचायला मिळाली नव्हती. लिहित रहा, आम्हाला एज्युकेट करा, शरीरशास्त्राबद्दल.

In reply to by तिमा

पुंबा 02/01/2018 - 19:03
++११ शिवाय शंकानिरसन करतात हे मोठे काम खरोखर. डॉ. कुमारसाहेब, आपल्याकडून असेच अभिनिवेशहीन तसेच माहितीपूर्ण लिखाण नव्या वर्षात देखिल मिपाकरांना वाचावयास मिळो.

In reply to by पिंगू

हेमंतकुमार 01/01/2018 - 20:11
पिंगू, उत्तम प्रश्न. तुमच्या प्रश्नाने मला गाडीवरून उठवून डेस्कटॉपवर बसवले आहे. उत्तर देतो खालील मुद्द्यांत : १. दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराच्या (CKD) १ ते ५ अशा स्टेजेस असतात. त्या ‘चाळणी यंत्रणेची क्षमता (GFR) मोजून निश्चित केल्या जातात. स्टेज १ ही ‘ठीक’ स्थिती तर स्टेज ५ ही सर्वात वाईट असे असते. त्यानुसार ‘क्रिअ‍ॅटिनीनची पातळी वाढत जाते. २. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार (म्हणजेच वाढलेले क्रिअ‍ॅटिनीन) >> रक्तात पाणी व सोडियम जास्त साठते >> volume वाढतो >> उच्च रक्तदाब. ३. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार >>> हृदयविकार >> heart failure ४. उच्च रक्तदाब हे दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराचे कारण आणि परिणाम असे दोन्ही आहे! (Hypertension is both a cause and a consequence of Kidney disease.)

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 01/01/2018 - 21:41
उच्च रक्तदाब.>> हृदयाचा पम्प करायचा ताण वाढला >> हृदयाचे failure त्यामुळे CKD ची वाढलेली स्टेज हृदयासाठी लै वाईट.

In reply to by हेमंतकुमार

चौकटराजा 19/01/2018 - 17:13
माझी सध्याची मूत्र यूरिया व क्रिआटिनिन रिडिंग सामान्य आहेत. पण मायक्रोअल्बौमिन ३० आहे . याचा अर्थ चाळनीत बिघाड व्हायला सुरूवात झाली आहे. याला किडनी फेल्युअर स्टेज २ असे नाव आहे.

Nitin Palkar 01/01/2018 - 19:56
अतिशय माहितीपूर्ण! 'प्रोस्टेटची मोठी वाढ' या संबंधी अधिक माहिती द्याल का? यावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे का?

हेमंतकुमार 01/01/2018 - 20:24
प्रोस्टेटची मोठी वाढ >>> ही दोन कारणांनी असते: १. वयानुरुप होणारी सौम्य (Benign) २. तिच्या कर्करोगाने होणारी (malignant) तूर्त वयानुरुप होणारी सौम्य (Benign)चाच विचार करू : १. पारंपरिक उपचार - शस्त्रक्रिया २. अलिकडे काही औषधांमुळे ती वाढ बर्‍यापैकी रोखणे शक्य होत आहे. एका सर्जन मित्राने सांगितले की कालौघात ह्या आजाराचा उपचार "सर्जिकल" कडून "मेडिकल" कडे झुकत आहे. हे वाक्य पूर्ण खरे झाल्यास ते रुग्णांस वरदान ठरेल. टीप : वरील माहितीबाबत तज्ञां मध्ये मतांतरे असतील, हे नक्की. तेव्हा "आपापल्या डॉ. चा सल्ला घ्या. "कोणती औषधे" हे मी इथे लिहीणार नाही. क्षमस्व.

आनन्दा 02/01/2018 - 10:42
एक विनंती आहे, तुम्ही पहिले सगळे लेख गोळा करून एक लेखमाला तयार करावी.. जसे की समथिन्ग लाइक हसतखेळत शरीरशास्त्र किवा तत्सम.. म्हणजे आम्हाला शोधणे देखील सोपे जाईल.

हेमंतकुमार 02/01/2018 - 11:16
आनंदा, आभार. अनुक्रमणिका करण्यासाठी साहित्य संपादकांना दोनदा विनंती करून झाली आहे. अद्याप प्रतिसाद नाही. तुम्ही काही सुचवता का?

In reply to by हेमंतकुमार

आनन्दा 02/01/2018 - 11:56
सा सं कडून होणे शक्य नसेल तर पुढच्या भागात तुम्हीच मागच्य सगळ्या भागांच्य लिंक द्या. म्हणजे आपोआप ट्रॅक होइल

In reply to by हेमंतकुमार

आदूबाळ 02/01/2018 - 20:06
नमस्कार कुमार. अनुक्रमणिका करण्यात काही तांत्रिक अडचण येते आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. दरम्यान, आनंदा यांनी सुचवल्याप्रमाणे तुम्ही प्रतिसादात लेखांचे दुवे टाकू शकल्यास तूर्तास प्रश्न सुटेल.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 02/01/2018 - 20:26
स.न. माझ्या आरोग्य लेखमालेची अनुक्रमणिका करताना खालीलप्रमाणे फक्त ७ लेख घ्यावेत : 'इनसुलिन (१६/१०/ १७) पासून युरिआ.. (१/१/१८) पर्यन्त. पुढे नवे होतील तसे कळवेन आभार आणि नववर्ष शुभेछा !

In reply to by चौथा कोनाडा

हेमंतकुमार 25/04/2024 - 07:35
ती नाही होऊ शकलेली. त्यानंतर कोविड19 लेखमालासाठी अनुक्रमणिका करावी अशी पण विनंती केली होती. परंतु संपादकांनी कळवले की अनुक्रमणिका करण्याचे काम बंद आहे.

हेमंतकुमार 02/01/2018 - 12:24
ते होऊ नयेत यासाठी भारतीय हवामानात असे करता येईल: १. दर २४ तासात २.५ ते ३ लिटर पाणी पिणे ( उन्हाळ्याच्या तीव्रतेनुसार ठरवणे) २. ‘अ’ दर्जाची शहरे सोडून अन्यत्र राहणाऱ्यांनी पिण्याचे पाणी व्यवस्थित गाळून घेणे. यात सोप्या candle फिल्टर पासून लय भारी उपकरणांपर्यंत अनेक पर्याय आहेत. त्यावर फार चर्चा न करता आपल्या बुद्धीस पटेल ते वापरावे. ३. काय खाऊ नये .... वादग्रस्त आणि मतांतरे असलेला प्रश्न ! काहींच्या मते या भाज्या टाळा / कमी खा : आळू, पालक, मेथी, टोमाटो, कोबी व वांगे. यात oxalates जास्त असतात. ४. जर ‘युरीक असिड’ ची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढलेली असेल तर शाकाहारी व्हा; अंडे जरूर खा. ५. काय जास्त खा ?...... आहारतज्ञ सांगू शकतील. ६. फार लोकांचा सल्ला घेऊ नका, मनातील गोंधळ वाढेल !!

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 02/01/2018 - 19:08
आपल्या ताजमहालाला माझी एक वीट Diet and renal stone formation. वरील दुवा वाचावा. यात सांगितलेला DASH आहार खालीलप्रमाणे DASH आहार (Dietary Approaches to Stop Hypertension) हा आहार म्हणजे भरपूर फळे भाज्या आणि कमी मलईचे दूध (होल ग्रेनस)म्हणजेच कोंडा न काढता केलेली पीठे ( मैद्यासारखे पदार्थ टाळून) कमी चरबीयुक्त मांसाहार इ इ. http://dashdiet.org/what_is_the_dash_diet.asp हा आहार आणि भरपूर पाणी पिणे. ज्यांना मुतखडा आहे त्यांनी रोज "कमीत कमी" तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे आणि जर उन्हात काम करत असलात तर या तीन लिटर मध्ये दर दोन तासाला अजून एक लिटर या दराने पाण्याचे प्रमाण वाढवावे. आपले पाण्याचे प्रमाण ३ लिटर पेक्षा जास्त असेल तर आपली मुतखडा होण्याची प्रवृत्ती ८० % ने कमी होते या आपली लघवी जर दिवसात "अडीच लिटर" होत असेल तर आपले मुतखडे होण्याचे प्रमाण ६० % ने कमी होते. स्रोत -- हॅरिसन टेक्सटबुक ऑफ इंटर्नल मेडिसिन कॅल्शियम खाल्याने मूतखडा होतो हा एक गैरसमज आहे. असे असते तर तंबाखू /गुटखा खाणाऱ्या प्रत्येक माणसाला मुतखडा झाला असता. उलट कॅल्शियम कमी घेतल्याने आहारातील ऑक्झलेट जास्त प्रमाणात शोषले जाऊन ऑक्झॅलेटचे खडे मात्र होतात. त्यामुळे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कमी करण्याचे काहीही कारण नाही. आहारातील या भाज्या/ पाले भाज्या कमी करण्याचे कोणतेही कारण नाही कारण वरील भाज्या/ पालेभाज्या अन्न अल्कलाईन ठेवतात त्यामुळे मुतखड्याला प्रतिबंध होतो. मग त्यातील ऑक्झलेट जास्त असले तरी आपल्या आहारातील कॅल्शियम व्यवस्थित असेल तर चिंता करण्याचे कारण नाही.

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 02/01/2018 - 19:51
सुबोध, तुमच्या सोन्याच्या ‘विटेबद्द्ल’ आभार ! अहो, हे ‘काय खाऊ नये’ बद्दल मूत्रशल्यविशारदांमध्ये देखील इतके मतभेद आहेत की आपण डॉक्टर सुद्धा गोंधळून जातो! मला वाटते की तो पाण्याचा मुद्दा सर्वांनी ध्यानात घ्यावा एवढेच.

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 02/01/2018 - 20:30
पाण्याचा मुद्दा सर्वांनी ध्यानात घ्यावा एवढेच. +१ माझ्याकडे येणार्या सर्व रुग्णांना मी एवढेच सांगतो. -- पाणी प्यायल्यामुळे केवळ लघवीला जास्त वेळा जावे लागेल हे सॊडले तर काहीही "नुकसान" नाही. पाणी फुकट मिळते. मी तुम्हाला जो सल्ला देतो आहे त्यात माझा "पाच पैशाचा" फायदा नाही. मी तुम्हाला कोणतीही जडीबुटी किंवा तत्सम औषध देत नाही. ( अशा कोणत्याही किंवा आयुर्वेदिक अथवा होमीयोपॅथीक औषधाने खडा गेलेला मी गेल्या २७ वर्षात पाहिलेला नाही). मुतखडा होण्याची तुमची प्रवृत्ती आहे त्यासाठी आयुष्यभर औषध घेणे हा अनैसर्गिक उपाय आहे. आयुष्यभर पाणी पिणे यात अनैसर्गिक काहीच नाही. बाकी सर्व आपली मर्जी. मुतखडयाचे ६० रुग्ण आणि पित्ताशयातील खडयाचे जवळजवळ ४५ रुग्ण मी तीन वर्षे पर्यंत सोनोग्राफी करून पाठपुरावा केला (याचे मुळ असे आहे पुण्यात मी १९९१ ते १९९७ या काळात ए एफ एम सी ला क्ष किरण विभागात कामाला होतो तेंव्हा आलेले लष्करातील (सैन्य आणि वायुसेना) यातील रुग्ण जेंव्हा वरील खड्यांचे निदान होत असे तेंव्हा त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जात असे. बरेच रुग्णांनी मला असे विचारले कि आम्ही आयुर्वेदिक किंवा होमियोपथिक उपचार करून पाहू का? मी त्यांना हो असे सांगत असे.आणि जुना रिपोर्ट घेऊन सहा महिन्यांनी परत या असे सांगत असे. त्यावर ते सर्व आपापल्या माहितीच्या आयुर्वेदिक किंवा होमियोपथिक डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत असत. यात पुण्यातील अत्यंत कीर्तिमान आणि दिग्गज डॉक्टर आहेत आत्ता मला आठवते आहे त्यात डॉक्टर हबू (होमेओपाथ) वैद्य खडीवाले, वैद्य वेणी माधव शास्त्री जोशी, वैद्य चंद्रशेखर जोशी आणि इतर. हे सर्व रुग्ण लष्करातील लोक असल्याने त्यांना सोनोग्राफी फुकट असे.असे वर म्हटल्याप्रमाणे मी रुग्ण ३ वर्षे पर्यंत "पाठपुरावा" केला.माझ्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे एकही रुग्णाचा एकही खडा गेल्याचे मला आढळले नाही(मुतखडा १ सेमी पेक्षा कमी असेल तर तो स्वतः हून मुत्रावाटे निघून जाऊ शकतो असे रुग्ण यात गृहीत नाहीत) यामुळे पित्ताशयातील खडे किंवा मुतखडा या रोगांवर आयुर्वेदिक किंवा होमिओपथि च्या औषधाचा उपयोग होतो असे मला वाटत नाही. या तपासणी मध्ये माझा वैयक्तिक पूर्वग्रह (bias) आधुनिक वैद्यकशास्त्राकडे आहे हे गृहीत धरले तरी दृष्टीस दिसणाऱ्या गोष्टी दृष्टीआड करणे मला तरी पटत नाही.http://www.misalpav.com/comment/459557 या धाग्यावर मी वरील प्रतिसाद दिला होता.

In reply to by सुबोध खरे

महेश हतोळकर 03/01/2018 - 12:37
साध्या पाण्यापेक्षा शहाळ्याचे पाणी जास्त लाभदायक असते असे म्हणतात. कितपत खरं आहे हे?

In reply to by महेश हतोळकर

हेमंतकुमार 03/01/2018 - 12:57
मूतखड्यांच्या संदर्भात ते पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त आहे असे काही सिद्ध झालेले नाही. त्याचा काहीसा अल्कलाईन गुणधर्म हा विशिष्ट खडे विरघळवण्यासाठी उपयोगी पडेल. पण भरपूर पाणी पिणे हे अधिक महत्वाचे आहे. बाकी जुलाब होत असताना त्याचा 'सलाइन' सारखा परिणाम उपयुक्त आहे.

In reply to by हेमंतकुमार

४. जर ‘युरीक असिड’ ची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढलेली असेल तर शाकाहारी व्हा; अंडे जरूर खा.
डॉक्टर साहेब , ह्या वर जास्त प्रकाश टाकू शकाल का ? मी तुमचा युरिक ऍसिड / गौट चा लेख वाचला आहे पण अंड कस काय उपयुक्त आहे हे कळेना , सध्या मी युरिक ऍसिड लेव्हल जास्त झाल्याने उपचार घेत आहे तुमचे लेख इतके सुंदर आहेत कि अगोदरच पोच द्यायला हवी होती , क्षमस्व !!!

In reply to by माझीही शॅम्पेन

हेमंतकुमार 21/06/2018 - 19:26
धन्यवाद. सांगतो. शाकाहारी व्हा म्हणजे लाल मांस व मासे बंद करा कारण त्यात Purines चे प्रमाण खूप आहे. याउलट अंड्यात purines कमी असल्याने ते खाल्ले तरी युरिक पातळी विशेष वाढणार नाही. मथितार्थ: कुठले तरी प्राणिज अन्न खायचेच असेल तर अंडे जरूर चालेल; त्याने गाउट ला फायदा नाही होणार .

In reply to by हेमंतकुमार

धन्यवाद डॉक्टर साहेब , खूप दिवसांनी प्रतिसाद देतोय राग नका मानू , गाऊट साठी काय खाऊ नये हैच लिस्ट मोठी होत चाललीये तुम्हाला थोडा वेळ असेल तर , भाज्या , फळे , कंदमुळे ह्यात काय निर्धास्तपणे खाऊ शकतो ह्याची लिस्ट देता येईल , आंतरजालावर कधी कधी परस्परविरोधी माहिती मिळते , जस काही जण म्हणतात मोड येणारी कडधान्ये अजिबात खाऊ नये , काही म्हणतात कडधान्ये थोड्या फार प्रमाणात चालतात

In reply to by माझीही शॅम्पेन

हेमंतकुमार 13/11/2018 - 14:10
मोड येणारी कडधान्ये अजिबात खाऊ नये >>>> असहमत. मूग, चवळी इ. मोड आणून शिजवून जरूर खा. पावटा, वाटाणा इ वर बंधन ठीक आहे. जर शाकाहारी अधिक अंडे खाणारे असाल तर उत्तम. मग आहाराचा फार विचार करू नका. मद्यपान नकोच. अलीकडच्या संशोधनानुसार आहारापेक्षा जनुकीय घटक अधिक महत्त्वाचे आहेत. ते लक्षात घ्या व मस्त जगा !☺️

सान्वी 02/01/2018 - 16:52
धन्यवाद, तुमच्या मालिकेमुले खूप प्रश्नांची उत्तरे मिलत आहेत. सध्या वारंवार ऐकू येण्यार्या विशेषत: स्त्रीयांच्या संदर्भात थायराइड किंवा TSH बद्दल ही लिहावे ही विनंती.

urenamashi 03/01/2018 - 11:54
कुमार सर,आपण अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी लेखमाला चालू केल्यामुळे अगम्य असणारी वैद्यकीय माहिती तेही अतिशय सोप्या भाषेत मिळत आहे. त्यामुळे खूप खूप आभारी आहे

In reply to by urenamashi

हेमंतकुमार 03/01/2018 - 12:28
उरेनामाशी, आभारी आहे. वाचकांना माला उपयुक्त वाटली याचे समाधान आहे तुमच्या Id बद्दल कुतूहल आहे. हे आडनाव आहे की अन्य काही?

अनिंद्य 03/01/2018 - 21:08
@ कुमार१, तुमच्या वैद्यकीय विषयावरच्या लेखांची यादी ह्या लेखाच्या प्रारंभी दिली हे उत्तम झाले. सोप्या शब्दात माहिती सांगण्याची तुमची हातोटी आवडते. प्रतिसादकर्त्याच्या शंका-प्रश्नांना उत्तर देण्यास तुम्ही अजिबात कंटाळा करत नाही हे अधिकच आवडते. पु भा प्र, अनिंद्य

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 03/01/2018 - 21:22
अनिंद्य, मनापासून आभार ! बाकी तुमचे माल दिव मस्त चालू आहे. त्यातले आवडणारे फोटो मी क्रमाने माझ्या मोबाइल च्या मुखपृष्ठावर घेत असतो ☺ नववर्षाच्या शुभेच्छा!

हेमंतकुमार 04/01/2018 - 19:05
या दोन पदार्थांच्या निमित्ताने काही मूत्रविकारांवर चर्चा केली याचे समाधान आहे. मुतखडे व प्रोस्टेट या नेहेमी च्या आजारांवर चर्चा होणे स्वाभाविक होते तसेच मूत्रपिंड विकार व उच्च रक्तदाब यांचे एकमेकांशी असलेले दुष्टचक्राचे नाते समजावता आले या मालेतील पुढचा लेख काही दिवसांनी लिहीन. त्यामध्ये एक महत्त्वाचे प्रथिन आणि एक अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय यांचे विवेचन असेल तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद!

OBAMA80 26/01/2018 - 12:47
कुमारजी, सोप्या शब्दात ही एरवी किचकट वाटणारी माहिती सांगण्याची तुमची शैली आवडली. बर्याच गोष्टी नव्याने कळाल्या. उच्च रक्तदाब व आजकाल सगळ्यांना भेडसावणारा मधुमेह यावर सविस्तर लिहावे ही नम्र विनंती.

हेमंतकुमार 11/05/2018 - 10:07
मूतखडे हा साधारणपणे प्रौढांचा आजार मानला जातो. परंतु गेल्या दोन दशकांत हा विकार शालेय मुलांमध्येही वाढल्याचे दिसते आहे. अशा मुलांवर केलेल्या संशोधनातून एक नवी माहिती मिळाली आहे. असे खडे होण्यामागे प्रतिजैविकांचा(antibiotics) मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर हे महत्वाचे कारण आहे. खालील गटांतील प्रतिजैविके यास कारणीभूत आहेत: १. Cephalosporins २. Fluoroquinolones ३. Nitrofurantoin / methenamine ही प्रतिजैविके मुलांतील श्वसनदाह आणि मूत्रमार्गदाह यासाठी उपचार म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जातात. तेव्हा त्यांचा हा दुष्परिणाम लक्षात घेता ती अत्यंत काळजीपूर्वक वापरली पाहिजेत.

हेमंतकुमार 24/05/2018 - 11:24
पिण्याच्या पाण्यातील रसायने आणि मूतखडे होण्याचा धोका हा सतत संशोधनाचा विषय आहे. अगदी प्रगत देशांत सुद्धा सर्व लोकांना “शुद्ध” पाणी मिळतेच असे नाही. अलीकडील संशोधनातून पाण्यातील काही रसायने आणि मूतखडे व्हायचा धोका यावर अधिक प्रकाश पडला आहे. १. धोका वाढवणारी पाण्यातील रसायने : Trichloro propane Organic Carbon Trichloro acetic acid Zinc २. धोका कमी करणारी रसायने: बाय कार्बोनेट सेलेनियम बेरियम मॅग्नेशियम सोडियम व पोटॅशियम.

In reply to by हेमंतकुमार

जॉनविक्क 20/08/2019 - 12:51
आरोग्य लेखन कधीही वाचावे,
अगदी हेच समजून पेपरात येणाऱ्या आरोग्य विषयक पुरवण्या हटकुन वाचायचो, आणि काही आठवड्यातच माझी खात्री झाली की मी लवकरच कुठल्यातरी आजाराचा बली ठरणार. नुसती शिंक आली तरी जीव घाबरा होऊ लागला, अमुक तमुक तर चे हे सिपम्तम नाहीना :) शेवटी ते पुरवण्या वाचन मी बंद केले ते आपले लेख समोर येई पर्यंत असेच होते. पण आपले लिखाण माझ्या आयुष्यातले पहिले असे लिखाण आहे जे वाचून मनात भीती न्हवे महितीने घर करायला सुरुवात केली. अतिशय धन्यवाद सर.

हेमंतकुमार 20/08/2019 - 13:54
* जॉन, अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! अशीच उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न नेहमीच करेन. * राजेश, नाही, तुमचा गैरसमज दूर करतो. युरिआ व creatinine ही दोन स्वतंत्र रसायने आहेत. काही मूत्रपिंड विकारांत या दोन्हीच्या पातळीचे गुणोत्तर विचारात घेतात.

हेमंतकुमार 20/08/2019 - 16:02
तळपायावर व गालावर येणारी सुज>>>
होय, हे महत्वाचे दृश्य लक्षण आहे. या आजारात रक्तात पाणी व सोडियम जास्त साठून राहते म्हणून सूज येते. गाला पेक्षा ती डोळ्यांभोवती असते.

हेमंतकुमार 07/01/2021 - 11:37
आधुनिक मूत्रपिंडशास्त्राचे पितामह म्हणून गौरविलेले डॉ. Donal O'Donoghue यांचे नुकतेच कोविडमुळे निधन झाले. त्यांना संशोधन कार्याबद्दल २०१८ मध्ये ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर हा मानाचा पुरस्कार मिळाला होता. आदरांजली.

हेमंतकुमार 14/03/2024 - 07:24
जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त सर्व संबंधित रुग्णांना शुभेच्छा ! महाराष्ट्रातील वास्तव ( बातमी छापील मटा 14 मार्च 2024) : १. गेल्या चार वर्षांमध्ये राज्यातील 1731 रुग्णांना मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत प्राण गमवावे लागले आहेत. २. सध्या राज्यात सहा हजार रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत. अपेक्षा : १. अवयवदानासंबंधी जनजागृती वाढावी २. कृत्रिम मूत्रपिंड संशोधन गेली अनेक वर्षे चालू आहे. त्यास गती मिळावी.

हेमंतकुमार 22/03/2024 - 17:51
एकाच व्यक्तीत एकावेळी दोन मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण (dual kidney transplant) ही विशेष शस्त्रक्रिया दिल्लीच्या एम्स रुग्णालयात करण्यात आली. या घटनेतील ‘दाता’ 78 वर्षीय मेंदूमृत व्यक्ती होती तर ‘घेता’ डायलिसिसवर असलेली 51 वर्षीय स्त्री आहे. या घटनेत दाता व घेता या दोघांचीही शारीरिक परिस्थिती पाहता घेणाऱ्या व्यक्तीला दात्याचे एकच मूत्रपिंड कार्यासाठी पुरणार नव्हते. नेहमी जेव्हा एखाद्या व्यक्तीत एकाच मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करतात त्यासाठी काही निकष ठरवलेले असतात. त्यामध्ये 65 वर्षावरील दाता निवडला जात नाही. परंतु भारतातील अवयवदानाची प्रतीक्षा यादी आणि पुरवठा यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेता काही रुग्णांच्या बाबतीत हे निकष शिथिल केले जातात. 65 वर्षे वयावरील दात्याची मूत्रपिंडे कमी कार्यक्षम असतात. या घटनेत त्याची दोन मूत्रपिंडे प्रत्यारोपित केली असल्याने ती घेणाऱ्या व्यक्तीला सुमारे दहा वर्षांचे आयुष्य तरी मिळेल अशी डॉक्टरांना आशा आहे.

पुढील मजकूर वाचतांना समाधान होते. वा! झकास. अद्यतन वाचतांना शेवटचे दोन परिच्छेद वाचतांना पुन्हां एकदा हा अनुभव आला. धन्यवाद.

हेमंतकुमार 21/04/2024 - 10:54
वयोमानानुसार होणाऱ्या प्रोस्टेट वाढीसाठी अलीकडे अनेक आधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत. त्यापैकी एक नवा उपचार म्हणजे युरोलिफ्ट ही सोपी क्रिया. यामध्ये डॉक्टरांच्या तपासण्याच्या खोलीतच संबंधित रुग्णाच्या मूत्रमार्गातून काही implants बसवले जातात. त्यांच्यामुळे प्रोस्टेट वर उचलली जाऊन ती मूत्रमार्गात अडथळा करत नाही. रुग्णाला कमीत कमी त्रास होणारी ही क्रिया आहे (minimally invasive procedure) सध्या भारतात ती निवडक केंद्रांवर केली जात असून त्यामध्ये बंगलोर व पुण्याचा समावेश आहे. पुण्यातली बातमी आजच्या छापील मटामध्ये आहे.

हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन

हेमंतकुमार ·

कंजूस 15/11/2017 - 09:57
शाकाहारी मासाहारी फरक नसावा अथवा हत्ती, घोडे, हरणं रोड झाले असते अनिमियाने. सतत शिजलेले पदार्थ खाण्यामुळे होत असावा हिमोग्लोबिनचा र्हास.

हेमंतकुमार 15/11/2017 - 10:08
कंजूस, वैद्यकीय पाठ्यपुस्तकांनुसार तो फरक आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी. एखादा माणूस वरून 'रेड्या' सारखा दिसणे आणि त्याच्या रक्तातले हिमो. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भरपूर कर्बोदके खाउन पोटे सुटलेले खूप जण असतात. पण आहार-अज्ञानामुळे त्यांचे हिमो. कमी असलेले पाहिले आहे.

कंजूस 15/11/2017 - 10:58
बरोबर. रोड म्हणजे निस्तेज म्हणतो. डोळ्यांखालची चामडी/त्वचा किंवा नखांच्या बुडाशी निर्जिवपणा दिसणे ही सोपी टेस्ट आहे ना हिमोग्लोबिन पाहण्याची? तो प्रकार गवतखाऊ प्राण्यांमध्ये दिसत नाही.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 15/11/2017 - 11:42
हा माणसातील गुंतागुंतीचा विषय आहे.शाकाहारातील खाल्लेल्यापैकी जेमतेम १०% शोषले जाते. प्राण्यांबाबत माझा अभ्यास नाही. कदाचित शोषण जास्ती असेल.

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 15/11/2017 - 12:54
An appropriately planned well-balanced vegetarian diet is compatible with an adequate iron status. Although the iron stores of vegetarians may be reduced, the incidence of iron-deficiency anemia in vegetarians is not significantly different from that in omnivores. Restrictive vegetarian diets (eg, macrobiotic) are associated with more widespread iron-deficiency anemia. Western vegetarians who consume a variety of foods have a better iron status than do those in developing countries who consume a limited diet based on unleavened, unrefined cereals. Whereas phytates, polyphenolics, and other plant constituents found in vegetarian diets inhibit nonheme-iron absorption, vitamin C, citric acid, and other organic acids facilitate nonheme-iron absorption. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/8172127

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 15/11/2017 - 13:26
थोडक्यात, समजून उमजून केलेला संतुलित शाकाहार हवा. निव्वळ "आमच्याकडे आठवड्यात तिनदा पालकाची भाजी असते, किंवा आम्ही भाजीत गूळ घालतोच" अशी मोघम विधाने कामाची नाहीत.

पुंबा 15/11/2017 - 11:02
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. HbCO च्या निर्मीतीला चालना देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे धूम्रपानाचे व्यसन. आणि चुलीच्या धूरातून देखिल कार्बन मोनॉक्साईड तयार होत असेल ना?

In reply to by आनन्दा

हेमंतकुमार 15/11/2017 - 11:37
शक्य आहे. पण, इथे लिहीताना असा दृष्टीकोन आहे की सामान्य माणसाला आवश्यक व पेलेल इतकेच लिहावे. जास्त माहितीचा भरणा केल्यास वाचक 'बोअर' होईल असे वाटते. म्हणून महत्वाच्या मुद्द्यांपुरतेच सिमित ठेवले आहे. शंकांच्या अनुषंगाने अजून लिहीन.

सुबोध खरे 15/11/2017 - 11:35
anemia ला पांडुरोग ( पांडुर --पांढरे पडणे यावरून) हा शब्द हि वापरला जातो. रक्तक्षय हा शब्दप्रयोग बरोबर आहे पण काही लोक त्याचा क्षयरोगाशी (tuberculosis) संबंध जोडतात.

दीपक११७७ 15/11/2017 - 12:12
असे एकले आहे की, 0+ tv ह्या रक्त गटाच्या व्यक्तिंचा हिमोग्लोबिन स्तर हा नॉर्मल रेंजच्या लोअर साईडला व त्या खालीच असतो तर A+ tv ह्या रक्त गटाच्या व्यक्तिंचा हिमोग्लोबिन स्तर हा नॉर्मल रेंजच्या अप्पर साईडला असतो व लोह युक्त पदार्थ जास्त खाल्ल्याने या गटाच्या लोकांना हिमोग्लोबिन कमी करावे लागतो. हे खरं आहे क? थोड फार अजुबाजुला निरिक्षण केल्यावर मला तथ्य आढळले.

सुबोध खरे 15/11/2017 - 12:49
anemia (पांडुरोग) याचे कृमी(hookworm) आणि जंत (roundworm) होणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. कृमी (hookworm) हे आतड्याच्या आतील आवरणाला चावून पकडून ठेवतात त्यामुळे होणाऱ्या जखमेतून रक्तस्त्राव होतो आणि त्यातून पांडुरोग anemia होण्याचे प्रमाण फार मोठे आहे. उघड्यावर शौचास जाण्यामुळे आणि अनवाणी पावलाने अशा जमिनीवर चालण्यामुळे कृमीचा प्रादुर्भाव होतो. भारतात ग्रामीण भागात हे प्रमाण ८५ ते ९५ % लोकसंख्येत आढळते. यामुळे भारतात ग्रामीण भागात स्त्रिया आणि मुलांमध्ये कृमींचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणारा पंडुरोग मोठ्या प्रमाणावर आढळतो. भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये २० % ते ५० % माणसांमध्ये जंत आणि कृमीं चा प्रादुर्भाव आढळला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने वर्षातून एकदा जंतविरोधी औषधे सर्वाना द्या अशी शिफारस केली आहे. Major morbidity associated with hookworm infection is caused by intestinal blood loss, iron deficiency anemia, and protein malnutrition.[13] They result mainly from adult hookworms in the small intestine ingesting blood, rupturing erythrocytes, and degrading hemoglobin in the host. https://en.wikipedia.org/wiki/Hookworm_infection जंतां(roundworm) मुळे आतड्यात अन्न नीट शोषले जात नाही आणि भूकही नीट लागत नाही तसेच जंतांच्या ऍलर्जी मुळे आतड्यातील आतल्या आवरणाचा र्हास होतो आणि त्यामुळे कुपोषण होते आणि पंडुरोग होतो https://en.wikipedia.org/wiki/Ascariasis

In reply to by एस

हेमंतकुमार 15/11/2017 - 14:52
@एस , सिकल सेल आजार : थोडक्यात माहिती: १. जनुकीय बिघाडाने झालेला अनुवंशिक आजार २. दोन प्रकारचे रुग्ण: अ) खुद्द आजारी . याच्यात दोन्ही पालकांकडून दोष येतो.याला खूप त्रास ब) आजाराचा वाहक : याच्यात एकाच पालकाकडून दोष येतो. याला त्रास नाही. चांगले जगतो. ३. खुद्द आजारी हा सदोदित अनिमिक कारण त्याच्या लालपेशीचे आयुष्य नेहमीपेक्षा फक्त एक षष्ठांश असते आणि त्या कोयत्याच्या आकाराच्या. ४. या पेशी विविध अवयवांतील सूक्ष्म रक्तवाहिन्या ‘ब्लॉक’ करतात. त्याने रुग्ण ‘क्रायसिस’ मध्ये जातो. तेव्हा तो असह्य वेदनेने तळमळतो.

कंजूस 15/11/2017 - 15:21
पंडुरोग उर्फ रक्ताल्पता पोटातल्या कृमिंमुळे शक्य आहे. हिमोग्लोबिनला मारणारे विषाणू हाडे,यकृत अथवा रक्तामध्येच असावेत. निरनिराळे तापांमध्ये हिमो० कमी होण्याचे हेच कारण असेल.

तेजस आठवले 15/11/2017 - 15:37
लोहाचे शोषण शरीरात होण्यासाठी जीवनसत्त्व क लागते ना ? लिंबू तसेच इतर आंबट पदार्थातून ते मिळवता येऊ शकते. तसेच जर १% लोहाचे शोषण होत असले तर ते वाढवण्यासाठी काय करता येईल ? लोखंडाची कढई/फोडणीचे पातेले वगैरे वापरून हे प्रमाण खरंच वाढते का?(लोखंडी भांड्यात केलेले पदार्थ खमंग होतात.) तसेच जास्त लोह पोटात गेले तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात ?त्याची दृश्य स्वरूपाची काही लक्षणे असतात का?

हेमंतकुमार 15/11/2017 - 15:59
चांगला प्रश्न. लोहाच्या बाबतीत शरीराचा समतोल फार सुंदर आहे. रोज १ मिलिग्राम लोह शौचावाटे निघून जाते. म्हणून फक्त १ मिलिग्राम च शोषले जाते. जास्त शोषले जाऊ नये अशीच ही तरतूद आहे. मेलेल्या लाल पेशी मधल्या लोहाचा पुनर्वापर होतो. शेवटी तो धातू आहे. जास्त शोषल्यास महत्वाच्या अवयवांना इजा होते .( Hemochromatosis)

हेमंतकुमार 16/11/2017 - 12:40
बहुतेक इच्छुकांचा हा लेख वाचून झाला असल्याने आता समारोपाच्या निमित्ताने थोडे मनोगत व्यक्त करतो. याआधी माझ्या ‘कोलेस्टेरॉल’ च्या लेखावर आपण सर्वांनी चांगली चर्चा केलीत. त्यानंतर एक विचार मनात आला तो असा. ‘कोलेस्टेरॉल’ हा जरी प्रतिसाद-खेचक विषय असला तरी तो काहीसा fancy आणि कळत नकळत ‘इंडिया’चा विषय आहे. तेव्हा असे ठरवले की पुढचा आरोग्य-विषय निवडताना तो खऱ्याखुऱ्या ‘भारता’चा असावा. त्यासाठी फार विचार करायची गरज नव्हती. कुपोषण ही आपली मूलभूत समस्या आणि त्यात स्त्रिया व मुले हे त्याचे प्रमुख बळी. लोहाची कमतरता तर त्यांच्या पाचवीला पुजलेली.म्हणूनच ‘हिमोग्लोबिन’ वर लिहायचे ठरवले. काही वर्षांपूर्वी जेव्हा लोहयुक्त मीठ बनवण्याचा धोरणात्मक निर्णय झाला तेव्हा भारतीयांच्या लोह-कमतरतेबाबत दोन कारणे चर्चेत होती : १. गरीबी आणि २. अन्नातील लोहाचे अपुरे शोषण २०१५ पासून तसे मीठ आपल्या बाजारात आले. त्याच्या वापरातून माणसाची निदान रोजची निदान निम्मी गरज भागावी हा विचार आहे. तरीही ते मीठ अदयाप फारसे वापरात दिसत नाही. आता दुसरा मुद्दा. गेले महिनाभर दिल्लीतील प्रदूषणाने जो हाहाकार माजवला आहे ते वाचून HbCO ची माहिती सर्वांना व्हावी असे वाटले.अर्थात लोहाच्या कमतरेतेइतका हा विषय चर्चेस आला नाही हेही जाणवले. आपण सर्वांनी प्रतिसाद देऊन चांगली चर्चा केल्याचे समाधान आहे. धन्यवाद !

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण! सगळी लेखमालाच खूपच माहितीपूर्ण आहे. स्वाती

In reply to by वन

हेमंतकुमार 14/11/2018 - 12:40
सहमत. चहा शास्त्रीय पद्धतीने करायचा झाल्यास पाण्याचे तापमान ७० C इतकेच असावे. उकळते पाणी अयोग्य आहे. पण बरेच जण सवयीचे गुलाम असल्याने चहा उकळत बसतात. असो. इथे मुद्दा लोहाचे शोषण कमी होण्याचा आहे.

In reply to by वन

सुबोध खरे 14/11/2018 - 20:58
चहातील टॅनिन मुळे अपाय होतो याला शास्त्राधार नाही. उलट चहातील टॅनिन हे अँटी ऑक्सिडंट आहे त्यामुले उकळलेला चहा हा बिन उकळलेल्या चहा पेक्षा जास्त गुणकारी आहे. केवळ चहाच्या स्वादा साठी हवा असेल तर चहा जास्त उकळू नये कारण त्यात चहा पट्टीतील टॅनिन उतरते आणि चव तुरट होते.(टॅनिन ऍस्ट्रिंन्जन्ट आहे) त्याने उकळलेला चहा हा जेवणाच्या अगोदर किंवा नंतर घेंऊ नये कारण हेच टॅनिन आपल्या पाचक रसांवर परिणाम करते टॅनिन ऍस्ट्रिंन्जन्ट असल्यामुळे पाचक रसातील विकरे (enzymes) विघटन (degrade) पावतात आणि अन्न पचन कठीण होते. अन्यथा चहा आपल्याला हवा तसा चवीनुसार(उकळून/ न उकळता) प्यावा. चहा दिवसात पाच कपापर्यंत प्यायल्यास फारसा अपाय होत नाही असे आजवरचे संशोधन दाखवते. गमतीची गोष्ट म्हणजे कॉफी पेक्षा चहा मध्ये जास्त कॅफिन असते पण एक कप करण्यासाठी चहाची पत्ति कॉफीच्या पावडर पेक्षा कमी वापरली जाते त्यामुळे अखेरीस कॉफीच्या एका कपात चहा पेक्षा जास्त कॅफिन येते.

पैसा 04/12/2017 - 19:37
उत्तम लेख. भारतीय आहारातील वेगवेगळ्या पदार्थातून मिळणार्‍या लोहाचा तुलनात्मक तक्ता दिला असता तर अधिक छान!

In reply to by पैसा

सुचिता१ 16/12/2017 - 11:27
माहीतीपूर्ण लेख. शक्य झाल्यास लोह युक्त मीठा ची आणि आहारा संबधी अधीक माहीती द्या .

In reply to by सुचिता१

हेमंतकुमार 16/12/2017 - 12:29
ज्यांना चौरस आहार नियमित मिळतो त्यांनी लोह आहारातून मिळवावे. ज्यांना ते शक्य होत नाही ते नियमित मीठ वापरू शकतात. त्यातून निदान रोजची निम्मी गरज भागते. टाटा' ने लोह व आयोडीन असे दोन्हीने युक्त मीठ बनवले आहे 2015 मध्ये.

हेमंतकुमार 28/02/2018 - 11:23
स्मार्टफोनच्या साहाय्याने हिमोग्लोबिन घरच्या घरी मोजण्याचे तंत्र पुण्यातील वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. ती बातमी : http://www.esakal.com/pune/marathi-news-hemoglobin-health-pune-agharkar-...

हेमंतकुमार 01/11/2022 - 12:12
लोहाच्या कमतरतेमुळे जो रक्तक्षय होतो त्याने बाधित असणारी मुले बऱ्याचदा माती खात असताना दिसतात. त्याच्या जोडीने काही जणांना खूप बर्फ खावासा वाटणे हे देखील एक लक्षण असते. पोषणमूल्य नसलेले असे पदार्थ खावेसे वाटणे याला pica हा शास्त्रीय शब्द आहे.

सागरसाथी 01/11/2022 - 21:44
छान माहीती,हल्ली हिमोग्लोबिन कमी असण्याचे आणि पांढऱ्या पेशी वाढण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. लेख शेवटी घाईत संपवल्यासारखा वाटला,मराठी सिरियल्स सारखा.

सागरसाथी 01/11/2022 - 21:45

In reply to by सागरसाथी

हेमंतकुमार 02/11/2022 - 08:46
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. लोह कमतरता असलेल्या सर्व रुग्णांमध्ये पांढऱ्या पेशींची संख्या वाढत नाही मुळात त्यांची व्याप्ती (4500-11,000/µL) मोठी आहे. काही रुग्णांमध्ये ती थोडी वाढलेली असू शकते.

चामुंडराय 01/11/2022 - 23:05
माझ्या एका सहकाऱ्याला प्रमाणापेक्षा जास्त, अतिरिक्त हिमोग्लोबिन असण्याचा आजार आहे (तो लालबुंद दिसतो ). ऐसा भी होता हैं क्या? - मला पडलेला प्रश्न. त्याला रेड मीट खाण्यास डॉक्टरांनी प्रतिबंध केला आहे आणि फिश त्याला आवडत नाही त्यामुळे खाण्यासाठी त्याच्याकडे फारसे पर्याय नाहीत.

हेमंतकुमार 27/05/2023 - 07:29
कुठलीही सुई न टोचता रक्तातील हिमोग्लोबिन मोजण्याचे तंत्रज्ञान प्रगतीपथावर आहे. भारतीय लष्कराच्या डीआयएटी या संस्थेने prickless hemoprobe या उपकरणाची निर्मिती करून त्याचा स्वामित्व हक्क घेतलेला आहे. सध्या त्या उपकरणाचे मूल्यांकन चालू आहे. या उपकरणात LED प्रकाशावर निव्वळ बोट ठेवून हिमोग्लोबिन मोजले जाते. (छापील सकाळ, 27 मे 2023)

आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेली आणि आपल्याला प्रत्येक क्षणी मिळालीच पाहिजे अशी गोष्ट कोणती? क्षणाचाही विचार न करता या प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे – ते म्हणजे ऑक्सीजन (O2) ! पर्यावरणातील O2 आपण श्वसनाद्वारे फुफ्फुसांमध्ये घेतो. आता हा O2 शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचवण्याचे काम एक वाहतूकदार करतो आणि तो आहे हिमोग्लोबिन. हे एक महत्वाचे प्रथिन असून त्याचा कायमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट लालपेशी.

शिवांबू कल्प विधी

mantarang ·

कपिलमुनी 14/11/2017 - 20:18
ही पद्धती गुप्त ठेवण्याचे प्रयत्न केले गेेले पाहिजे. कोणालाही सांगू नकोस. गुप्त माहिती अशी सार्वजनिक केलीत ! कसे व्हायचे आता ?? बाकी काय होईल ते सांगितलं आहे . का होईल ? ते सांगितले नाही त्यामुळे पास

In reply to by कपिलमुनी

मोदक 15/11/2017 - 17:18
बाकी काय होईल ते सांगितलं आहे . का होईल ? ते सांगितले नाही हाच प्रॉब्लेम आहे. "बहुगुणी शिवांबू" आणि अशीच एक दोन पुस्तके वाचली आहेत. मुख्य औषधासोबतच शिवांबू चिकित्सा सुरू केली मात्र शिवांबू मुळे सगळा गुण आला असे लिहिले आहे.

सद्यकाळात, केवळ एखाद्या जुन्या-नव्या ग्रंथात काहीबाही लिहिले आहे इतक्याच भांडवलावर, केलेले दावे... विशेषतः शास्त्रिय विषयातले दावे (जसे इथे या विधीपासून होणार्‍या वैद्यकीय/शारिरीक परिणामांचे दावे केलेले आहेत)... खरे मानले जाणार नाहीत, खरे मानले जाऊ नयेत.. ते दावे आधुनिक शास्त्रिय नियमांना अनुसरून संशोधन करून सिद्ध झाले तरच स्विकारणे योग्य होईल... अन्यथा, ते केवळ चूक असू शकतात इतकेच नव्हे तर त्यांच्यावर आधारीत केलेली कृती धोकादायक ठरू शकते. म्हणुन, अशा विषयासंबधीचे लेखन योग्य त्या धोक्याच्या सूचनेसह करणे योग्य होईल.

कंजूस 15/11/2017 - 05:51
बरीच माहिती दिली आहे. जे अतिशयोक्तिपूर्ण परिणाम आहेत त्यातून फक्त शरीर निरोगी होईल इतकाच अर्थ घ्यायचा. मुख्य म्हणजे शिवांबु नसले तरी दिलेली औषधे ही 'संशोधन करून सिद्ध झालेली' आहेत ती घेतली जातातच. १) त्रिकटु चूर्ण २) त्रिफळा चूर्ण

यातले सारी अतिशयोक्ती जाऊ द्या. पण माझ्या आजोबांचा अनुभव सांगते. ब्रिटीश कालात ते फौजदारी वकिली करत. तेव्हा क्रांतीकारक किंवा इतर गुन्हेगारांना माहिती काढून घेण्यासाठी थर्ड डिग्री देत असत. त्यात कपडे काढून मिरच्यांची धुरी देत. भयंकर प्रकार होता तो. पण ते सहन व्हावं किंवा नंतर त्याचा त्रास होऊ नये म्हणून हे सर्व लोक शिवांबु घेत. त्याने होणारी आग थांबत असे. आणि ते माहिती देत नसत. कधीतरी हे पोलिसांना समजले तेव्हा त्यांनी यांचे हात बांधायला सुरवात केली. शिवांबु घेता येऊ नये म्हणून. मग मात्र तो त्रास असह्य होऊन कैदी माहिती देत.

आनन्दा 15/11/2017 - 08:03
मध्यंतरी ऑटो युरिन थेरपी म्हणून एक प्रकार वाचला होता.. त्यांचे म्हणणे असे होते की आजारी माणसांच्या आजारांचे antigen त्या माणसाच्या मूत्रात सापडतात, त्यामुळे ते मूत्र consume केल्यास antibody च्या निर्मितीस चालना मिळते.. यावर डॉक्टरांनी थोडा प्रकाश टाकावा

चामुंडराय 15/11/2017 - 08:38
सोयाम्बू (soya-bamboo) पिलो ची जाहिरात लागली कि मला सोयाम्बू ऐवजी शिवाम्बू च ऐकू येतं आणि मग मी तातडीने पुढच्या चॅनेलवर सर्फुडी मारतो.

================================================= अस्वीकरण (डिस्क्लेमर) : या लेखातील मजकूरासंबंधात मिसळपाव कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. खुद्द लेखकानेही मजकूरात "अनेक अतिशयोक्त गोष्टी आहेत" असे लिहिले आहे.

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - समाप्त

मोदक ·

वेल्लाभट 06/11/2017 - 12:52
हा उपक्रम मिपावरचा अतिशय नाविन्यपूर्ण, उत्कृष्ठपणे नियोजित केलेला आणि प्रेरक उपक्रम होता. किंबहुना आहे. कारण #मिपाफिटनेस च्या निमित्ताने अनेक जण नव्याने व्यायाम करू लागले, अनेक व्यायाम (आणि एकंदरच) सुटलेल्या लोकांना पुन्हा सुरुवात करण्याची उर्मी मिळाली आणि व्यायामातले अनेक पोचलेले लोक सगळ्यांना कळले. शिवाय स्ट्राव्हा सारखी अ‍ॅप वगैरेही माहितीची झाली. उपक्रम जरी इथे समाप्त झाला असला तरी या निमित्ताने जे जे सुरू झालंय ते थांबायला नको असं वाटतं. फिटनेस वाल्यांचे व्हॉट्सॅप ग्रूप असतील किंवा सायकलिंग, रनिंग ग्रूप असतील, ते थंड पडता कामा नयेत. एकमेकांना प्रेरणा देत राहणं, व्यायाम, फिटनेस, सकस आहार या उद्दिष्टांसाठी एकमेकांच्या मागे लागत राहणं हे आवश्यक आहे. फिटनेस हा उपक्रम नसून जीवनक्रम आहे! मोदक, पिरा, प्रशांत, डॉ श्रीहास आणि प्रसाद दाते, अर्थात टीम #मिपाफिटनेस चं भरभरून कौतुक ! Vamos #मिपाफिटनेस ! Losing hurts more than training. Being unfit is Hard. Being fit is Hard. Make a choice.

गवि 07/11/2017 - 09:49
समाप्त वगैरे काही नाही. संपादकीय अधिकारांचा व्यक्तिगत उपयोग करुन तो "समाप्त" शब्द काढून टाकण्याची इच्छा होते आहे. तसाही व्यायाम, चालणं आणि त्यातलं सातत्य याची सर्वांचीच बोंब असते. त्यात उपक्रम समाप्त करता तुम्ही. नॉट फेयर मोदकभाऊ..

In reply to by गवि

मोदक 07/11/2017 - 12:22
सहमत आहे गवि.. पण नवीन कांहीतरी पुढे आले पाहिजे असे मला वाटते त्यामुळे "आज केलेला व्यायाम" हा उपक्रम / धागा बंद करून नवीन कांहीतरी करायला सुरूवात करूया इतकेच. नवीन काय करायचे ते सुचवा मंडळी..!!

In reply to by सुबोध खरे

=)) मी हे सदर वर्षभर चालवू शकेन! बाकी हा उपक्रम मस्तच झाला. एक सव्वा महिना मी पण व्यायाम केला म्हणजे बघा!! काही तरी नवीन करूया आता.

जेम्स वांड 11/11/2017 - 13:10
गवि, मोदकभाऊ ह्यांच्यासारखी बाप माणसे असल्यावर काय बिशाद उपक्रम फेल व्हायची!!. सगळ्या संबंधितांचे खूप खूप अभिनंदन, मी खूप प्रेरणा घेतली आहे ह्या उपक्रमातून, आत्ता ८९ किलो चा ८७ किलो वर आलोय, ७८ वर आलो की धागा काढू म्हणतो :) , मिपा फिटनेस फॉलो करून एक कळले, पेन इज टेम्पररी ग्लोरी इज फॉरेवर, काहीतरी करू आधी मग मिपावर माफक चमकोगिरी करू असा मानस आहे..

डॉ श्रीहास 14/11/2017 - 23:19
नुकतीच DC (Deccan Cliffhanger) ही मानाची रेस (पूणे - गोवा ६४३ किमी रिले फाॅर्मॅट) पूर्ण केली आहे .... त्यावर सविस्तर धागा येणारच आहे . शिवाय माझी स्वत:ची अशी अचिव्हमेन्ट म्हणजे १२/११/१७ ला २०० किमी ची ब्रेव्हे (नगर-औ’बाद-नगर) ही १०:१० तासात (riding time ८:३०तास) यशस्वी झाली आहे !! त्यामुळे हा धागा जरी समाप्त झाला तरी परिणाम दूरगामी होणार हे निश्चित .... ज्या सर्वांनी इथे लिहीलं - वाचलं आणि शिकवलं त्या सर्वांचे मनापासून आभार _/\_ ... Let’s keep going, let’s keep inspiring..

. नमस्कार मंडळी.. बरोबर एक वर्षांपूर्वी मी आज केलेला व्यायाम...!! या उपक्रमाची सुरूवात झाली. धागा टाकण्यापूर्वी हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होतीच. पण सर्वांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आणि रोजचा व्यायाम नोंदवायला सुरूवात केली. नियमीत व्यायामपटूंचे धाग्यावर येणारे प्रतिसाद पाहून अनेकांनी व्यायाम सुरू केल्याचे, फार कांही नांही तर चालणे सुरू केले आणि धाग्याचा फायदा होत आहे हे आवर्जून कळवले.

मला भेटलेले रूग्ण - ११

डॉ श्रीहास ·

डॉ श्रीहास 19/10/2017 - 18:09
मागच्या भागात बरेच जणांनी थांबू नका असं म्हटलं .. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमापोटी हा आजचा भाग आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी दहावा भाग लिहून संपादीत झाला त्याच दिवशी हे पेशंट्स दाखवून गेले ....

mayu4u 19/10/2017 - 18:17
सुंदर लिहिता तुम्ही! असेच लिहीत रहा! पु ले शु आणि पु भा प्र.

In reply to by प्रमोद देर्देकर

डॉ श्रीहास 20/10/2017 - 17:37
प्रमोदजी प्रतिसादासाठी धन्यवाद.... माझ्या भावना फार तोकड्या पडतात हो... मी नशिबवान आहे , मला ही लोक भेटून जातात आणि काहीतरी शिकायला मिळतं त्यातून ..... मी फक्त अनुभव कथन करू शकतो _/\_.

In reply to by अत्रन्गि पाउस

डॉ श्रीहास 20/10/2017 - 17:45
साहेब मी एक सामान्य माणूस आहे हो ... लोकांनी वाचलं ,प्रतिक्रिया दिल्या की तेवढंच बरं वाटतं.... तुम्ही द्या हो प्रतिक्रीया , अगदी नाही आवडलं तर सांगा तसं स्पष्ट , थांबवावसं वाटलं तर बेफिकीर होऊन सांगा ... पण सांगाच _/\_

In reply to by डॉ श्रीहास

मुद्दा असा कि सिरीज फार भारी चालू आहे ...ती तशीच चालू ठेवा ...आवडलेल्या आहेतच आणि म्हणून हा प्रेमाचा आग्रह ...

नाखु 20/10/2017 - 13:09
धुराळी धाग्यातच प्रतिक्रिया द्यायला आवडते ते इथं येणार नाहीत म्हणून म्हणून तुम्ही लिखाण थांबवु नका असे अस्सल अनुभव फार कमी प्रमाणात लिहिले जातात नितवाचक नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

चौकटराजा 22/10/2017 - 09:54
आजकाल बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकाना कमीतकमी बोलण्याचे व्रत पाळावे लागते. बाहेर अनेक पेशंट ताटकळून बसलेले असतात. घरी बायकापोरं वाट पहात असतात. कमीतकमी वेळात जास्त पेशंट (हो काही वेळेस) " उरकायचे" असतात. अशामध्ये आपण वेगळे दिसता. पैशाचे महत्व एकूणच दुनियेत वाढत आहे. त्यामुळे ते डॉ. लोकांमधे आले तर नवल नाही. तरीही एक संवेदनशील माणूस तुमच्यात जागा आहे हे पाहून मस्त वाटले.

सविता००१ 22/10/2017 - 12:10
अतिशय छान लेखमाला आहे तुमची डॉक्टर. कशी कोण जाणे पण वाचायची राहून गेली होती. आज हा भाग वाचल्यानंतर पूर्ण लेखमाला आधी वाचून काढली आणि एकदमच एकत्रित प्रतिसाद देतेय. अजिबात थांबू नका हो. फार सुरेख लिहिताय आणि त्यातून रुग्ण - एक मनुष्य किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो हे ही कळतय आणि तुम्हीही एक डॉक्टर म्हणून किती सह्रुदयी आहात हेही कळतय, जे सध्या कदाचित दुर्मिळ आहे. लिहिते रहा हो. आवडतंय वाचायला.

राजाभाउ 24/10/2017 - 18:09
डॉक तुम्ही तुमच्या कडे आलेल्या पेशंटना केवळ पेशंट नाही तर माणुस म्हणुन भेटता, त्या अनुभवांकडे अत्यंत डोळसपणे पाहता. तुमच्याकडील माणुसपणाचा हा झरा असाच अखंडपणे वहात राहो. हां आणि स्पष्ट सांगतो ते लिहीण्याचे बंद करायचे नाव सुद्धा काढु नका हो (हा आमचा आपला प्रेमाचा आग्रह हां. ह.घ्या).

सप्तरंगी 24/10/2017 - 18:38
तुम्ही फार त्रोटक पण नेमकं लिहिता , तरीही तुमच्या तुमच्या रुग्णांबद्दलच्या सहसंवेदना / empathie आम्हाला जाणवतात आणि आम्हीही ते फील करू लागतो.

पलाश 25/10/2017 - 05:06
मालिका फार चांगली चालली आहे. माणसं वाचता येतात तुम्हाला आणि थोडक्या शब्दात पण नीट उलगडून सांगताय तुम्ही!! वैद्यकीय माहितीही मिळते आहे. लिहित रहा ही आग्रहाची विनंती. _/\_

In reply to by राजाभाउ

डॉ श्रीहास 22/02/2018 - 23:34
आज बरेच दिवसांनी मिपावर फिरकलो आणि लेख डोक्यात होताच ... त्यात तुमची कमेंट वाचून सलग २ तास बसून लिखाण/टायपिंग केलं.... आभारी आहे _/\_

In reply to by एस

शलभ 23/02/2018 - 14:01
+१ डॉक तुमचा रेडीयो वर प्रोग्राम झालेला तो ही लेख रुपाने येऊ द्या किंवा त्या ध्वनीफिती नवीन धागा काढून त्यात टाका.

http://www.misalpav.com/node/41281 ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.." ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...

इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा

हेमंतकुमार ·

एस 16/10/2017 - 08:29
थोडासा गोंधळ आहे. इन्शुलिनचे पोटात विघटन होते (पचन). तेव्हा त्याचे पचन होऊ न देता ते जसेच्या तसे रक्तात शोषले गेले पाहिजे हे ओरल इन्शुलिन बनविण्यात सर्वात मोठे आव्हान आहे, असे काहीसे मी वाचले आहे. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी. बाकी लेख माहितीपूर्ण.

हेमंतकुमार 16/10/2017 - 10:25
एस, तुमच्या शंकेचे उत्तर : तोंडी इन्सु. शोषले न जाण्याची २ कारणे : १. पाचक एन्झाइम्स मुळे त्याचे विघटन होते हे बरोबर. पण अशा इतर काही औषधांचे बाबतीत वेगळा मार्ग अवलंबला जातो. त्या औषधाला कोटिंग करुन या मार्‍यापासून वाचवले जाते आणि मग ते लहान आतड्याच्या शेवटच्या भागात शोषले जाते. २. समजा जरी अखंड इन्सुलिन तसे राहीले तरी त्याच्या विशिष्ट स्ट्रक्चर मुळे ते आतड्यात शोषले जाउ शकत नाही. ....... म्हणून आता नॅनोकणांच्या मदतीने ते आतड्य्यात घुसवायचा प्रयत्न चलू आहे.

गुल्लू दादा 16/10/2017 - 11:15
उदरात स्त्रवणाऱ्या हैड्रोक्लोरिक ऍसिड (Hcl) मुळे इन्सुलिन चे विघटन होते हा मुख्य अडथळा आहे, आतापर्यंत इन्सुलिन तोंडावाटे उपलब्ध न होण्याचा. जे विघटनापासून वाचून आतड्यांपर्यंत पोहोचते त्याचे आतड्यांच्या जाडीमुळे व्यवस्थित शोषण होत नाही. विघटनापासून वाचण्यासाठी संशोधकांनी त्यावर आवरण घालून प्रयोग करून पाहिले पण आतड्यात त्याचे शोषण अजूनच कमी झाले. त्यामुळे विघटन आणि शोषण या दोन्ही आघाड्या सांभाळून त्यावर जोरात शोधकार्य चालू आहे. येत्या काळात आपण त्यावर नक्की उपाय शोधू अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

In reply to by गुल्लू दादा

सुबोध खरे 08/11/2017 - 19:18
उदरात स्त्रवणाऱ्या हैड्रोक्लोरिक ऍसिड (Hcl) मुळे इन्सुलिन चे विघटन होते हे बरोबर नाही कारण अशी अनेक औषधे आहेत जी हैड्रोक्लोरिक ऍसिड मुले विघटन पावतात उदा मेट्रोनिडाझॉल टिनिडॅझॉल इ. यासाठी हि औषधे एंटेरिक कोटेड म्हणजे आम्ल वातावरणात विरघळणारी नाही अशा तर्हेचे आवरण असलेल्या गोळीतून दिली जातात. इन्स्युलिन हे एक लांब साखळी असलेले प्रथिन आहे आणि कोणतेही प्रथीन सहजासहजी विघटन न होता त्याच्या मोठ्या आकारामुळे शोषले जाऊ शकत नाही. शिवाय सगळी प्रथिने शरीरात (जठार स्वादुपिंड आणि लहान आतडे) तयार होणाऱ्या पाचक रसात असलेल्या विकरांमुळे(enzyme) विघटन पावतात. यात पेप्सीन रेनिन, ट्रिप्सीन, इरेप्सिन, कायमोट्रिप्सीन आणि प्रोटिएजेस आणि पेप्टाइडेजेस येतात. हिमोग्लोबिन पासून अल्ब्युमिन, ग्लोबुलीन ग्रोथ हॉर्मोन सारखी बहुसंख्य प्रथिन औषधे यामुळेच रक्तात थेट द्यावी लागतात.

पुंबा 16/10/2017 - 13:02
अतीउत्तम माहिती. मलादेखिल अमीतदादांप्रमाणेच मधुमेहाचे प्राचिन मूळ माहित नव्हते. शरीराला आतून पोखरणारा मधुमेह पूर्ण आटोक्यात आणण्यास शास्त्रज्ञांना यश मिळो. रच्याकने, परवाच काँग्रेसचे प्रवक्ते शेलार यांनी मधुमेहाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाचली. :(

हेमंतकुमार 16/10/2017 - 13:22
परवाच काँग्रेसचे प्रवक्ते शेलार यांनी मधुमेहाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाचली. >>> अरेरे, अशी वेळ कोणत्याही रुग्णावर न येवो. या रोगाच्या बाबतीत प्रतिबंधावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे.

शब्दबम्बाळ 16/10/2017 - 23:46
मधुमेह हा आताच्या जीवनशैलीमुळे आलेला आजार आहे असे माझे मत होते पण हा तर बराच जुना आहे! धन्यवाद अभ्यासपूर्ण लेखाबद्दल! पण त्यावेळी देखील हा आजार होण्याची कारणे काय होती यावर संशोधन झाले होते का?

हेमंतकुमार 17/10/2017 - 08:58
पद्मावती व शब्द बंबाळ, आभार! एकूणच जिभेवर ताबा न ठेवता बकबका खाणे हे मूलभूत कारण सदा सर्वदा होतेच. आता त्यात व्यायाम न करण्याची भर पडली आणि तो रोग फोफावला.

हेमंतकुमार 08/11/2017 - 18:20
Johnson & Johnson ने One touch via हा पॅच विकसित केला आहे. त्याच्या US-FDA च्या मंजुरीचे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. २०१७ च्या अखेरीस अमेरिकेत उपलब्ध होण्याची आशा आहे.

हेमंतकुमार 09/09/2021 - 12:31
नुकतेच अमेरिकी औषध प्रशासनाने 'बायोसिमिलर इन्सुलिन' या नव्या प्रकाराला मान्यता दिली. या प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्वीच्या संदर्भ प्रकाराइतकाच प्रभावी असतो. पण या नव्या प्रकाराची किंमत पूर्वीच्या प्रकाराच्या तुलनेत बरीच कमी असते. भारतातील Biocon ने या नव्या प्रकाराच्या उत्पादनासाठी तयारी चालू केली आहे. https://www.fda.gov/news-events/press-announcements/fda-approves-first-interchangeable-biosimilar-insulin-product-treatment-diabetes

In reply to by हेमंतकुमार

शाम भागवत 10/09/2021 - 09:13
मी असं ऐकलं होतं की, बायोकॉन इन्सूलीन तोंडातून घेता येईल असं काहीसं सुटसुटीत प्रकार शोधतीय. ज्यामुळे इन्सुलिन घेण्यासाठी इंजेक्शनची जरूरी राहणार नाही. औषध स्वस्तही असेल शिवाय हा प्रकार खूपच सहज सोपा असेल. तेच का हे औषध?

हेमंतकुमार 10/09/2021 - 09:21
हे ते नाही. हे Semglee या नावाने बाजारात येईल. हे इंजेक्शनच्या स्वरूपातच घ्यायचे आहे. तोंडाने घ्यायच्या गोळी वरचे संशोधन पूर्ण झालेले नाही.

हेमंतकुमार 14/11/2021 - 05:53
जागतिक मधुमेह दिनाच्या (१४ नोव्हेबर) सर्व मधुमेहींना आरोग्य शुभेच्छा ! इन्सुलिनच्या शोधाला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली. अजून दोन महिन्यांनी त्याच्या प्रथम मानवी वापरालाही १०० वर्षे पूर्ण होतील.

Nitin Palkar 14/11/2021 - 15:13
तुमच्या सर्वच लेखांप्रमाणेच अत्यंत अभ्यासपूर्ण आणि महितीप्रद.

लेख आवडला. दुर्दैवाने विस्मरणात गेले पण चाळीसेक वर्षापूर्वी इन्सुलीनचे फॉर्म्यूलेशन बनवणार्‍या कारखान्यात कुतूहलापोटी गेलो होतो. इन्जेक्टेबल उत्पादन विभागात जातांना घालायला लागणारे निर्जंतुक केलेले कपडे, टोपी, मास्क, अगदी सपाता देखील घालूनही अंधुक आठवणीनुसार ४ अंश से. तापमानाला हुडहुडी भरली होती. छान लेखाबद्दल धन्यवाद.

हेमंतकुमार 08/02/2022 - 10:32
इन्शुलिनच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्या शोध-इतिहासाचा फेर अभ्यास होत आहे. यूकेमधील अभ्यासक Kersten Hall यांनी यानिमित्ताने Insulin — the Crooked Timber हे एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यात संबंधित वैज्ञानिकांमधील हेवेदावे, भांडण, असूया आणि मत्सर या सर्वांवर प्रकाश टाकला आहे. त्यातील काही किस्से: 1. शोधाचे नोबेल पारितोषिक Banting आणि Macleod या दोघांना दिले गेले. त्यामुळे अन्य संशोधक या दोघांवर प्रचंड नाराज होते आणि खरेतर संतापलेले होते. इन्शुलिनच्या शुद्धीकरणाचे महत्त्वाचे काम Collip यांनी केले होते पण ते त्यातले रासायनिक गुपित इतरांना सांगायला तयार नव्हते. तेव्हा Banting यांनी त्यांना बखोटीला धरून अक्षरशः धक्काबुक्की करून दम दिला होता. 2. कालांतराने Banting यांना युद्धाच्या मोहीमेवर डॉक्टर म्हणून पाठवण्यात आले. निघताना ते म्हणाले, “जर मी यातून जिवंत परतलो नाही आणि मग पुढे माझे प्राध्यापकांचे पद त्या भुक्कड Best ला दिले गेले, तर माझ्या आत्म्यास कदापि मुक्ती मिळणार नाही !” आता नियतीचा खेळ पहा. ते प्रवास करीत असलेल्या विमानाला अपघात झाला व त्यात त्यांच्यासह सर्वजण मृत्युमुखी पडले. 3. या शोधासारखेच जे अभूतपूर्व आणि जीवरक्षक गटातील शोध लागतात, त्यात अनेक वैज्ञानिकांचे योगदान असते. परंतु नोबेल पारितोषिक देताना मात्र त्यातील एक दोघांचीच निवड होते. त्यातून बाकीच्या वैज्ञानिकांना प्रचंड नैराश्य येते असे दिसून आलेले आहे. तेव्हा या पारितोषिकाचाच फेरविचार करावा की काय असाही एक विचारप्रवाह विज्ञान विश्वात चर्चिला जातोय.

मधुमेह अर्थात डायबेटीस- आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाचा आजार. त्याने गेल्या अर्धशतकात समाजात जे काही थैमान घातले आहे त्याला तोड नाही. जगभरातील असंख्य लोक मधुमेहाने त्रस्त आहेत आणि त्यावरील विविध उपचार घेत आपले आयुष्य कंठत आहेत. ढोबळमानाने मधुमेहाचे दोन प्रकार पडतात – प्र.१ आणि प्र.२. पहिल्या प्रकारातील रुग्णांना जगण्यासाठी इन्सुलिनचे उपचार घ्यावेच लागतात. तर दुसऱ्या प्रकारच्या रुग्णांसाठी निरनिराळ्या गोळ्या उपलब्ध आहेत; पण जर का अशा गोळ्यांनी त्यांचा आजार आटोक्यात आला नाही तर मात्र त्यांनाही इन्सुलिनचे पाय धरावे लागतात.