मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य

स्वैपाकघरातून पत्रे २

शिव कन्या ·
प्रिय अन्नपूर्णा, जसे शहरात अपार्टमेंट, तसे किचनमध्ये आम्ही. एकावरएक चार, पाच, सहा किंवा आणखी कितीही मजली. तुझ्या choice प्रमाणे. घरातील माणसांच्या संख्येवर लोक माझी खरेदी करतात. तुझ्या घरात आमचे सहा मजले आहेत. पण तू त्यातलेही एक दोन काढून ठेवतेस. म्हणतेस, ‘घरात इतकी कमी माणसे, कशाला सगळे मजले चढवत बसा?’ मग आमच्यातला वरचा मजला काढून ठेवतेस किंवा रिकामा तरी ठेवतेस. मग उरलेल्या सगळ्यांना कुकरमध्ये बसवतेस. आम्ही सहसा बाहेर येतो, ते सुट्टीच्या दिवशी. तो दिवस आमच्या outing चा.

एटलस सायकलीवर योग यात्रा १: प्रस्तावना

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१: प्रस्तावना नमस्कार! नुकतीच मी एक सायकल मोहीम पूर्ण केली. योग प्रसारासाठी सायकल यात्रा अशा मोहीमेत सुमारे ५९५ किलोमीटर सायकल चालवली आणि ठरवल्याप्रमाणेच ही मोहीम पूर्ण झाली (फक्त काही कारणामुळे एक टप्पा कमी झाला). मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात कार्यरत 'निरामय योग प्रसार व संशोधन संस्था' तसेच तिच्या कामाचा झालेला विस्तार ह्या संदर्भात हा प्रवास होता. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग साधक, योग शिक्षक ह्यांच्याशी ह्या प्रवासात भेटलो.

अवयवदान : श्रेष्ठतम दान !

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागच्या महिन्यात अमेरिकेत झालेल्या पुरुष लिंगाच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर सामान्यजनांची एकंदरीत या विषयाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. (संबंधित धागा : http://www.misalpav.com/node/42508 ). यानिमित्ताने असे वाटले की ‘मानवी अवयवांचे प्रत्यारोपण’ या विषयाचा आढावा वाचकांना उपयुक्त वाटेल.

मला भेटलेले रुग्ण - १५

डॉ श्रीहास ·
http://www.misalpav.com/node/42182 ६ वर्षाची मुलगी घेऊन आला होता , दम्याचा त्रास बराच वाढलाय म्हणून सांगीतलं आणि पुढे काय करायचं हे विचारतांना त्याला निघायची घाई झालेली होती ...... मी इन्हेलर्स कसे वाढवायचे सांगीतले आणि घाई असेल तर सवडीने या म्हणालो .... तर म्हणाला “डाॅक्टर हिच्या आईची डिलीव्हरी आहे आज म्हणून मधल्या सुटीत आलो मी , घरी एकटीच असते ही म्हणून घेऊन आलो....

गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’.

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ६ (गरोदरपण)

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या) भाग ६ (अंतिम) : गर्भवतीच्या चाचण्या गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील बाब. आपण आई होणार याची चाहूल लागल्यापासून ते प्रत्यक्ष बाळाचा जन्म होईपर्यंत ती कशा अवस्थांतून जाते ते बघा. आनंद, हुरहूर, काळजी, घालमेल, ‘त्या’ वेदना आणि अखेर परमानंद ! पण हा गोड शेवट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एक निरोगी मूल जन्मास येते. जर या प्रक्रियेत काही बिघाड झाला आणि एखादा गंभीर विकार अथवा विकृती असलेले मूल निपजले तर? तर तिच्या वाट्याला येते फक्त दुःख आणि दुःखच.

तंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ५ ( वय ५० + )

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

वय ५० चे पुढे : आयुष्यावर बोलू काही !

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ४

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

भाग ४ : (वयोगट १९-४९)

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ३

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

वयोगट २-१८ वर्षे : स्वप्नातल्या कळ्यांनो .....

मला भेटलेले रुग्ण - १४

डॉ श्रीहास ·
http://www.misalpav.com/node/42101 “आपके बेटे को अस्थमा है।” बस् एवढं म्हणायचा अवकाश आणि त्या आईच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या.... खरं तर त्या ३ वर्षाच्या मुलाला गेल्या दिड वर्षांपासून हा त्रास आहे पण ॲलर्जीचा खोकला आहे , असं सांगीतल्या गेल्यामुळे फार काही वाटलं नव्हतं पण दमा आहे म्हटल्या म्हटल्या लगेच पालकांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलतात .... फार सिरीयस किंवा अतिगंभीर निदान केलं गेलंय आता पुढचं संपूर्ण आयुष्य अवघड जाणार असं काहीसं चित्र डोळ्यासमोर तरळतं ......हे काही योग्य नाही कारण दमा/अस्थमा हे फक्त नामकरण केलं गेलेलं असतं , आजार तर तोच आहे , लक्षणं देखिल तिच मग फरक काय पडतो ...