मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य

कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘ब’ गटातले हे जीवनसत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये कोबाल्ट हे मूलद्रव्य असून अशा प्रकारचे ते आपल्या शरीरातील एकमेव संयुग आहे. त्याचा शोध १९४८ मध्ये लागला आणि त्यानंतर जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत एकाचीही भर पडलेली नाही. निसर्गातील विशिष्ट जीवाणूच ते तयार करू शकतात. आपल्या मोठ्या आतड्यांत तसे काही उपयुक्त जीवाणू असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला थोडे ब-१२ मिळते. अर्थात तेवढ्याने आपली गरज भागू शकत नसल्याने आपल्याला ते आहारातूनही घ्यावे लागते. ब-१२ चे आहारस्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाची कारणे व परिणाम यांचा आढावा लेखात घेतला आहे.

मला भेटलेले रुग्ण - १७

डॉ श्रीहास ·
https://www.misalpav.com/node/42846 अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला ....... मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! .... कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता.... _/\_.... __________________•______________ हा ७ वर्षाचा मुलगा माझा पेशंट आहे, आई बाबांसोबत नियमित येतो. मागच्या भेटीत विचारलं त्याला काही व्यायाम करतोस का ?

‘क’ जीवनसत्व : आंबट फळांची दणकट देणगी !

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सामान्यजनांना ‘क’(C) या एकाक्षरी नावाने परिचित असलेल्या या जीवनसत्वाचे अधिकृत नाव Ascorbic acid असे आहे. त्याच्या नावाप्रमाणे ते आम्लधर्मीय असून ते आंबट फळांमध्ये विपुल प्रमाणात असते. आवळा, लिंबू व संत्रे हे त्याचे सहज उपलब्ध असणारे स्त्रोत. त्यातून लिंबू हे बारमाही फळ असल्याने आपण त्याचा रोजच्या आहारात समावेश करतो. शरीराच्या बळकटीसाठी आवश्यक असणाऱ्या ‘क’चा शोध १९३०मध्ये लागला.

मला भेटलेले रुग्ण - १६

डॉ श्रीहास ·
https://www.misalpav.com/node/42489 मुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते.

'ड' जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता (पूर्वार्ध)

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शरीराच्या पोषणासाठी आपण आहारातून विविध पोषण-घटक दररोज घेत असतो. त्यापैकी कर्बोदके, मेद व प्रथिने ही मोठ्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) लागतात. याउलट काही पोषण-घटक हे अल्प प्रमाणात (मिलिग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम) जरुरीचे असतात. अशा सूक्ष्म पोषणद्रव्यांमध्ये जीवनसत्वांचा(Vitamins) समावेश होतो. आजपर्यंत एकूण १३ जीवनसत्वे माहित आहेत. त्यांना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी एकाक्षरी नावे का दिली असावीत याचे वाचकांना कुतूहल असते. गेल्या १-२ शतकांत जेव्हा त्यांचा टप्प्याटप्प्याने शोध लागला, तेव्हा त्या प्रत्येकाचे रासायनिक सूत्र निश्चित माहित नव्हते. त्यामुळे त्यांना शोधक्रमाने अ, ब, क अशी नावे दिली गेली.

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर (६३ किमी)

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
३: जिंतूर- परतूर (६३ किमी) एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी १२ मे ला पहाटे साडेपाच ला जिंतूरवरून निघालो. रात्री चांगली झोप झाल्यामुळे फ्रेश वाटत आहे. आज ६२ किलोमीटर सायकल चालवायची आहे. माझ्यामुळे जिंतूरला डॉ. पारवेंना पहाटे लवकर उठावं लागलं व मला निरोप द्यायला ते रस्त्यापर्यंत आले. सकाळच्या प्रसन्न वेळेत सायकल चालवणं खूप मोठं सुख आहे! चांगली झोप झाल्यामुळे कालचा थकवा दूर झाला आहे.

रसायनांचा पूर आणि हॉर्मोन्सचा बिघडलेला सूर

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्याच्या युगात विविध रसायने ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. त्यातील काही नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! ती बनवण्यामागे विविध उद्देश होते खरे पण, त्यांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्याचे अनेक दुष्परिणाम आपण सध्या भोगत आहोत. त्यामध्ये श्वसनविकार, कर्करोग आणि हॉर्मोन्सची बिघडलेली यंत्रणा अशा अनेक आजारांचा समावेश होतो. रसायने आणि कर्करोग या विषयावरील विवेचन माझ्या मिपावरील पूर्वीच्या एका लेखात (http://www.misalpav.com/node/41581) केलेले आहे.

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२: परभणी- जिंतूर- नेमगिरी एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना ११ मे ला पहाटे साडेपाचला परभणीतून निघालो. अनेक जण निरोप देण्यासाठी आले, त्यामुळे उत्साह आणखी वाढला. अनेक जणांनी मॅसेजवरही शुभेच्छा दिल्या. काही अंतरापर्यंत माझे प्रिय सायकल मित्र आणि माझे रनिंगचे गुरू बनसकर सरसुद्धा सोबत आले. मी चालवतोय ती एटलस सायकल त्यांचीच तर आहे! पाय दुखत असूनही ते काही अंतर सोबतीला आले. थोडा वेळ त्यांची सोबत मिळाली व मग पुढे निघालो. योग प्रसार हेतु सायकलिंगच्या ग्रूपवर माझं लाईव्ह लोकेशन टाकलं आहे.