Skip to main content

आरोग्य

जुळ्यांचं दुखणं!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 10/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
'जुळ्यांचं दुखणं' हा शब्दप्रयोग आधी खूप वेळा ऐकला होता पण त्याचा अर्थ समजू लागला ते आमच्या जुळ्या मुलींच्या जन्मानंतर. त्या अनुषंगाने मला लक्षात आलं की जुळ्या मुलांच्या बाबतीत आपल्याकडे बहुतांश लोकांना काही कल्पना नाही आहे, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव तुम्हा समोर मांडण्याचा प्रयत्न. माझ्या मते, आजकाल जुळ्यांचं प्रमाण वाढलं आहे ते वंध्यत्व(infertility) साठी घेतल्या जाणाऱ्या थोड्या आक्रमक(!) उपचार पद्धतीमुळे. बऱ्याच डॉक्टर लोकांशी झालेल्या बोलण्यातून असं समजलं की हे उपचार चालू असतील तर २-३ गर्भ राहणं खूप कॉमन आहे. आमच्या बाबतीत तेच झालं असावं.

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २)

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 02/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40787 दम्याची कारणं बघण्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी - १.दमा निदान होण्यास उशीर का होतो २.श्वसननलिकेची रचना दमा किंवा कोणताही जुनाट / chronic आजार निदान होण्यास विलंब होण्यासाठी खालील कारणं आढळली आहेत. A.निरक्षरता - आपल्या देशात जवळपास ३०% (exact आकडा थोडाफार वेगळा असू शकतो) जनता निरक्षर आहे आणि असे लोक सहज फसवले जातात , त्यामुळे निदान आणि उपचार लांबतात किंवा चुकीच्या दिशेनी जाण्याची शक्यता वाढते. B.अंधश्रद्घा - ह्याचं सर्वात मजेदार उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा दुध प्यायला लागले होते ...

मला भेटलेले रुग्ण - ९

लेखक डॉ श्रीहास यांनी रविवार, 01/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40777 पेशंटसोबत मुलगी आणि जावई आलेले होते ...... तपासणी झाल्यावर रिपोर्ट्स सांगितले.... औषध कशी घ्यायची, पेशंट प्रशिक्षण कार्यक्रमला येण्याची तारीख दिली .... आणि अजून काही विचारायचं आहे का असं म्हटल्याबरोबर पेशंट नी तक्रार केली कि मुलं लक्ष देत नाहीत तब्येतीकडे , बराच त्रास सहन करावा लागतो ह्या वयात ..... त्यांना कळायला पाहिजे ..... मी विचारलं कि सोबत कोण आहेत आलेले , तेव्हा पेशंट बोलला जावई आणि मुलगी आहेत ...

योग- ध्यानासाठी सायकलिंग

लेखक मार्गी यांनी बुधवार, 27/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. योग- ध्यान ही थीम घेऊन एक सायकल मोहीम करणार आहे. सायकलिंगचा योगाशी व ध्यानाशीही जवळचा संबंध आहे. किंबहुना सायकलिंग, रनिंग, वेगवेगळे क्रीडा प्रकार किंवा नृत्य ह्या सगळ्यांचा संबंध योग व ध्यानाशी आहे. पश्चिमोत्तानासनासारखी काही आसन करणं कठीण असतं. किंवा सूर्य नमस्काराच्या तिस-या स्थितीत काही जणांचे हात जमिनीला स्पर्श करू शकत नाही. पण सायकलिंग- रनिंगमुळे अशी आसनं करता येतात. शिवाय एंड्युरन्सच्या एक्टिव्हिटीमध्ये हृदय जास्त हवा पंप करतं, त्यामुळे सायकलिंगसारख्या व्यायामानंतर भस्त्रिकासारखं प्राणायामसुद्धा जास्त तीव्रतेने करता येतं.

कर्करोगाचा विळखा

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 21/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
कर्करोगाचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे. यासंबंधी ‘यु.के.’ मधील एक मजेदार अहवाल वाचनात आला. २०१५ मध्ये त्या देशात ७०,०००हून अधिक नवीन निदान झालेले कर्करोगी आढळले होते. हा आकडा नक्कीच धक्कादायक आहे.

#मिपाफिटनेस - सप्टेंबर २०१७ - ज्युदो

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी शुक्रवार, 01/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "जॅक ऑफ ऑल" जॅक ऑफ ऑल उर्फ "जॅक" पूर्वी ज्युदो खेळत होते, त्यामध्ये ब्लॅक बेल्टसारखी मैलाच्या दगडाची कमाईही केली आहे आणि अनेकदा चर्चांमध्ये काँटॅक्ट स्पोर्टमुळे स्वभाव कसा शांत होतो हे हिरीरीने पटवूनही देतात. आपल्याला ज्युदो / कराटे म्हणजे हाणामारीला उत्तेजन देणारे प्रकार वाटले तरी त्याची दुसरी बाजू शोधण्यासाठी या लेखाचा नक्की उपयोग होईल. टीम #मिपाफिटनेस - मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास. **************************** एकदा सकाळी सकाळी फोन खणाणला .. मोदक कॉलिंग .

एका सुंदर उपक्रमाची आणि जबरदस्त मोहीमेची दखल!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 23/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना मन:पूर्वक नमस्कार. एका जबरदस्त मोहीमेची आणि एका सुंदर उपक्रमाची माहिती आपण सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली. एखादी व्यक्ती आपली आवड, पॅशन, छंद ह्यामधून किती सुंदर काम उभं करू शकतो आणि त्याही पलीकडे इतरांना किती मोठी प्रेरणा देऊ शकतो, ह्याचं हे एक उदाहरण आहे. आपल्यापैकी अनेकांना हर्षद पेंडसे हे नाव ओळखीचं असेल. हर्षदजी ९ सप्टेंबर रोजी लेह- खर्दुंगला येथे होणा-या खर्दुंगला चॅलेंज धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. खर्दुंग- खर्दुंगला- लेह ही ५००० मीटर्स पेक्षा जास्त उंचीवरची ७२ किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन आहे आणि त्यात ते सहभाग घेत आहेत!!!

पैठणी दिवस भाग-३

लेखक गुल्लू दादा यांनी मंगळवार, 15/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
बाह्यरुग्ण विभागामध्ये मलमपट्टी विभागात काम करायला मला विशेष आवडत असे. रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. 'जखम कशी झाली' या विषयाद्वारे रुग्ण आपलं मन माझ्यापाशी मोकळं करत. त्यांच्याकडून मग मी पैठण शहराची माहिती, प्रेक्षणीय स्थळे, खाऊ गल्ली यांची माहिती अलगद काढून घेत असे. असेच एके दिवशी मध्यम वयाचे गृहस्थ आपल्या वडिलांना घेऊन मलमपट्टी विभागात आले. दोघेही एकमेकांवर मारवाडी भाषेत ओरडत आले. वडील मुलाला म्हणत होते, 'मला नाही करायची पट्टी बिट्टी'. त्यांचा मुलगा पण त्यांना प्रतिउत्तर देत होता.

आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञ

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 11/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांत मला अनेक ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांनी शहरांत उपलब्ध असणार्‍या वैद्यकीय तज्ञांबद्दल शंका विचारल्या. तेव्हा असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे: १. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात. २. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS ३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत.

लठ्ठपणा आणि आपली जीभ !

लेखक हेमंतकुमार यांनी शनिवार, 05/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
लठ्ठपणा ही ही सध्या जगभर भेडसावणारी समस्या आहे. त्याची कारणे आणि त्यावरील उपाय यावर सतत संशोधन होत असते. अलीकडे एक मजेदार संशोधन वाचले. काही स्थूल व्यक्तींना अति गोड खाण्याची सवय असते. त्याची काही कारणे आहेत त्यात अजून एकाची आता भर पडली आहे. आपल्या जिभेवर निरनिराळ्या चवींचे ज्ञान देणाऱ्या ‘चव-कलिका’ (taste buds) असतात. काही स्थूल व्यक्तींच्या बाबतीत या कलिका ‘मंद (dull)’ झालेल्या असतात. जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्याला तृप्ती आणि आनंदाची भावना होते. पण जर त्या कलिका मंद असतील तर ती भावना लवकर होतच नाही. त्यामुळे अशी व्यक्ती ही प्रमाणाबाहेर गोड खाऊ लागते.