(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
भाग ६ (अंतिम) : गर्भवतीच्या चाचण्या
गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील बाब. आपण आई होणार याची चाहूल लागल्यापासून ते प्रत्यक्ष बाळाचा जन्म होईपर्यंत ती कशा अवस्थांतून जाते ते बघा. आनंद, हुरहूर, काळजी, घालमेल, ‘त्या’ वेदना आणि अखेर परमानंद ! पण हा गोड शेवट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एक निरोगी मूल जन्मास येते. जर या प्रक्रियेत काही बिघाड झाला आणि एखादा गंभीर विकार अथवा विकृती असलेले मूल निपजले तर? तर तिच्या वाट्याला येते फक्त दुःख आणि दुःखच.