Skip to main content

शांतरस

वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 21/06/2020 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची सर जशी बरसून गेली वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली! गुणगुणत होतीस का तू गझल माझी? एक कोकीळा इथे गावून गेली!

तू ठरव...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 01/06/2020 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही हात घे हातात आधी,आरसा नाही! टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा फायदा नात्यात आता फारसा नाही! एवढा केला खुबीने खूनही माझा वारही केला असा जो वारसा नाही! सांगतो आहे जगाला कोण हा वेडा! मी असा नाही असा नाही असा नाही! कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना एवढीही या मनाला लालसा नाही! तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही... —सत्यजित

बायका...

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 27/05/2020 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
काल ते म्हणाले, सगळ्याच बायका तशा असतात. तशा म्हणजे नेमके कशा, म्हणून शोधु लागलो, बायका. पुराणात, प्राचीन ग्रंथात, ऑफिसात, समोर- मागे, इथे तिथे. गुगलवर. अगदी मिपावरही. असतात बायका, हळव्या, खंबीर,धीट आणि तितक्याच कर्तबागरही. बायका असतात, पुरुषां प्रमाणेच. सोशिक, शोषित आणि बंडखोरही काहींनाच जाणवतात, खोल-खोल श्वास, अन् ते शब्द. काहींना नाही इतकाच, फरक असतो त्या, मुक-संवादाचा. बायकात असते एक बाई, अन आईही. बायको- प्रेयसी, मैत्रीण आणि एक मुलगीही. आदिम काळापासून सोबत आणि शिवाय, सुरु असलेल्या बायकांचा समर्थ प्रवास अव्याहतपणे. बायका म्हणजे अस्वस्थ तगमग. लिहिता येत नाही त्यावर कविता, लेख.
काव्यरस

प्राणवेळा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी बुधवार, 06/05/2020 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
आठवांच्या काळवेळा पाहिल्या. हृदयाच्या प्राणवेळा पाहिल्या. मालवेणा चंद्र भोळा कालचा. कालच्या या चांदण्याही राहिल्या. सोसली मी ही तमांची अंतरे. रात्र काळी झाडपाने मंतरे. गारव्याने जाग आली या फुला. पाकळ्यांच्या गंधपेशी दाहिल्या. प्राण झाले कातिलांचे सोबती. सांग हे का माणसाला शोभती ? वाचण्याचे मार्ग सारे संपले. शेवटाला प्रार्थना मी वाहिल्या. -कौस्तुभ वृत्त - मालीबाला
काव्यरस

एक चांदणी माझ्या घरात डोकावते

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 02/03/2020 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
दुधाळ चांदव्यात, प्रखर तेजाळते एक चांदणी माझ्या, घरात डोकावते मी बसतो दडून, तिच्यापासून ती हलत नाही, टक लावते माझा मी लिहितो, हळुवार गुणगुणतो ही, मी लिहिलेले, गावाला ऐकवते चालत राहते रात्र, ही चांदणी मात्र अमीट असल्याच्या, थाटात वावरते उशीरा कधीतरी, फिरते माघारी ती गेल्यावर तिची, टिमटिम आठवते रात्रभर छळते, मला जागवते पहाटे निमूट माझ्या, कवितेत उतरते - संदीप चांदणे

(कितनी राते....)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 02/03/2020 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात http://misalpav.com/node/46163

कितनी राते....

१. तू हलकट पणे म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू की आरामात.. मी म्हणालो तूच बस भाड्या, तुला माहीत आहे, मला खाली बसता येत नाही! पण त्या वेळेला तुझी ती कुत्सित नजर बघून मला मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला? म्हणे "आरामात बसू"! २. म्हातारा संन्यासीच होता ना की अजून काही? अख्खा खंबा संपवलास तू हावरटासारखा. (सत्य घटनेवर आधारीत.....

एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.

लेखक माहितगार यांनी बुधवार, 19/02/2020 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या कृष्णांना राधा नसतात आणि ज्या राधांना कृष्ण नसतात त्यांनी काय करावे ? ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा आदर करावा किमान राधेच्या चारित्र्याचे उगाचच जज बनू नये. ज्या कृष्णास राधा भेटत नाही ज्या राधेस कृष्ण भेटत नाही त्यांनी काय करावे? न मिळालेल्या जोडीदाराच्या निवड स्वातंत्र्याचे कौतुक करावे किमान न मिळालेल्या जोडीदाराच्या जोडीदाराची इर्षा करु नये.

एका उदास संध्याकाळी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/02/2020 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
एका उदास संध्याकाळी कोणी गात होती विराणी || शब्दांत अशी आस नव्हती चाल नव्हती अशी कोणती धारही नव्हती त्या शब्दांना तरी काळीज जाय चिरूनी || संधीप्रकाश निळा जांभळा खालून गेला वर आभाळा कुंद हवा अन वारा पडला हवेत सूर राही भरूनी || धिरगंभीर सूर कवळूनी गीत हृदयीचे आळवूनी उलगडे आर्त सरगम भरूनी राहिली कानी || - पाषाणभेद ०५/०२/२०२०

एकदा तरी माती व्हावे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/01/2020 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा तरी माती व्हावे कधीतरी इतरांच्या पायी जावे एकदा तरी माती व्हावे नको राग लोभ कशाचा मी माझाच नाही आहे सर्वांचा नको व्यर्थ माझे माझे करावे एकदा तरी माती व्हावे दैन्य इतरांचे पाहून मग कळते मी किती सुखी ते आपलेच सुख आपल्याला टोचावे एकदा तरी माती व्हावे चारी ठाव घरी खातसे ताटात गरम पक्वाने कागदावर अन्न केव्हातरी चाखावे एकदा तरी माती व्हावे वापरसी अंघोळीस पाणी मुबलक फासशी साबण अंगास सुवासीक शरीर सार्वजनीक स्नानास अनुकूल असावे एकदा तरी माती व्हावे सेवा करवून घेई स्वत:ची हातात सार्‍या वस्तू येती कधीतरी झाडू मारूनी उष्टे उचलावे एकदा तरी माती व्हावे आत्मकेंद्री स्वभाव होई म
काव्यरस

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

लेखक माहितगार यांनी बुधवार, 18/12/2019 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा । श्री गणपती देवी पार्वती महादेव वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा। सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा। राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। सबाह्याअभ्यंतरी तु एक वटवृक्षदेव। अभाग्यासी कैची कळेल ही मात।