क्षमा प्रार्थना
लेखनविषय:
काव्यरस
https://www.misalpav.com/node/47149#new
शाम भागवत सरांचा हा धागा वाचून मनात काही विचार आले ते शब्दबध्द केले आहेत. त्या धाग्यावर हे टाकले तर कदाचित विषयांतर होईल असे वाटल्याने वेगळा धागा काढत आहे.
जसे सुचले तसे लिहिल्याने कदाचित हे वाचताना विस्कळीत वाटेल, तसे वाटले तर तो माझ्या आकलनाचा दोष समजून वाचकांनी मला क्षमा करावी व भावार्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करावा.
क्षमा प्रार्थना
क्षमेसारखा दुसरा स्वार्थ नाही | जनी सर्व सूखी क्षमाशिल राही || अभोगी पणे भोगणे भोग सारे | अहंपणाची जराही बाधा नकोरे || विकारे विचलीत होऊ नये रे | विकार किती एक आले न गेले || क्षमावंत उपेक्षा करी विकारांची | समता सदा राखूनिया मनाची || भूत भविष्यात मन धावित राही | तयाची प्रतिक्रिया उमटे तव देही || प्रतिक्रिया उमटता श्वास गतिमान होई | उसळे रक्त सु़क्ष्म कंप सर्वांगी येई || अवस्थेस ऐशा जाणून घ्यावे | प्रयत्ने मना वर्तमानी अणावे || प्रिय-अप्रिय या अवस्था मनाच्या | अपेक्षा उगा वाढविती उद्याच्या || अपेक्षांचे गाठोडे फेकून द्यावे | मना समभावे सदा रमवावे || मार्ग हा जरी वाटला खूप साधा | मन आणेल त्यात हजार बाधा || मर्कटलीला मनाच्या दुर्लक्षून टाकी | आपोआप स्थित होईल ते एक जागी || अडथळ्यास उगा घाबरून जाऊ नको रे | मदतनीस तुझे पावलो पावली उभे रे|| पाउल पहिले पुढे टाकून पहा रे | तक्षणी मार्ग उजळेल बघ तुझा रे || ईश्वरा प्रति मागणे एक आहे | सर्व प्राणीमात्र या मार्गी निघावे || जागी प्रत्येक जीवाचे कल्याण व्हावे | आनंदाचे डोही सर्व आनंदी व्हावे || पैजाराबुवा,
वाचने
13286
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
साष्टांग दंडवत! _/\_
भूत भविष्यात मन धावित राही |
अप्रतीम.
अप्रतिम
सुंदर __/\__
___/\___
ईश्वरा प्रति मागणे एक आहे | सर्व प्राणीमात्र या मार्गी निघावे ||
अतिशय सुरेख
अतिशय सुंदर लिहीलंय पैजार
सुंदर
जबरदस्त
एकदम झकास...
शिर्षक वाचुन मला मी लहानपणा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kalसुंदरच_/\_
सुंदर!
खूप छान.
जबराव जबराव जबराव
दंडवत!!! _/\_
भारी