Skip to main content

शांतरस

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 07/02/2018 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा! कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा! कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!

(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 18/01/2018 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!) सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला! पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला! आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी? मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला! वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला! भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला! —सत्यजित

प्रीती तुझ्यावरी पण...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 13/01/2018 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीती तुझ्यावरी पण,समजे मलाच नाही. या अनाकलनाचा,मी काय अर्थ घ्यावा? शब्दात सांगताना,उरते मनात काही. या गूढ शांततेचा,मी काय अर्थ घ्यावा? एका किनारी तूही ,दुसय्रास स्पर्श माझा. मधल्या प्रवाहितेचा,मी काय अर्थ घ्यावा? मोडून एक काठ,वळते नदी जराशी. मग शांत त्या तळाशी,कोठून सूर द्यावा? जमले मनावरी हे, शेवाळ दाट सारे. गहिरे कसे म्हणू मी?निसटंताचं अर्थ व्हावा! आता मनावरूनी, सोडून देतं सारे. दिसली फुले जरी ही,निरं-माल्य अर्थ व्हावा! सोडून काय देऊ? सारेच क्षणभराचे. हे रोजचेच आहे, साधाच अर्थ घ्यावा. थांबवू कशास मग मी?
काव्यरस

प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 07/01/2018 09:30 या दिवशी प्रकाशित केले.

मलयगिरीचे वारे वासंतिक वारे चैतन्य नांदे घर-अंगणी

शहरी वारे स्मागी वारे मृत्यू नांदे घर-अंगणी.

काव्यरस

प्रदूषण कविता(2)- जिन्न आणि अल्लादीन

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 04/01/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.

प्रदूषणचा कर खात्मा अल्लादीनने आदेश दिला जिन्नने तत्क्षणी त्याचाच गळा दाबला।

टीप: अल्लादीन म्हणजे मनुष्य जाती. जिन्नने अल्लादिनचा गळा का दाबला?
काव्यरस

प्रदूषण- पाऊस (१) - भूत आणि वर्तमान

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 04/01/2018 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना पाश्चात्य नवीन वर्षाच्या शुभेच्छा. (श्री सुभाष स नाईक यांची प्रेरणा घेऊन) पाऊस श्रावणात बरसल्या अमृत धारा उजळली कोख धरती मातेची। श्रावणात बरसल्या तेजाबी धारा वांझ झाली कोख धरती मातेची।
काव्यरस

प्रवास

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 04/01/2018 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
घरी चाललो मी आज आसावला प्रवास भर समूद्रात टाकले होडके किती योजने वाहलो खास होते काही प्रयोजन अन काही उद्देश पण तरंगण्याला न लागले सायास स्वार्थाने जाळे टाकले जीवनी अनूभवाचे आले मासे त्यात जेथून आलो तेथेच चाललो आसावला प्रवास - पाभे
काव्यरस

मधुघट१

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 10/10/2017 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
मधुघट कुणा मिळे भरलेला शोधते जळकुंभ कुणी ।।धृ ।। बळ कैसे येईल अंगा जळही दुर्मिळ भासतसे अमृताची जरी हाव नसे ऐकेना व्याकूळ आर्जवाला ।।१।। लोळे कुणी मखमालीवरी वणवण, हाय! कुणा ललाटी भलीबुरी, ही जगरहाटी! कमवेना कुणी त्या गोडीला? ।।२।। भला जाणता दीन नेणता कष्ट करी अमाप जरी जैसे तैसे रहावे धरी साखरपाणी तो प्यालेला ।।३।। - संदीप चांदणे

पापणी

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 19/08/2017 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा *पापणी* लवलवती पापणी... अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली ...लवलवती पापणी थरथरती पापणी... अश्रूंच्या लाटांनी, बेभान जराशी झाली सोडण्या तयांना खाली, पहा तयार झाली ...थरथरती पापणी झरझरती पापणी... अविश्रांत असा, झरा वाहता झाली,  पुन्हा भरण्यासाठी, वेडी, रिक्त झाली ...झरझरती पापणी - संदीप चांदणे

साडेपाच इंच !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 09/08/2017 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . . आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . . काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . . मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो ! कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ? कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं ! जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . . आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?