Skip to main content

शांतरस

माहेर, सासर

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 08/12/2019 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
माहेर, सासर नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा अल्याड गाव माझे त्यात मी राहिले पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते त्याचाकडची वाट नजरेला खुणावते मनी लागली हुरहुर कसे असेल सासर कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर - पाषाणभेद ०८/१२/२०१९

वेदनाच मला मिळू दे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 17/11/2019 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
नकोत आनंददायी संवेदना हे प्रभो वेदनाच मला मिळू दे हरवू दे माझा मी पणा त्यासाठी मजला धिर दे सुख असे हे की डाचते मला ते तेच ते कणखर मनाला पंगू बनवते भौतिकाच्या मागे न लागो शाश्वत असा अशिष दे ऐहीक श्रीमंत असूनही मदतीचा हात नाही कशाला मग उगाचच मी दानशूर मिरवत राही तुझ्या हातांची सर येण्याची मजला बुद्धी दे तावून निघावे भट्टीत सोने मग दागिणा बनण्या त्यासम माझे मन होवूदे तयार तुझ्या कडे येण्या घण संकंटांचे घाल पाठी, मळली वाट मला न दे - पाषाणभेद १७/११/२०१

कविता : भेट मित्रांची…

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 05/11/2019 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींना उजाळा भावनांचा उमाळा शब्दात जिव्हाळा दोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची… मित्रांची सतत मस्ती कधी मस्तीची सक्ती सख्याची जीवापाड दोस्ती कधी दोस्तीत कुस्ती…. भेट मित्रांची… मित्र कमी बोलणारा परी डोळ्यात जपणारा दोस्त शब्दात खेळणारा पण शब्दासाठी धावणारा…. भेट मित्रांची…

भक्ति गीत: सप्तशॄंग गडावर जायचं

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/10/2019 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला ग बाई वाट गावली, माझ्या नशिबानं सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ|| हाती धरली कावड गोदेच्या निर्मळ पाण्यानं ||१|| गड झाला हिरवा साथ दिली पावसानं ||२|| घर माझं भरलं धन धान्याच्या राशीनं ||३|| जगण्याची रीत दावली देवी सप्तशॄंगीनं ||४|| नवसाला पावली आई आशीर्वाद दिला तिनं ||५|| पुजा करून ओटी भरीन कुंकू लावीन हातानं ||६|| सगे सोयरे झाले सोबती पायी चालती आनंदानं ||७|| दर्शनाची आस लागली घाईनं उचलते पाऊलं ||८|| कृपा असू द्यावी भक्तांवरी विनवणी करी पाषाण ||९|| सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ|| १७/१०/२०१९
काव्यरस
Taxonomy upgrade extras

तुझ्या भेटीला आलो दत्ता

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 28/09/2019 05:22 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या भेटीला आलो दत्ता सत्वरी या आता || तुझ्या मंदीराची केली वाट सोपी नसे काही चिंता, मनी आस मोठी वाट पाही दर्शनाची, तुम्ही प्रकटा || भक्तांची दु:खे करुनीया दूर दिले जीवनात सुख भरपूर सर्वांचा वाली तू तूच आमचा त्राता || पाहूनिया रुप होईल मनाची शांती नसे आस कसली, तिच विश्रांती सखा तूच गुरू तूच तूच होई दाता || ब्रम्हा विष्णू महेश तिन लोक शक्ती तुझ्या ठाई एक झाले, व्यापूनी सृष्टी रुप दाखवा तुम्ही दारी आलेल्या भक्तां || - पाषाणभेद २८/०९/२०१९

पाहूणा पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 27/09/2019 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी म्हणाले पावसाला तू येतोस कधी ब-याच दिवसात भेटला नाही तो म्हणाला मी तर येतच असतो नेहमीसारखा पण तूच माझ्याशी बोलत नाही मग मी त्याचे स्वागत करायचे ठरविले अगदी जवळ गेल्यासारखे भासविले पण त्याचे मनात काही वेगळेच असेल जवळ येवून त्याने सा-यांनाच कवेत घेतले
काव्यरस

ओले केस

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 26/09/2019 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
केस ओले न्हालेते आले प्रेमाचे भरते (पावसात केस ओले प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत!) शिडकावा ओल्या थेंबांचा चिंब भिजवून देण्याचा गोरी काया ओलेती तुझे लावण्य दाखवती गाली लाज आलेली शृंगाराविना सजलेली अशी सामोरी ललना मन हरखले ना ! साडी लपेटून उभी येते कवेत कधी? - पाषाणभेद २६/०९/२०१९

इंद्रधनू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 28/07/2019 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनू (आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.) आकाशी ते इंद्रधनू आले अहा! चला बाबा बघा ते पहा!

निर्झर

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 15/07/2019 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
निर्झर निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा || धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची || नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी || पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला || - पाषाणभेद १५/०७/२०१९
काव्यरस

कविता पिंपळपान

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 01/07/2019 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
कविता सुचत नाही मन ही रितेच काही लिहू काय? म्हणता म्हणता सापडले ओले पान. ही कविता पिंपळपान! थेंब थेंबा जाग आली रेष रेषा बोलू लागली ना लिहिता आले कैसे मज लेखणिस भान? ही कविता पिंपळपान! हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे पाचोळा नसता कोठे गर्द जागे होते रान ही कविता पिंपळपान! घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान! म्हटले या पावसाला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब मनाला मग लाभे पाऊस-दान ही कविता पिंपळपान!
काव्यरस