Skip to main content

डिअरपिअर...मॅकबेथले... काळाची उधई गिळी टाकई!

लेखक माहितगार यांनी रविवार, 23/04/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २) अरे डिअरपिअर कशास बघतोस स्वप्नात जुई...

( वरपरीक्षा )

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 31/03/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

कधीतरी.....

लेखक पराग देशमुख यांनी रविवार, 29/01/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

(नाक गळतंय माझं..)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 28/12/2016 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (मूळ कविता, त्यातल्या कल्पना सुरेख आहेत. उगाच टैमपास म्हणून हे विडम्बन. अजून बरे होऊ शकले असते..) नाक गळतंय माझं तसं ते नेहमीच गळतं पण पाऊस आला की येतात जोराच्या दोन चार शिंका अन नाक येते कफही होतो जरासा नाक गळतंय माझं रुमाल ओलागिच्च झालाय केंव्हाचं तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची हाताशी व्हिक्स आहेच पण विकोरील मिळेना.. जौदे ,निचरेल ...

(कोरडी भाकर)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 11/12/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता, त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर मी किती दडवून ठेवले या ढेरीला कुत्सित नजरा घाव घालती.. या..!

(फेंदारलेल्या मिशा....)

लेखक नाखु यांनी बुधवार, 12/10/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे. दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते. मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे. पाहून स्वप्ने सत्तेची बोकाळली आहे संराशा१ आता कोठे होऊ लागल्यात पाठवणी जराश्या का करीशी भणभण या वखवखलेल्या सत्ताबाजारात आता कोठे मिळविल्यात खुर्द्यात चवल्या जराश्या आजूबाजूला बोंबाबोंब किती कोण ऐकेल माझे घायाळ झाली आता कोठे माझी दमाची भाषा ना रुजते मन माझे या झाकोळल्या विजनात राहतं नाही माझ्या कृष्ण्कर्मे आडोश्या फरपटत जात

(हूं)

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 04/10/2016 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आशा मनात तुझी धुसर धुसर, मागताना आवाज कातर कातर, स्मरता जुन्या त्या आठवणींना, दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!! क्लायंट कायम करतो काशी, म्हणतो पगार कसा छापाल छापाल मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!! डिजाइन टीमची असते बोंब रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर, क्यूएची आहे नसती कटकट मागे , बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!! जरी प्रोजेक्टची अवस्था दीनवाणी हवीच आहे मला सुट्टी सुट्टी असेल जरी क्रिटिकल एरर आता काम दिवाळी नंतर नंतर !!४!!

(*गणे कसेच होते)

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/08/2016 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्रणा -लाडका बुव्या *गणे कसेच होते? येथे बघून गेलो पाणी जराच होते, थोडा *गून गेलो टमरेल टांगलेले, मी घेतले हातात परसाकडील दारी, मी लगबगून गेलो लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो *गणे कसेच होते. .

मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 20/07/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! बियरला रास्त भाव भेटला काय, न भेटला काय पिणार्‍यांच्या मनांत असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय मी पण थोडे फार कमवीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! पिणार्‍यांना नशा चढली काय, न चढली काय पिणार्‍यांना भरपुर रिचवायची सवयच हाय मी पण थोडे फार कमवीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! अन्नाचे भाव आणि दूधाचे भाव वाढले काय, अन चकण्याचे भाव पण वाढले काय या पिणार्‍यांना उपजत अक्कलच नाय बियरच्या साथीने वाईन पण विकीन म्हणतो मी बी बियर बार काढीन म्हणतो...!! बियर विकून सत्तेत येता येते बियर पिणार्‍यांना उधार देणारा ख

समाधान !

लेखक खेडूत यांनी शनिवार, 18/06/2016 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच ! पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय? तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …! *** होती अमुची प्रिया एक ती आमची मंजे कंपनीची सदैव वाटे तिजला कांही नविन करावे प्रतिमासी कधी कनेक्टे हार्ट आमुचे कधी पॉलीस्यां अपडेटवी तसा एकदा सर्व्हे केला 'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि ! मनात नसता भाग घेउनि सारे प्रतीसादून आले सर्व्हे झाला पटपट आणिक सार निघाले हो झटपट स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि छान छान पी पी टी सजवून आली हो ऐटीत पुण्याला प्रिया विमानी त्वरित बसून सगळ्यांना गोळा करूनि पोपटपंची झाली करून सगळे आपण कित्ती ह्याप्पी