Skip to main content

दोरीवरचे कपडे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/09/2019 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोरीवरचे कपडे दोरीवर कपडे कसेही वाळत असतात कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात? शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो (यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.) पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे साडी घालून घडी बसते वाळत वा-याने तिचा पदर असतो हालत किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय त्यात बाई घातली अ

(रगेल पावट्याचे मनोगत)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 16/08/2019 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे... ******* नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही विधायक पाहण्यात तर मला रस नाही दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल शोधतो जागेला, जिथे शि

(काय करून आलो)

लेखक नाखु यांनी शनिवार, 29/06/2019 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
वाचायला(च) गेलो, लिहून काय आलो? आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाजळून आलो .. ना अर्थ आशयाचा बोली.. लावून आलो . कावलेल्या समयी भडास काढून आलो .. होते कोण न कोण बघतोच मी कशाला ? बिना वातीचेच (मुद्दाम) कंदील लावून आलो ? धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . (जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)

दे दे दे दे दे दे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 18/06/2019 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे किती वेळ झाला सारखा हातात घेते तु जशी मालकीण मी पण मालक आहे माझ्याच घरात मला चोरी झाली मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे दे दे दे दे दे दे दे सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते (चाल सोडून:- भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा) महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोड

(गफ)

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 27/05/2019 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..

(दाराआडचा यजमान)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 26/04/2019 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
एक यजमान दाराआडून (नेत्रछिद्रातून)बाहेर बघतो किती बाहेर? दाराच्या बाहेर, जिन्याच्या पार जिथे एक अनाहुत आला असेल बहुदा .... असेल का तो अनोळखी, का बघून ओळख न दाखवणारा ? येत असेल का तो ही आप्तांच्या घरी , बिनकामाचा कुणाकडे? यजमान दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... (पेपरातील बातम्या आणि माणसूकीची फसवणूक मानेवर जख्ख बसलेली असते) मग तो कल्पनेचे पंख पसरतो, त्या पंखावरुन अलगद फिरुन लेकरांना, मित्रांना भेटून येतो डोळे मिटून घेऊन यजमान शांतपणे खुष राहतो.... दूरदेशी लेकरे आपल्याच जगात पाक्षिक आठवणीत ठेवून जमेल तसं (तर) चिमुकल्यांच्या हट्टाने दृकश्राव्य माध्यमातून (च) भेटत राहतात...

(तू मतदार माझा)

लेखक नाखु यांनी रविवार, 21/04/2019 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - विळखा पाहू तू मतदार माझा भोट, भोंगळ अजीजी तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा मस्तवाल नेता मी .... घेऊन जमेस तुला निव्वळ उगी तुंबडी भरावी बोभाटा करावा मी एव्हढा की लाभावी मज(समोरची) वाटणी सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित. वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

(जळवे)

लेखक नाखु यांनी रविवार, 14/04/2019 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
तमाम मिपाकरांच्या (माझ्या सहित) ,भोचक व वरकरणी मदतीआड त्रस्त पिडणार्या नातेवाईकांना समर्पित ********** हेच ते पिडणारे पळवे जळवे ज्यां(च्या)मुळे तुझे जगणं काळजीने पोखरून ठेवलेस!! पाठिंबा वा संमती असती तर हे जळवे शक्तिने तांडून लगेच दृष्टी आड घालून विस्मृतीत टाकले असते... ना ही कुतरओढ कसोटी भाळी असती... ना भोचक डोळे खुपसून (देत) न संपणार्या टिकेलासुद्धा सोसत राहिले असते.... ना टोमण्यातून तुझ्या भळजखमा टोकरत राहिले असते.... नाहीतर, माझ्या प्रिया, सगळ्यांना आप्त ( नातलग) निवडायची संधी पसाभर देता, तर विधात्याचे काय जाते?

दाराआडची चमेलीबाई ( आणि ती सटवी रोहिंगीण)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 08/04/2019 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: दाराआडची मुलगी. . चमेलीबाई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वत:च्या बाहेर, कमाठीपुर्‍याच्याही पल्याड - भूतभविष्याच्या आरपार ... तिकडे दूर इस्माईल बसला आहे... . केसांचा कोंबडा काढून "दिल का भंवर करे पुकार" ...

(बंद कळफलकामागचा वाचक)

लेखक नाखु यांनी रविवार, 07/04/2019 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक वाचक कळफलकाबरोबर बघतो आहे मिपा कसले मिपा ? स्वत:च्या कक्षेत, जालजंजाळाच्या पार जिथे हर एक लेखकू बसला आहे क्षुब्ध.... करत असेल का तो ही (कधीकधी)वाचकाचा विचार? वाचत असेल का तो ही इतरांचेही आहेर, विरोधाच्या (चष्म्या) पलीकडे? वाचक त्याच्या वाचनदुनियेतून बाहेर येऊ शकत नाही... मग तो त्याचे मूक प्रतिसाद पाठवतो, ते प्रतिसाद डोक्यात (न)घेऊन लेखक निवांतपणे मख्ख राहतो.... मिपा हरवलेला वाचक जुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो, पुन्हा पुन्हा चाचपडत राहतो... वाचकांचीच पत्रेवाला नाखु