Skip to main content

(फेंदारलेल्या मिशा....)

लेखक नाखु यांनी बुधवार, 12/10/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे. दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते. मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे. पाहून स्वप्ने सत्तेची बोकाळली आहे संराशा आता कोठे होऊ लागल्यात पाठवणी जराश्या का करीशी भणभण या वखवखलेल्या सत्ताबाजारात आता कोठे मिळविल्यात खुर्द्यात चवल्या जराश्या आजूबाजूला बोंबाबोंब किती कोण ऐकेल माझे घायाळ झाली आता कोठे माझी दमाची भाषा ना रुजते मन माझे या झाकोळल्या विजनात राहतं नाही माझ्या कृष्ण्कर्मे आडोश्या फरपटत जात आहे मी दशाहीन झाल्या या मिशा दाविती दर्पण मज या फेंदारलेल्या मिशा. १ संराशा= संजय राऊतांची ले़खणीशाई
लेखनविषय:

वाचने 5727
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

=)) मूंछे हो तो नथुलाल जैसी हो वरना ना हो! =)) नाखुकाकांची कविता समजल्याचा आनंद शब्दातीत आहे, दसर्याच्या शुभ मुहूर्तावर पैजारबुवांनी आपल्याला गंडा बांधला की काय अशी एक शंका आली मनात ;)

In reply to by रातराणी

पैजारबुवां आम्हाला कायम गुरुस्थानी आहेत्च आणि नुकतेच त्यांनी आम्ही दोघे एकाच मुख्याध्यापकाचे शाळेत आहोत हे आम्हाला सुचीत केले आहेच.

In reply to by नाखु

काय हो आपले प्रातःस्मरणीय परमआदरणीय वंदनिय श्री श्री १०८ मुख्याध्यापक एकच आहेत सा-या जगाला माहीत आहे.(इथे आम्ही आमच्या दोन्ही कानांना हात लावला आहे) पण त्याच बरोबर चार वर्ष नापास होत तुमच्या वर्गात आलेल्या दगडाला कशाला शेंदुर लावताय? (शेवटच्या बाकावर बसून पहिल्या बेंचवर बसलेल्या नाखुअंकलकडे मठठासारखा पहाणारा) पैजारबुवा,

'आता मला वाटते भिती' - हा कुठला काव्यरस म्हणायचा =))

मेरेको वाट्याच. कोईतो फेंदारलेल्या, ओथंबलेल्या मिश्या बोलके विडंबन डालेंगाच. पण आमच्या साक्षात साह्यबांवर विडंबन केलेले असल्याने तूर्तास वरुन आदेश आल्याने तूर्तास निषेध. तुम्हीही तूर्तास माफी मागा.