सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


वधूपरीक्षा

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
31 Mar 2017 - 10:50 pm

वधूपरीक्षा
...........................
नव्हते मनांत तरीही,कसे अघटित घडले
त्या चित्त चोरट्याला,आपले म्हणून बसले
*
होते पुढे शिकायचे,आईचे ऐकून फसले
वधू परीक्षेस मी,का सजून बसले?
*
त्या हस~या छबीत,मीच हरवून बसले.
त्या एका कटाक्षाने,घायाळ होऊन गेले..
*
बोलणे असे आर्जवी,का मनास गुंतवावे.?.
ठेवले जे सांभाळून,का वाटे उधळावे?
*
असेल मी आवडली?,कितीदा मना पुसावे
येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे
*
येता होकार त्यांचा,मन पाखरू व्हावे.
वाटे हे जीवन,त्या चरणी अर्पावे..
*
नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे?
या गारुडास सांगा,काय नाव द्यावे?

कविता