मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ्री स्टाइल

... असंही होतं ना कधी कधी....

शिव कन्या ·
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...

गॅटर

जव्हेरगंज ·
लेखनविषय:
काव्यरस
कुठेतरी फुललेलं फुलपाखरु आणि लाल फुलांचा सडा असावा वाटतं मला काही पक्षी रंगीबेरंगी किडे बाजरीचं कणीस पाणी चौफेर असावं वाटतं मला आभाळ झळाळून ऊन पडावं पंक्चर झालेल्या सायकलला वंगण लावून दमडावं रीम वाकडी व्हावी चिखलात चाक रुतावं खांद्यावर घेऊन घरला चालत जावं असावी म्हणून ठेवलेली दाढी चांगली हातभर वाढली जंगलातून भुत बाहेर पडावं तश्या माझ्या कविता अचानक आलेल्या जरीची टोपी घालूनंच मी कविता लिहायला बसतो अगदी राजबिंडा गंजलेल्या पत्र्याच्या घरात कोंबडी अंडी घालतेय टिव्हीच्या खाली डिरीवरच्या पेंडीच्या पोत्यात आजकाल चांदीची थाळी नाही मुळात म्हशी राहिल्यात किती? टंगस्टन दिव्याचा भगभगीत प्रकाश पेन

दोस्ता...

पगला गजोधर ·
लेखनविषय:
काव्यरस
(प्रेरणा: आदूबाळ यांची समर ऑफ ६९ ची अनुवादित रचना पाहिली, आणि मीही एका इंग्रजी मालिकेच्या प्रारंभगीताचा मराठीत केलेला हा प्रयत्न ....

कॅनव्हास

विश्वेश ·
लेखनविषय:
काव्यरस
गेले अनेक दिवस तुझे नि माझे रंग एकमेकात मिसळतो आहे मी … मला माहिती नव्हते कि सगळे रंग एकत्र आले कि बनतो तो काळा रंग … आता चाचपडतो आहे त्या अंधारात शोधत तुझ्या त्या वेगवेगळ्या छटा … तुझ्या डोळ्यांचा निळा त्या अधरांचा गुलाबी अन तुझ्या हातातल्या गुलमोहराचा लाल … खूप वेळा पुसायचा प्रयत्न केला स्वताला, स्वताच्या रंगांना पण, सगळे इतके गडद झाले आहे कि … पुसताना भीती वाटते आता, कॅनव्हास फाटण्याची … किंवा पुन्हा पांढरा पडण्याची … नकोच ते .... - विश्वेश

गेम = डुआयडी

महासंग्राम ·
प्रेरणा : गेम आयडी कसा बदलता आला पाहिजे डुआयडी बनून मोकळेपणान फिरता आल पाहिजे... थोडं थांबून .. दुसऱ्याला खिंडीत पकडता आलं पाहिजे वेड बनून ... मी त्या गावचा नव्हेच असं सांगता आलं पाहिजे सगळ्यांना हे जमतंच असं नाही... धाग्याचा काश्मीर होतोच असं नाही तरी आजही छुप्या आयडी वर जग चालत.. सगळं काही असूनही आपलं एखाद डुआयडी लागतं .. 'डुआयडी में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग डुआयडी बनून प्रत्येकजण 'मेसेज' करत...

पाहुण तुमी कोण गावचं?

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
काव्यरस
या गावचं, त्या गावचं पाहुणं तुमी कोण गावचं? लाल गावचं कि हिरव्या गावचं पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं. निळ्या गावचं कि टोपी गावचं. पाहुणं म्हणे, ऐका राव मान मोठा मिळे ज्या गावात चरायला मिळते सारे रान तोची आहे आमुचा गाव. सरडा आमचा गुरु भाई त्याच्या सवे रंग बदलतो. शिकारीच्या गावी मुक्काम ठोकतो. या गावचं, त्या गावचं पाहुणं तुमी कोण गावचं? टीप: या कवितेचा राजनेत्यांशी काही एक संबंध नाही.

कान्ट फाईन्ड

एच्टूओ ·
काव्यरस
सेदान सेदान सुस्साट कार टॉप एन्ड मॉडेल बेस्ट इन क्लास बट कान्ट फाईन्ड पार्किंग यार! निघाली कार दूर दूर फार ठाऊक नाही रस्त्याचा पार रस्ता काही संपेना मायलेज काही पुरेना

तुझे नाव

माहितगार ·
लेखनविषय:
तुझे नाव नी केवळ भितीने गारठून जायला होते पानांवरून ओघळून गेलेला प्रत्येक थेंब डागांची लांबच रांग दुखण्याचीही थांबलेली अन तुझी आठवण म्हणजे स्मरण शब्दातील रण, सरण आणि मरण जसा सडलेल्या समुद्राने त्याच्या उदरातून ओकलेल्या सड्याचा किनार्‍यावर पसरलेला ऊग्र वास ज्या मोत्यांच्या आशेने तुम्ही एक एक शिंपले उघडत जाता त्यातून ओघळणारे रक्ताचे थेंब आणि जखमींचे आणि मृतांचे आर्त स्वर तुझ्या नावाने एक एक उचलत माळ कवट्यांची पुढच्या बळीच्या गळ्यात घालण्यासाठी आणि तुझ्या नावाच्या दहशती खाली दातखीळ बसल्यावर उच्चारून दाखवायचे 'बेहद खुबसूरत', एकच जल्लोश तुझ्या नावाचा घ्यायचा शेवटचा श्वास आणि हुतात्म्या

बंद पडलं..

अत्रुप्त आत्मा ·
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या! गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!" सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत. "काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. " येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून. लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून. कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू? कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त!

मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही,

जगप्रवासी ·
लेखनविषय:
काव्यरस
काल जुनी अडगळ साफ करताना कॉलेज मध्ये असताना ट ला ट जोडून लिहिलेली कविता सापडली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि रात्री ४ वाजेपर्यंत बायकोशी गप्पा मारत बसलो. सहज तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून इथे टंकली. पहिली कविता मी लिहिलेली, माझ्या बायकोला (तेव्हा गर्लफ्रेंड होती) एका साध्या कागदावर लिहून गुलाबा सोबत दिलेली.