मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॅनव्हास

विश्वेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
गेले अनेक दिवस तुझे नि माझे रंग एकमेकात मिसळतो आहे मी … मला माहिती नव्हते कि सगळे रंग एकत्र आले कि बनतो तो काळा रंग … आता चाचपडतो आहे त्या अंधारात शोधत तुझ्या त्या वेगवेगळ्या छटा … तुझ्या डोळ्यांचा निळा त्या अधरांचा गुलाबी अन तुझ्या हातातल्या गुलमोहराचा लाल … खूप वेळा पुसायचा प्रयत्न केला स्वताला, स्वताच्या रंगांना पण, सगळे इतके गडद झाले आहे कि … पुसताना भीती वाटते आता, कॅनव्हास फाटण्याची … किंवा पुन्हा पांढरा पडण्याची … नकोच ते .... - विश्वेश

वाचने 967 वाचनखूण प्रतिक्रिया 1