Skip to main content

फ्री स्टाइल

!!! ....सभा "Social Networking " ची.... !!!

लेखक बटाटा चिवडा यांनी बुधवार, 15/02/2017 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा.. चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा.. Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची.. Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King' सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " .. Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike.. या सर्व गदारोळात.. Myspace, PerfSpot, BigAdda ओरडत होते 'आम्ही पण आह

नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने !

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 04/02/2017 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने नोकरीशी जुंपणेही फिरुनी ते, नव्या दमाने । राहीले मनात गाणे, वर बॉसचे जोडे नव्याने, काय पडलो मी भरीला, बिल्डरांच्या सुक्या दमाने । कोणत्या शैय्येवरी असते मजा सांगा गड्यांनो, छळे इएमाय वेळी-अवेळी, रोजचा नव्या बळाने । भूक तगडी पण रोमान्सही, का जमेना रोज आता ? रेंटातूनी हप्ता वळविणे माथी का, पुन्हा नव्याने । तू मला कुरवाळणेही सोडले आहे अताशा, टेक-होम झाला कमी का?

रंगपंचमी

लेखक पराग देशमुख यांनी बुधवार, 01/02/2017 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
रंग मनाचा,रंग क्षणाचा, क्षणाक्षणाला विरघळणारा. क्षणात हसरा,क्षणात हळवा, डाव्या गाली ओघळणारा. पुसता अश्रू आवेगाने, रंग काजळी विस्कटणारा. अंमळ उसासे स्फुंदत असता, रंग बोचरा गहिवरणारा. मित्रांची ती चौकट जमता, रंग खुशीचा खळखळणारा. कातरवेळी काहुरणारा, पिंग गुलाबी रंग बावरा. रंग कोणता शौर्येन्द्राचा, निधड्या छाती वार झेलता? रंग कांतीचा गौर वेगळा, चाहुलीसरशी थरथरणारा. अवखळ,चंचल,शुद्ध-कांचनी

कधीतरी.....

लेखक पराग देशमुख यांनी रविवार, 29/01/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

लेखक पराग देशमुख यांनी शुक्रवार, 27/01/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय, अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय. वेदना जुनीच..., पावसामुळे पुन्हा फुललेली, कॉफीच्या वादळासह, पुन्हा मनात सललेली. अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा, उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा | गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती, जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती || म्हणून हा पाऊस मला आवडत नाही..... रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास | निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण|| त्या दिवशी सार आभा

राग (अर्थातच सान्गितिक)

लेखक खग्या यांनी बुधवार, 04/01/2017 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आशयाच्या अंबरांनी शब्द माझा टंच व्हावा कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा .. स्वर टिपेचा बरसुदे त्या भीमसेनी मार्दवाने सूर शब्दांच्या द्वयाने जीव माझा धन्य व्हावा सोहिनीच्या आर्जवांनी जीव स्वप्नाळून जावा जोगिया वा भैरवाने सूर्य गगनी अवतरावा विभासाच्या त्या सुरांनी नूर दिवसाचा ठरावा कलिंगडाच्या भैरवाने अंतरात्मा शुद्ध व्हावा .. मारावा अन सारंगाच्या साक्षीने दिन सार्थ व्हावा श्री मधुवंती पूर्वी संगे मध्यांन्होत्तर वेळ जावा ... यमन येऊदे संध्याकाळी साथ घेऊन शंकऱ्याला हंसध्वनी वा कल्याणाने दिवस रोजचा अंत व्हावा.. रात्रीला मग नंदसंगे मल्हाराने फेर घ्यावा रागेश्री अन कलावतीने केदाराचा
काव्यरस

शोर

लेखक अबोली२१५ यांनी गुरुवार, 29/12/2016 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
शोर एक बैरागी के मन का एक शोर, न पा सका खुद को न पा सका भगवान को, बस टूटता बिखारता चालता गया, न थम सका शोर न थम सकी सासें, बुंद, बुंद टपकाता शोर रुह को चिरता शोर, बैरागी थक गया शोर से छाल गया, गुमनाम शोर को साथ लकेर सो गया............ - अबोली

(फेंदारलेल्या मिशा....)

लेखक नाखु यांनी बुधवार, 12/10/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे. दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते. मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे. पाहून स्वप्ने सत्तेची बोकाळली आहे संराशा आता कोठे होऊ लागल्यात पाठवणी जराश्या का करीशी भणभण या वखवखलेल्या सत्ताबाजारात आता कोठे मिळविल्यात खुर्द्यात चवल्या जराश्या आजूबाजूला बोंबाबोंब किती कोण ऐकेल माझे घायाळ झाली आता कोठे माझी दमाची भाषा ना रुजते मन माझे या झाकोळल्या विजनात राहतं नाही माझ्या कृष्ण्कर्मे आडोश्या फरपटत जात