मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाहुण तुमी कोण गावचं?

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
या गावचं, त्या गावचं पाहुणं तुमी कोण गावचं? लाल गावचं कि हिरव्या गावचं पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं. निळ्या गावचं कि टोपी गावचं. पाहुणं म्हणे, ऐका राव मान मोठा मिळे ज्या गावात चरायला मिळते सारे रान तोची आहे आमुचा गाव. सरडा आमचा गुरु भाई त्याच्या सवे रंग बदलतो. शिकारीच्या गावी मुक्काम ठोकतो. या गावचं, त्या गावचं पाहुणं तुमी कोण गावचं? टीप: या कवितेचा राजनेत्यांशी काही एक संबंध नाही.

वाचने 1573 वाचनखूण प्रतिक्रिया 3

मुक्त विहारि Wed, 07/20/2016 - 20:18
झक्कास... "सरडा आमचा गुरु भाई त्याच्या सवे रंग बदलतो. शिकारीच्या गावी मुक्काम ठोकतो." हे तर खासच.