Skip to main content

कविता माझी

तुझे शहर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 02/07/2019 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

मी तुझा विचार करते

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/06/2019 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......

बालमित्रांची सुट्टी....

लेखक bhagwatblog यांनी बुधवार, 12/06/2019 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
करू थोडा हट्ट, करू थोडी मस्ती करू थोडा दंगा, लागली आहे सुट्टी करू थोडा खेळ, बसला आता मेळ करू थोडी मज्जा, लागली आहे सुट्टी भावा सोबत दंगा, मामा सोबत पंगा दादा सोबत कुस्ती, लागली आहे सुट्टी दीदीची काढली खोड, कॉर्टूनला नाही तोड जाईल सर्व सुस्ती, लागली आहे सुट्टी आज्जी करते थाट, आजोबा म्हणतात माठ मावशी सोबत गट्टी, लागली आहे सुट्टी दिवस गेला छान, रात्रीने टाकली मान खेळाला आत्ता बुट्टी, संपेल आत्ता सुट्टी
काव्यरस

जागरण....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 11/06/2019 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल झोपता झोपता, वेळ बाराची आली. आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली. अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग! बागडू लागलं,खेळू लागलं, माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

कवित्व इथले संपत नाही

लेखक mrcoolguynice यांनी गुरुवार, 30/05/2019 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
कवित्व इथले संपत नाही रोज गळवं ठणकत राहते प्रोवक्ता अजुनही गातो पाठशाळेत शिकवीली गिते ते झरे भक्तीउमाळ्याचे ती उधारीची भगवी माया यांच्यात खपलो आपण फुकां पुन्हा उगवाया जोरात इंद्रिये अवघी भुणभुणायची दुःख सैनिकांचे आठवणार नाही आता स्मरण त्यांच्या त्यागाचे ती जळमटं मेंदुत विणलेली आयुष्य कुरवाळायां गेली बेरोजगारीच्या वनवासातील अनस्थेशिया जणु उरलेला
काव्यरस

रियल रियल

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 14/05/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या.... मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या लिक़्विड जमान्यात प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत ओहो....ते काय असते आणि? आठवण बिठवण वेड्यांचा बाजार... एक कॉल मारायचा नाहीतर मेसेज धाडायचा बात करनेका मामला खतम. मनात आठवण, झुरणे बिरणे अरेरे, हाताबाहेरच्या केसेस... डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल एवढेच काय ते रियल रियल बाकी जग तो मृगजल मृगजल... मीराबाई मीराबाई, तो तुम्हाला उन्हात भासे.... राधाबाई राधाबाई, तो तुम्हाला जलात दिसे.... भ्रम भ्रम भ्रम भ्रम भ्रम नुसते नुसते भ्रम.....

प्रेम...

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 08/05/2019 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगा तुम्हाला वाटतं की नाही कुणीतरी आपल्यावर बेहद्द प्रेम करावं तसे आयुष्यात भेटतात हजारो लोक त्यात आपणही कुणाचं विश्व म्हणून जगावं कुणाच्या नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होतात का कुणाच्या तरी आठवणी तुम्हालाही छळतात का नसेल जाणवलं अगदीच तुम्हाला काहीही जरी भरलेल्या डोळ्यातल्या भावना तरी कळतात का कुणीतरी असेलच की तुमच्यासाठीही झुरणारं तुमचे दुर्गुण माहित असूनही भरभरुन प्रेम करणारं अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . . तुमच्यावर जो प्रेम करतो तोच तुमच्यासाठी योग्य !

विहीर खोदण्याचा विचार

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 03/05/2019 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
विहीर खोदण्याचा विचार... डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला हसण्यातील सच्चेपणा संपू लागला तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले.... जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा पाण्याची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे दुष्काळात विहीर खणू नये जमिनीला कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये आता, डोळ्यातील क्षीण उजेडाला फसवू नये संपू पाहणाऱ्या हसण्याला धरून ठेवू नये..... विहीर खोदण्याचा विचार मात्र.....?? विचार काही माझ्या आधीन नाह

माणसे कविता होऊन येतात.....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 26/04/2019 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
माणसे कविता होऊन येतात एकएक हट्टी कडवे लाडाकोडाने घालून ठेवतात, दोन कडव्यांमध्ये एक जीवघेणी कळ विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे कविता होऊन येतात अलंकार भिरकावून केवळ अर्थ होऊन रात्रभर उशाशी बसतात उजाडताना परत पुस्तकाच्या अंधारात गुडूप होतात...... माणसे कविता होऊन येतात.... -शिवकन्या

बियर

लेखक सोन्या बागलाणकर यांनी मंगळवार, 23/04/2019 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा: पाणी इतक्या बियरचे पेग बनवताना विचार करायचा भावा, शरीराला इतके झोके देताना उसंत घ्यायची भावा.... उसळून पुन्हा फेसाळते बियर बर्फ द्यायचा भावा... दोन पाय पुरत नाहीत बॉडीचा भार पेलताना... भावा, आता बार बंद करा अन् पिण्यातून मुक्ती द्या....