Skip to main content

कविता माझी

पाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 19/04/2019 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना विचार करायचा देवा, पाण्याला इतके झोके देताना उसंत घ्यायची देवा.... उसळून पुन्हा आदळते पाणी खडक द्यायचा देवा... दोन डोळे पुरत नाहीत पाण्याचा संसार पेलताना... देवा, आता पाण्याचे तीर्थ करा अन् पाण्यातून मुक्ती द्या.... शिवकन्या

...असं काही नसतं

लेखक निओ यांनी शनिवार, 06/04/2019 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा बायकोचं भांडण असं काहीच नसतं तो म्हणतो पूर्व, ती म्हणते पश्चिम बस एवढंच म्हणणं असतं बघितलं तर ती ही एक गंमत असते हाताबाहेर जाईल एवढं ताणायचं नसतं दोन चार दिवसांच्या अबोल्यानंतर आपोआपच नरम व्हायचं असतं वीजांच्या कड्कडाटानंतर पावसानं धरणीला भिजवायचं असतं तिनं हळूच कुशीत शिरायचं असतं त्यानं हळूवार कुरवळायचं असतं मायेच्या ओलाव्यात नवीन जग फुलवायचं असतं

(दाराआडची आई)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 05/04/2019 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

दाराआडची मुलगी

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 03/04/2019 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध.... करत असेल का तो ही तिचा विचार? जात असेल का तो ही स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे? मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते, ते डोळे डोळ्यात घेऊन मुलगा शांतपणे जागा राहतो.... डोळे हरवलेली मुलगी घर नसलेल्या दाराआडून बघत राहते... बघतच राहते.... -शिवकन्या
काव्यरस

(जगणं फक्त निमित्तमात्र)

लेखक नाखु यांनी शनिवार, 30/03/2019 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मग पुढे असं होतं की .. वाचण्यामधलं स्वारस्य विरत जातं. फडताळी पुस्तक, नवकोरं घडी न मोडता जागीच राहतं. वर्तमानपत्र फक्त हातचाळा उरतं.. बरेचदा न वाचताच आपसूक शिळं होतं पुस्तकांच्या आठवणी,आठवणीतली पुस्तकं होतात विसरायला.. आणि आभासी जग लागतं बागडायला याला ठेंगा त्याला ईंगा लागतात साठवायला.. स्वत्व लागतं आकसायला.. असं होऊ नये म्हणून भिडायचंच आयुष्याला.. चढ उतार हे निमित्तमात्र..

|| माझे बाबा ||

लेखक बी.डी.वायळ यांनी शुक्रवार, 15/03/2019 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
हे विठ्ठला माझे मस्तक तुझ्या चरणी झुकू दे | माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||धृ|| त्यांच्याच आधाराने झाले लहानाची मोठी | खंबीरपणे उभे राहिले सतत माझ्या पाठी || त्यांचच बोट धरुन मी चालायला ही सिकाले | म्हणूनच तर आतापर्यंत कधिच नाही थकले || हे विठ्ठला त्यांच शेत मोत्यावानी पिकू दे | माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||1|| जुनी पुरानी कपडे त्यांनी शिवून शिवून घातली | माझ्यासाठी प्रत्येक वेळेस नविन फ्रॉक घेतली || एकच जोडी चपल ते सांधुन सांधून घालायचे | माझ्यासाठी पायघड्या ते काट्यांवरून चालायचे || त्यांच्याकडुन मला पण काही तरी शिकु दे | माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे |
काव्यरस

मैत्री

लेखक तृप्ति २३ यांनी बुधवार, 20/02/2019 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री मैत्री असावी एकमेकांना जपणारी पण नसावी कधी एकमेकांना विसरणारी मैत्री असावी चांदण्यांसारखी रात्री च्या त्या अंधारात अथांग पसरलेली मैत्री असावी फुलासारखी कितीही काटे बोलले तरी सुगंध मात्र देणारी मैत्री असावी सागरासारखी कितीही आल वादळ तरी मात्र किनाऱ्यालगत येणारी मैत्री असूदेत कितीही अबोल पण असावी एकमेकांना समजून घेणारी मैत्री मध्ये नसली जरी रोजची ती भेट तरीही हक्काने एकमेकांना साथ देणारी... तृप्ती समीर टिल्लू https://www.truptiskavita.com तुम्ही आमची मैत्री कविता YouTube वर पाहू शकता .

ते दोघे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 16/02/2019 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीने रेखीव झालेल्या त्या प्रचंड वृक्षातळी ते दोघे होते मघामघाशी तर! मी पाहीले त्यांना बराच वेळ खाली मान घालून एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना, कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना, अन् तेव्हा रस्ता हसताना... मी पाहिले त्या दोघांना , हात हातात घेताना 'बाहों के बाहर नजरों से ओझल होना ही लकिरों पे लिखा है तो वो लकिरे ही मिटा देते हैं' त्याने एवढेच म्हणलेले मला ऐकायला आले नंतर मला ते दिसले नाहीत... पानगळीने रेखीव झालेल्या प्रचंड वृक्षामागे मला नंतर कुणीच दिसले नाही... -शिवकन्या

आजही...

लेखक नायकुडे महेश यांनी शुक्रवार, 15/02/2019 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
आजही स्वप्नात मी त्या बावऱ्या परीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। आजही वेड्या मनाला याद येते तिची आजही ओल्या सरीतून साद येते तिची आजही हृदयात मी त्या लाजऱ्या कळीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। आजही ते थेंब ओले झेलण्या आतुर मी आजही ते क्षण गुलाबी छेडण्या आतुर मी आजही प्रेमात मी त्या गोजिऱ्या परीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। महेश नायकुडे
काव्यरस

स्वप्नांची गोष्ट (गझल)

लेखक कहर यांनी सोमवार, 28/01/2019 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची किती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची किती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे इथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची गावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने कशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची किती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते हसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची भरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया बसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची कोंबडा झाकुन कुणी केला गजर बंद आली नेमकी पहाटे गुलाबी बांग स्वप्नांची नशीबास पाहतो नेहमी स्वप्ने आठवता मी मग क