मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकदाच ओलांडून अंतर...

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एकदाच ओलांडून अंतर पोहोचले मी तव हृदयाशी, आठवते का तुला अजुनी घडले जे जे काही नंतर? उभी राहुनी टाचांवरती, ओठ भिडवले धिटपणाने. दात पकडती अलगद हल्लक ओठांमधली मधाळ साखर.. वितळून गेले सभोवतालच, विसरून गेले काळवेळ मी. हात शोधती अधीर काही स्पर्शही झाला हळवा कातर... नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर पण... मिठी अशी ती कातील होती अजून होते तनात थरथर...

वाचने 8792 वाचनखूण प्रतिक्रिया 15

शा वि कु Wed, 02/12/2020 - 17:46
शृंगारिक कविता फार नाही वाचल्या, त्यामुळे फार आवडली.
मनात जे जे दडून होते नकळत आकळते कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते ही जाणीव अवघी जरतारी . . . हर श्वासातुन परिमळणारी . . . हर गात्रातुन तगमगणारी . . .

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 02/13/2020 - 11:45
लै म्हणजे लैच आवडली, नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर हे भलते अवघड असते पण जमवावेच लागते नाहीतर मग वाट लागते..... पैजारबुवा,