मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युगलगीतः आज पाहणार आहे

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
युगलगीतः आज पाहणार आहे
(सदर युगलगीत एकाच व्यक्तीने गायले आहे अशीही कल्पना करता येवू शकते.) तो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ|| ती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ|| तो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली ती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१|| ती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले तो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२|| तो: आलो, भेटलो, बोल बोललो; रमलो, हसलो, कधीतरी रडलो ती: मोरपीसी शब्द गोडवे; कंठातून कधी पुटणार नाही ||३|| ती: हेच असे का जीवन जगणे?; शांत, शीतल, उष्णाव्याने धगणे! तो: आठवणी कुपीतल्या कुलूपबंद; यापुढे कधी उघडणार नाही ||४|| ती: कितीक जन्मे जगली असली; कितीक मरणां मरून जन्मली तो: नकोच आता जन्ममरण ते; चक्राकार ती गती शमावी ||५|| ती: आज पाहणार आहे उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे उद्या राहणार नाही ||धृ|| तो: आज पाहणार आहे उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे उद्या राहणार नाही ||धृ|| - पाषाणभेद २४/०९/२०११

वाचने 774 वाचनखूण प्रतिक्रिया 0