Skip to main content

करुण

(बोंबाबोंब)

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 18/01/2012 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
महिना अखेरी, कैसा थाटमाट लागताच वाट, पगाराची सोशिक बायको, खिसे ती तपासे टाकोनी उसासे, दर्दभरे उधारी करोन, आणते किराणा शोधते बहाणा, सयुक्तिक सार्याच वस्तूंचे, वाढले हो भाव मनी काही हाव, धरवेना मूक वाचकाचे, सणके मस्तक काव्य हेच एक, प्रकटन पुढार्यांचे बूड, घट्ट खुर्चीवरी, फुकाचीच सारी, बोंबा बोंब
काव्यरस

भक्ती........

लेखक निशदे यांनी मंगळवार, 17/01/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग, सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो || नाव घेती कोणी, कोणी धुंद होता कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो || दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी हातातील नाणी, उगीच मोजतो || पोटाचेच जिथे, रोजचे सायास कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो || उडवती नाणी, ओवाळिती नोटा सारे त्या भगवंता, लाच दाखविती || येई कोणी शेट, मागाहून पुढे देवाहून जास्ती, सलाम ठोकिती || हा परी इथे, खातो शिळेपाके, देवाच्या वाटी, साधा नमस्कार || भक्ती मनी दाटे, परी भूक लागे, पोटापुढे नसतो, मनाचा विचार || कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र कोणी आरोग्य, आयुही मागिती || सारी असली जरी, देवाचीच पोरं, एक दुजियाचा, नाशही मागिती || देव येई निघुनी,
काव्यरस

ढग भरल्या आभाळातून ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 12/01/2012 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
ढग भरल्या आभाळातून पाउस पडो न पडो त्याना ह्याचे काहीच घेणे देणे नसते ह्यांच्या नळाला पाणी येतेय तेवढेच त्याना पुरे असते ... शेतकर्याचे काय झाले ..? शेतमजुरांचे काय झाले ...?? कसा देशोधडीला लागलाय ह्याना न काही घेणे देणे असते दुष्काळी कामासाठी ह्यांची सोय होतेय तेवढेच त्यांना पुरे असते कशी पोटासाठी येतात दुष्काळी प्रदेशातून ही अर्धपोटी माणसे कशी हवालदिल होऊन जातात ही माणसे ही पोरे ,ह्या बायका दुष्काळी कामासाठी दीड दमडीने विकली जातात कशी बळी पडते ह्या दुष्काळी भागातील एखादी स्त्री एखादी पोर .... कधीतरी ह्यांचे बिंग फुटते, नाही असे नाही पण हे पक्के बिलंदर असतात हे अलगद नाम
काव्यरस

तू आठवत राहतेस...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 10/01/2012 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
कसे भास होत असतात मला कसे कसे सुंगध पसरतात मनात माझ्या तू आठवत राहतेस संध्याकाळी तिन्हीसांजेला, कशी हलके हलके उतरतेस मनात माझ्या ह्या खिन्न वेळी ,कातरवेळी अलगद पावलांनी किती दूर आहेस तू नि मी असा परदेशी फक्त एकटा माझ्या खिडकीतून बघत बसतो हे खिन्न आभाळ नि घराकडे परतणारी पाखरे तुझ्या आठवणीने किती काहूर उठतात मनात माझ्या नि किती व्याकुळ होऊन जाते मन माझे गच्च कल्लोळ नुसता मी गुदमरून जातो तुझ्या आठवणीत मग कधीतरी अचानक नेटवर बोलताना दिसू लागतो मला देवघरातील दिवा नि तुझ्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव किती सहजपणे सहन करीत असतेस तुझे एकटेपण . मुलाना सांभाळीत हे सगळे आठवून हलकेच कल्लोळ कमी होऊ लागत
काव्यरस

आला दिवस गेला दिवस ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 09/01/2012 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
आला दिवस गेला दिवस कसा दिवस निघून जातो घरी बसलो म्हणून दिवस काही थांबत नसतो एके दिवशी म्हणालो त्याला थांब जरासा थोड्याशा गप्पा मारू जरा माझे-तुझे जुने दिवस आठवीत बसू हलकेच म्हणालो त्याला तिच्यावर माझे प्रेम होते हे तुला माहित होते तुझे सगळे भन्नाट होते माझे मन झुलत होते ती तर बोलूच नको काळजाचे गाणे होते हसला दिवस लाजला थोडासां अरे थांबरे जरासा कटाळलास कारे बाबा ..? तिला आठवताना किती बरे वाटते तिला आठवताना शप्पत तुझी आठवण मात्र नक्की असते उदासला दिवस हलकेच निघाला म्हणालो जरा फ्रेश होण्यासाठी तुझ्यासाठी चहां टाकतो मग जराश्या गप्पा मारू जरा जुने दिवस आठवीत बसू त्याला थां
काव्यरस

कां वागतो माणूस असा?

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 03/01/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कां वागतो माणूस असा? कां नाही जगत माणूस म्हणून? . आयुष्यभर सावल्यांशी खेळतो, सावल्यांमध्येच रमतो सगळीच आंधळी कोशिंबीर, सावलीचा संसार सावलीशीच लख्ख सूर्यासारखे सत्य डावलून सावलीचा आभास आपलासा करतो कां? कां वागतो माणूस असा? सत्य तरी किती खरे, कुणास ठाऊक!! कुठेतरी मनात साठवलेले काही क्षण हे कां सत्य? कातड्याच्या डोळ्यांनी पाहिलेले, अन मांसाच्या कानाने ऐकलेले हे जर सत्य तर मग प्रत्येक माणूस "हरिश्चंद्र" कां नाही? उगाचं काही माणसे सत्य शोधण्यात आयुष्य वाया कां घालवतात? त्यांच्या आयुष्याचे हे सत्य त्यांना कळत कां नाही!! कां?
काव्यरस

मी हा गेम पूर्ण खेळणार..

लेखक ajay wankhede यांनी गुरुवार, 29/12/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तारुण्याच्या उंबरठयावर प्रवेश केलेला मी. सळसळतं रक्त,ओहटी न येणारं अविरत उधाण. सतत खळखळणारं मन स्वप्नांचे ढिगभर मनोरे, तरी पण का बरं वाटतं एवढं बोअर कुठून येत असेल ही अस्वस्थता जग भन्नाट वेगानं बदलतय मीच मागे पडतोय काय? का छळतेय ही बेचैनी ? का गुदमरतो जीव? का मोकळा श्वास घेताच येत नाही ? असेल प्रेम भंगाचा विरह? प्रेम तरी का म्हणावं त्याला? की असेल उतुंग भरारी घेतांनाच झालेला संधीपात? नि मग वाटते मरून जावसं... का बरं वाटत असावं असं..का? का हाच माझ्या जन्माचा हेतू? नाही नाही नाही .... आई बाबांना सांग, अर्धवट सोडून जाणार नाही हा गेम. नवं वर्षाच्या पूर्व संध्येला....
काव्यरस

एकी १

लेखक लीलाधर यांनी बुधवार, 28/12/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
एकी १ आईने केला केक, दुरकी २ बाबांना केला फोन ! तीरकी ३ ताईने दीला पेन, चौकी ४ आमचा बाळू हुशार ! पाची ५ मिळून करू नाच, साही ६ आमचा नाच पहा ! साती ७ आमची न्यारी बात, आठी ८ घडेल का आई बाबांची भेट? नौवे ९ मिळून सारे गाऊ, दाही १० बाळूला आवडते माऊ !
काव्यरस