Skip to main content

करुण

पुन्हा एकदा पाऊस ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 29/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... वाटले मारावी उडी त्या चिखलात अन बरबटून घ्यावे सगळे पाय अन हात ... मन तर कधीच बरबटले आहे .... कुठेतरी खोल आत ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... भिरकावून द्यावी ती हातातली छत्री भरून घ्यावा हा निसर्ग आपल्या गात्री ... नंतर पुन्हा आहेतच न ओल्या न कोरड्या अश्या कुबट रात्री ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... भिजतानही आतून मी कितीतरी वेळ जळत होतो डोळ्यातले पाणी त्या पावसात मिसळत होतो आज पुन्हा एकदा पाऊस मला अन मी पावसाला छळत होतो ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... - विश्वेश
काव्यरस

देहदशा

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 22/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ओठांवर मुकेच नांव तुझे पापणीत दडल्या आठवणी हृदयात रमलरत गहन तळे कांठावर गहिवरते पाणी वाटेत मावळे देहदशा भेटे स्वप्नी तरिही कोणी रंध्रांत घोर आणीबाणी दाटून दग्ध वाग्विलासिनी रममाण रमण तन मन ध्यानी जन्मात जन्म झाले आणी पायांत शृंखला जडलेल्या चाललो एकला अनवाणी ...................अज्ञात
काव्यरस

ह्या परदेशात.....!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 19/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
खूप पायवाट चालून आलो खूप चढण चढून झाली मागे वळून बघतो तेव्हा आम्ही खूप सुखी होतो असे खरेच वाटून जाते असे मनात अलगद येते कठीण होते सगळे जगणे तरी खूप सुख होते एक खांबी तंबू होता तरी मनगटात जोर होता तसा शप्पत घोर नव्हता पाठीवरती हात होता भक्कम असा आधार होता हे शप्पत खरे होते .....!! !
काव्यरस

धिक्कार हो!

लेखक दैत्य यांनी शुक्रवार, 19/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा धिक्कार हो तुझ्या जिण्याचा तू एक पणती मिणमिणती भिकार ते दिवाळीतले फटाके जे ऊजळती राहून तुझ्या संगती भावना तुझ्या बुळबुळीत अश्रू लेखणी सुतकी रडू लागली वासना तुझ्या विनोदी झुरळ ते वहाणही कच खाऊ लागली जोहार हे जगणे तुझे अन न मागताच तू मुंडके दिले सशाचे फुकाचे हृदय तुझे अन ढगाने मदाने हसूं पाहिले पाटच्या पाण्यातसुद्धा रंग तुजला दिसला खूनाचा वारही तूच केलेस अन खर्चही मागशी आता वेदनांचा प्रेम जे केलेस तेही चोरट्यांना भरपूर दिसले मद्य जे प्यालेस तेही शंभरांना आधीच प्याले प्रार्थना जशी तुझी ती भज्यांवरची माशीच की कंटाळूनी तो हाकली देवही शिळे लपविण्या त्यासही यत्न की अ
काव्यरस

आमची बी एक

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 18/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

पंख मोकळे नभात..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाच जन्म मिळतो, घेउ दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा गर्भ राहिला म्हणून, माय-बाप हर्षिले वाटले जसे अकाश बोट एक राहिले मास हे नऊ असे बहरु दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा जन्मण्याअधीच मी, 'गुन्हा'च जाहले कशी माय! सावली तुझीच, वाढते तुझ्या कुशी अंतरी तुझ्या निवांत, पाहते चराचरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा "मी न भार!' सांगतेय, मांडते अकांत मी 'स्त्रीच जाहले म्हणून, का तुम्हा नकोय मी?? मी तुझाच श्वास माय, दे तुझाच आसरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा मी नसेन तर जगात पाळणा हलेल का? माय अन बहीण..
काव्यरस

बहरणारा ऋतू संपत आलाय ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 15/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
झाडांनी दखल घेतलीय बहरणारा ऋतू संपत आल्याची कशी जाणीव होते झाडाना ..? या बर्फाळ हवेची श्वास गुदमरू लागल्याची पाने पिवळी होऊ लागलीत आता कधीपण सुरु होईल पानगळ झाडांनी सर्व तयारी केलीय काळीज घट्ट करून पानाना निरोप देण्याची निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे कालच कितीतरी पाने गळून गेली नि आज सकाळी खच्चून सडा पडला पानांचा ... काष्ट शिल्प तशी झाडे ओकीबोकी ...!! त्यांच्या जाण्याच्या जाणीवेने दिशाही झाकोळून गेल्या ढगाचा कल्लोळ आभाळात आणि झाडे केविलवाणी ..... गळत्या पानाना कुशीत घेऊन फक्त मुकी मुकी झाडांनी मन घट्ट करून तयारी केलीय कधीपासून आपल्या पानाना निरोप देण्याची......! तो ह्या प
काव्यरस

संततधार

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 02/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कुंद पहाटे झडली संततधार मेघात विखुरले मन माझे चौफेर आषाढघनांचे धुके; नाचरे मोर उंचावुन माना शोधे चंद्र चकोर सागर भरती लाटेवर फेस विभोर रेतीवर रांगे ओघळात हिंदोळ अंधारनभाचे ओणवले झाकोळ वार्‍यात मातला अश्वबळाचा जोर चहुओर सैल मग का मनभर हा घोळ थेंबात थेंब दुथडीत अवखळे लोळ झिंगूनहि नाही कुठे लागला मेळ मृगजळ्स्वप्नांचा भातुकलीत समेळ .....................अज्ञात
काव्यरस

( मावळे बुडाले कामी )

लेखक अर्धवट यांनी रविवार, 31/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
शरदीनितैंच्या कविता आम्हाला नेहेमीच आवडतात, त्यातल्याच लेटेष्ट बावळे बुडाले धामी यावरून प्रेरणा घेउन.. मावळे बुडाले कामी //एक // धडक उरावर तप्त पर्वणी नर्मपणिचे उन्नत चरणी मिकामुकातील संथ चुंबनी मंतरले सावंतासदनी //दोन// अल्प त्यावरी भर्जर त्राता राहुलभजनी विचित्रवस्त्रा भर्कन शोधा मोडीत मूढा त्रिकोणमग्रूर तुरंतखोला //तीन// भंगअपेक्षा नाकफेंदरी स्वयंवराची हावहावरी बंधननक्षी उभयापक्षी प्रसिद्धीकिडा चावलवक्षी धाडीशिकंजी प्रयासखोटा वसकन उघडा मिरवीसर्वा मिपास्थळावर कशास बोधा कविताकर्मी फुटला माथा.

थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 26/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आम्ही अधून मधून आमच्या जुन्या-पुराण्या नोंदवह्या चाळत असतो, आणि वेळोवेळी त्यातील काही प्रसंग मनुष्ययोनीत प्रसृत करत असतो. वस्त्रहरण प्रसंगी, द्रौपदीने कृष्णाचा केलेला धावा सर्वविदित असला, तरी यापेक्षा पुष्कळ आधी एकदा द्रौपदीला कृष्णाचा धावा करावा लागला होता, ती घटना अशी: प्रसंग: अर्जुनाने एकट्याने पण जिंकला असून द्रौपदीस पाची जणांची पत्नी बनावे लागले..