मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ती वाट

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
ती वाट गोकुळातून कुंजवनाकडे जाणारी आजही ती त्याच वाटेवर प्रतीक्षा करतेय कदाचित, तिचा प्राणसखा कधीतरी अवतरेल कुंजवनातील राधिकेला भेटायला आलाच तर तिचेही भाग्य उजळेल . त्याच्या पाऊलखुणांचा वेध घेत धूळभरल्या वाटेवर अजूनही त्या स्पष्ट होत्या पण फक्त आत जाणार्‍या बाहेर येणार्‍या काहीश्या विरळ झालेल्या . त्या कुंजवनातील तो डेरेदार कदंब अजूनही, चमचमत आहे त्या चांद्रवैभवाने त्याच्या पानापानात ते मंतरल्या मुरलीचे भारलेले स्वर अजूनही दाटून आहेत तिला तो कदंब दिसतोय, पण देवकीनंदन, तो नाही तिथे..... . क्षणभर डोळ्यांसमोर रासक्रिडेत दंग गोपीका अन्, गोपीकांमध्ये उजळून दिसणारी ती अल्लड राधिका मधोमध उभा, मुरलीमध्ये प्राण फुंकणारा तो गोपाळ तो का नाही दिसत? . एक कळ खोलवर रुतली एकतारी सणाणून झंकारली स्वर उमटले "मीरा के प्रभू गिरीधर नागर" |- मिसळलेला काव्यप्रेमी -| ०८|११|२०११

वाचने 2039 वाचनखूण प्रतिक्रिया 8

विदेश 08/11/2011 - 13:35
वाट पाह्णार्‍या गोपीचे भाव कवितेतून जाणवले . कविता छान आहे .