तिचा नवरा -१
लेखनविषय:
काव्यरस
काही ओळख वगैरे नव्हती आमची.
भेटला तसा अपघातानंच.
'बायको माझी...' म्हणाला
'हुषार आहे अगदी'
हसलो मी.
'बायका असतातच हुषार'
म्हणालो
'नाही, पण ही..' तो म्हणाला
'अॅक्टिव्ह हो अगदी
सकाळी जिम. न चुकता
घरी तर लक्ष इतकं
सगळ्यांच्या तब्येती, मल्टिव्हिटॅमिन्सच्या गोळ्या, फळंबिळं..
माझ्याकडं बघताय ना? वाटतो का पन्नाशीचा?
मुलांचं होमवर्क अगदी रोजच्या रोज
रेग्युलर आहे तशी ती सगळ्यातच
आणि पर्टिक्युलरही
एखादी सिग्रेट ओढायचो लग्नाआधी
पण आता तीही सोडायला लावली तिनं मला
तशी स्कॉचबिच असते घरी
येणार्या जाणार्यांसाठी
मी नाही घेत कधी -सवय लागेल म्हणते ती
बीअर घेतो कधीतरी हळूच एखादी
शुक्रवारी संध्याकाळी
पण हिला वास नाही हो आवडत बीअरचा
वाचनबिचन जबरदस्त आहे हं हिचं
आणि माहितीही किती
नेटवर तर कायकाय वाचत असते ही
लिहितेही म्हणे
कुठलीशी कम्युनिटी आहे तिची...
शिवाय जॉब आहेच
सोशल नेटवर्किंगही जबरदस्तंय तिचं
तिच्या मैत्रिणींची गेट-टुगेदर्स होतात ना आमच्याकडेच
माझे? हो, हो, आहेत ना मित्र
बिझी असतात हो पण सगळेच,
आणि त्यांच्या बायकांशी विशेष जमत नाही हिचं
कधी बोलवावं म्हटलं त्यांना की मग त्या गप्पा, जाग्रणं..
सकाळी लवकर उठायचं असतं ना हिला जिमसाठी
रविवारीही
मग जाग्रणं नको म्हणते ही
म्हणून तर हल्ली...... नाहीच
मग तसं नाहीच होत भेटणं कुणाला
इच्छा असूनही...'
सांगत राहिला असता अजूनही काही
पण फोन वाजला अचानक त्याचा..
'हो, अगं निघालोच आहे, पोचतो, पोचतोच...
सॉरी, व्हेरी सॉरी हं...
अं? काय? विवेक? अगं विवेक कुठला भेटणार? आणि सांगितलंय ना तुला एकदा
त्याला नाही भेटणार म्हणून... मग? हो, हो, आलो, आलोच.. बाय ..'
हातातल्या फाईलमधून घाईघाईत
कागद घसरला एक
उचलून देताना लक्ष गेलं माझं
प्रिस्क्रिप्सन होतं कुठल्याशा
नवीन अँटीडिप्रेसंटचं...
तो अवघडला
'अहो, चालायचंच..' मी म्हणालो
'त्यात काय?
इतक्या ब्रिलियंट लोकांना.. होतात असे काही त्रास..
काळजी घ्या मिसेसची'
म्हणालो.
'होतील बर्या'.
'ते .... औषध...' तो चाचरला
'माझं आहे ते औषध...'
म्हणाला.
वाचने
4384
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
करूण विनोदी किंवा विनोदी करूण
छान आहे.
अरेरे...
मेष किंवा वृश्चिक राशीची
In reply to मेष किंवा वृश्चिक राशीची by नगरीनिरंजन
बरोबर
वेगळीच कथा मांडणारे पद्य.
मुक्तक आवडलं.
!
In reply to ! by ऋषिकेश
परफेक्ट ...
भाग २ ची वाट पाहतो.
आवडले
येवुद्या आनखिन... वाचतो आहे
वाचनबिचन जबरदस्त आहे हं
अरेरे
In reply to अरेरे by धनंजय
हा दु:खीकष्टी माणूस समोर
In reply to हा दु:खीकष्टी माणूस समोर by सन्जोप राव
बटबटीत
सॉलिड.