एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी
पिचकीन जी तो परप्राणाने
छेदुनी टान्गूनी सारी लक्तरे
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,
अशी पिपाणी द्या हीज आणुनी
मती जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
कुन्थत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढला धोका
खांद्यास चला खांदा देऊनी
एक 'कन्हैया' द्या हीज आणुनी
(वाजवील तो बासुरी सुन्दर)
प्राप्तकाल हा विशाल धूसर
सुंदर बेणी तयात खोदा
निजधामे त्या वरती नोंदा
बसुनी का गाढवीवर मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या सि.न्हावर,ह्या वाघीणीवर
मुढानो या त्वरा करा रे
मूढते चा ध्वज उंच धरा रे
बेअकले ची द्वाही फिरवा रे
पिपाणीच्या या सुरा बरोबर
मूळ कविता :
एक तुतारी द्या मज आणुनी