एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी

लेखनविषय:
एक पिपाणी द्या पप्पूस आणुनी पिचकीन जी तो परप्राणाने छेदुनी टान्गूनी सारी लक्तरे दीर्घ तिच्या त्या किंकाळीने, अशी पिपाणी द्या हीज आणुनी मती जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका कुन्थत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढला धोका खांद्यास चला खांदा देऊनी एक 'कन्हैया' द्या हीज आणुनी (वाजवील तो बासुरी सुन्दर) प्राप्तकाल हा विशाल धूसर सुंदर बेणी तयात खोदा निजधामे त्या वरती नोंदा बसुनी का गाढवीवर मेदा विक्रम काही करा चला तर हल्ला करण्या ह्या सि.न्हावर,ह्या वाघीणीवर मुढानो या त्वरा करा रे मूढते चा ध्वज उंच धरा रे बेअकले ची द्वाही फिरवा रे पिपाणीच्या या सुरा बरोबर मूळ कविता : एक तुतारी द्या मज आणुनी

(शाक दाट वाटान्याची)

लेखनविषय:
पैजारबुवा, नीमोतै आणि सध्या अद्रुश्य झालेले/ल्या दमामि येऊन षटकार ठोकून जायच्या आधी दोन रन काढून ठेवते. प्रेरणा द्यायचा कंटाळा आला आहे. घेतो खीर ओरपून ही किमया गोडाची बेल्ट जरा सैलावून चिंता करतो घेराची पुरीआड दडती भजी भय घालती केलरी डोळे वटारता बायको देऊ मोत्यांच्या सरी येता ताटात पुलाव शोधू काजूचे काप कसा टाकू शिल्लक नको माथी पाप डायट मारती माथी इथे सारेच पापड* जो मारतो मिटक्या त्याला म्हणती खादाड कशी सरता सरेना शाक दाट वाटान्याची गच्च भरल्या पोटाला ओढ भारी मठ्ठ्याची *पापड : बारीक या अर्थाने.

का?, का?, का?, का?, का?, का?

लेखनविषय:
समदी पतंग सुताया लागली पुरुस हुसकाया लागलं, बाय नाडाया लागली; का?, का?, का?, का?, का?, का?, समदी लंगडाया लागली गाय हसाया लागली लोमडी नाचाया लागली का?, का?, का?, का?, का?, का?, पाव वातड होवाये लागलं मिसळ इटाया लागली राजकारण कुथाईने लागलं का?, का?, का?, का?, का?, का?

पहिली चाचणी

कविता लिहिल्यावर करतो मी गुणवत्ता तपासणी, अर्थात बायकोवरच असते त्याची पहिली चाचणी, कवितेचे नाव काढताच पडते ती बुचकळ्यात, पण ऐकल्यानंतर, निष्कर्ष लगेच कळतो तिच्या डोळ्यांत !! डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी, लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी, ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी, विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी.

( आमचे अगोबा [बाल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊकविता] )

दोनच पाय अन डुलत र्‍हाय काळ्या टी-शर्टात आमचे अगोबा छळायला बुवा नेहमीच हवा पण बुवांना अवडतो फक्त पांडुबा वीरगळ शोधुन काढतात खोदुन माहीत्यांचा तर नित्य धबधबा.. धाक दरारा अजून वाटतो मिपात साऱ्या त्यांचा दबदबा.. फिरायला जातात घेवुन तेव्हा दुसरे 'सर' सारखेच टाकतात डबा.. गणेशचे पान अन लझानिया छान आरोग्याचा हाच मंत्र अजूबा.. तीशीतला तरुण एफ.सी रोड सोडुन लेण्या झिजवणे हाच मनसुबा .. .............श्री. जा.ना.पावट्या

गद्य-पद्य

ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य

टाकटोकावली

अगतगडमतर्रर्रमताशा ढोलबडवीभाऊबत्ताशास्वारीमर्जीखाशा वाटास्त्वर्खिरापती बेल्भंडारासूचक्मौन पोकळवासाभीकडोहाळे भाळीफुपाटी रेखीजाण्यतेराखीचिल्लरगौण नवनीतीशिंकाळे सल्लजाकुचंबीतनिसर्गबंधीत चिंताभीषण्कळीकांची हायखाउदेनिसर्गकुंठा दूरांदाजीकचराकोंडीजलपर्णी शांत्पहाराखुशीतगाजर नजरर्घड्याळीहितवरकर्णी निवडणुकीचा ‘संकल्प’

पुण्यात...

पुण्यात शनिवारवाड्यासमोर जो पुल आहे ना तिथे खुप गर्दी असते, गोंगाट असतो डुप्लिकेट पीनांचे चार्जर तिथे मिळतात ते अगदीच टाकाऊ असतात मला तो भाग आवडत नाही स्वारगेटला तुडुंब भरलेल्या पीएमटी बघितल्यावर मला भोवळ येते चिंचवडला प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात पावाबरोबर फरसाण्याची भाजी खाल्ल्यावर मला अशीच भोवळ आली होती तेव्हापासून मिसळपाव हा पदार्थ मी व्यर्ज केलाय बाकरवड्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते मग तीही मी कधी खात नाही दगडूशेटला जाता जाता जोशी वडेवाल्याकडे मी ढुंकुनही कधी पाहत नाही येरवड्याला एकदा बाईक पलटी झाली होती मग तिकडे मी कधी गेलोच नाही कोथरुडला जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही रॅडीसनमध्य

मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो

डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो वेळ संध्याकाळची मी पाळतो मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो फारसे चखणे नसावे वाटीतही मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो ही मळलेली वाट आहे पण इथे परताना मी किती ठेचकाळतो कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर रंग शर्टाचा कसा डागाळतो केवढे जडशीळ झाले हे नयन देव जाणे कसा तोल सांभाळतो चालला असता अजुनही एक स्मॉल मी कुठे मोजून मापून ढोसतो पैजारबुवा,

ढग, पाउस, आठवणी आणि भावना...

लेखनविषय:
मन कोरडं कोरडं नाही पाऊस पडत जरी जळालं हे रान नाही मोहर झडत नियतीच्या दरबारात आता मागेन मी दाद आंधळ्या न्यायदेवतेला आता घालेन मी साद आले काळेभोर हे ढग नाही पाऊस हा त्यात गेले कितीक ऋतू असे नाही तिची माझी भेट आता उरल्या आठवांचा सखे मी घालतो जागर इवल्याशा मनी माझ्या दाटे गहिरा भावना सागर
Subscribe to काहीच्या काही कविता