Skip to main content

जीव झोपला (विडंबन)

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 08/12/2018 18:03 या दिवशी प्रकाशित केले.

विडंबनाचे निमित्त: परवा, एका बॅचलर मित्राकडे कामानिमित्त जाणं झालं. कामाचं बघता बघता रात्री उशीर झाल्यावर त्याला म्हटलं, आता घरी जातो, उद्या बघू. तर, पठ्ठ्या आपला, "झालं रे! किती वेळ लागतोय! पाचच मिनिटे अजून." असं म्हणून दुसऱ्याच नवीन कामाला सुरूवात करीत होता. मलाही मग डुलु डुलु डुलक्या सुरू झाल्या. झोप अनावर झाल्यावर मी तिथेच झोपायचं हे दोघानुमतें ठरलं. आता, बॅचलरची रूम म्हणजे, जास्त काही सांगायलाच नको. पांघरायला दिलं त्याने पण त्याचा असा काही सुगंध येत होता की, मी कुडकुडून मरायचं मरण निधड्या छातीने अंगाशी कवटाळलं!

गर्भार सातव्या महिन्याची

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 01/08/2018 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
जिच्यासाठी झटून दिनरात दिली परीक्षा प्रीतीची आज भेटली ती, होऊन गर्भार सातव्या महिन्याची! मावळला ध्यास, गळाली आस गळ्यापाशी कोंडला श्वास म्हणतील मामा, तिची लेकुरे भीती मला त्या नात्याची! क्षण पदोपदी झुरण्याचे नकळत मागे फिरण्याचे आता आठवती ते खर्च आणि उसनवार मित्रांची! आता काय, शोधू दुसरी तीही नसेल तर तिसरी करणार काय, मुळातच आहे, बागेत गर्दी फुलांची! - संदीप चांदणे

कितीसा पुरोगामी आहेस ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/06/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

(बसफुगडी)

लेखक नाखु यांनी शनिवार, 02/06/2018 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
फुगडी खेळताना दोन भिडू असतात इथले दोन इथेच आहेत शोधून घ्यावेत ही विनंती पेर्ना क्र. १ पेर्ना क्र.

ती पहाट ओली(झालेली! ;) )

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 17/03/2018 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना:- 1) आणि 2) सांज काळी ती येते का हळूच तांब्या घेऊन गुपचूप एकटी जाते येडी घरामागील वावरातून मधूनच कुत्रा मागे लागता सांडे तांब्या हातीचा हातानेच गच्च धरावा पाचोळा आजू बाजूचा टोचती अशी गवता गवतातूनी ती हुळहुळती पाने ओली वरून गवताच्या काडया वैतागली ती साली कधी एकदा उठू म्हणुनी उभी राहिली पहा छपून बसलेले कुत्रे करी अचानक भॉ भॉ फेकुनी मारी दगड त्याला नुकताची टाकले

आणखी अपहरणे

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 16/03/2018 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
'ती'ही त्याचा फुटबॉल करते कधी कधी किंवा बर्‍ञाचदाही, पण अपहरणांना, 'ती'च्या तर्‍हा अधिक कधी जन्माला येण्यापुर्वीच अपहरण झालेले असते आलीच तर 'ती' हा शब्दच अपहरण करतो पहिले 'ती' चे अपहरण करण्याची सवय आधीच्या 'ती'लाही सोडवत नाही काही अपहरणांची सोय 'ती'च्या रूप रंगाने करुन ठेवली असते 'ती'ने आधी निवडलेल्या गुणसूत्रांमुळे 'ती'च्यातील 'ती'ला 'ती'च्याशी स्पर्धा करण्याच्या इच्छेमुळे 'ती'ने बाळगलेल्या न्युनगंडामूळे आणि त्यांच्या अंहगंडामुळे 'ती'च्यातील मालमत्तेच्या लालसेने कि कथित ममतेच्या स्वार्थाने, कि.. त्यांच्यातील मार्केटच्या लालसेने कधी त्यांच्यातील असुरक्षीततेने शुचिते

अपहरण

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 16/03/2018 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
सूत्रांनी गुणांच्या कट काय केले नी बंदीगृहांच्या प्रवासास सुरवात काय झाली स्वतःचेच अपहरण करण्याची दिवा स्वप्ने पहात सतत अपहरणातूनच तर पुढे सरकतोय . अपहरणकर्ते फक्त बदलत जातात अनेकदा अनुमती शिवाय , अनेकदा हातातन निसटणार्‍या अनुमतीने अपहरणांच्या घटनांचे हे आत्मचरीत्र अद्याप बाकी आहे, वाढवेन म्हणतोय उसंत मिळेल तसे तसे नव नव्या अपहरणकर्त्यांची तेवढीच सोय जुन्या अपहरणकर्त्यांना जरासा दिलासा प्रेर्ना

(तिखले)

लेखक सूड यांनी बुधवार, 06/12/2017 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
बंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले कठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले मध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले वामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले बुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले शर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले तडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले रांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले... (गजब)

(धुतले...)

लेखक टवाळ कार्टा यांनी शनिवार, 02/12/2017 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले पारावरती विसावलो अन तिथेच चुकले खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...

काळाची उबळ

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 10/11/2017 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत ! खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, जेव्हा माणूस विचार करावयास शिकला तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल. सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज गुन्हेगारी आभाळाला टेकली राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली महागाईचा पारावर गेला प्रदुषणाने कळस केला प्रगती कशी प्रतिगामी झाली प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले स्