Skip to main content

काय हाही भास आहे ?

लेखक नाहिद नालबंद यांनी शनिवार, 26/05/2018 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त हा मधुमास आहे! काय हाही भास आहे ? पँन अन आधार जोडा काय कटकट त्रास आहे छान! सुंदर! लोक म्हणती मत तुझे मज खास आहे धीर थोडा धर जरा तू अंत आरंभास आहे लालसा, अविचार, फितुरी आपुला इतिहास आहे चांगली असतेच कविता पण गझल फर्मास आहे एकदा मिळतो म्हणे, पण जन्म मनुचा त्रास आहे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3875
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सरकारी कृपा सारी म्हणून हा त्रास आहे तुम्हीच ठरवा आता खास आहे बकवास आहे लिहिणे थांबवू नका कृपया लिहिणे आपले खास आहे समीक्षा नेहेमी करावी माणसाने तो लोकशाहीचा श्वास आहे सिद्धेश्वर विलास पाटणकर